सत्य लढा मनपात स्‍वच्‍छतेच्‍या कामासाठी मनपात नवीन 10 ट्रॅक्‍टर दाखल.

 अखेर अकोला मनपा प्रशासनाने घेतले 21 ट्रॅक्टर

अकोला मनपात स्‍वच्‍छतेच्‍या कामासाठी मनपात नवीन 10 ट्रॅक्‍टर दाखल.


उर्वरित अकरा ट्रॅक्टर अकोला मनपात होणार लवकर दाखल


अकोला दि. 6 नोव्‍हेंबर  अकोला महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्‍यवस्‍थापन अंतर्गत शासनाकडून प्राप्‍त मार्गदर्शक सुचनानुसार व वितरीत निधी अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाने 21 ट्रॅक्‍टर वाहन खरेदी बाबत जी.एम.पोर्टलवर निविदा प्रसिध्‍द केली असता सोनालीका इंटरनॅशनल ट्रॅक्‍टरचे दर स्‍पर्धात्‍मक दृष्‍ट्या कमी असल्‍याने 21 ट्रॅक्‍टर वाहन त्‍यांचे मार्फत प्रशासनाने खरेदी केली आहे. त्‍यामधून मनपा आयुक्‍त कविता व्दिवेदी यांच्‍या मार्गदर्शनात पहिल्‍या टप्‍प्‍यात प्राप्‍त 10 ट्रॅक्‍टर मनपाच्‍या सेवेत कार्यान्‍वीत करण्‍याकरिता आज दि. 6 नोव्‍हेंबर रोजी महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांच्‍या हस्‍ते शिवनी येथील कोचर ट्रॅक्‍टर्स शोरूम येथे ट्रॅक्‍टर वाहन स्विकारून लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यावेळी माजी नगरसेवक जयंत मसने, मनपा नगरसचिव तथा आरोग्‍य विभाग प्रमुख अनिल बिडवे, प्रसिध्‍दी अधिकारी भरत शर्मा, कोचर ट्रॅक्‍टर्सचे संचालक मनजीतसिंग कोचर, दिलीपसिंग कोचर, नितीन पाटील, रविराज मोरेय, ईकबाल खान आदिंची उपस्थिती होती.  


          अकोला महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्‍यवस्‍थापनासाठी 21 ट्रॅक्‍टर मधून आज पहिल्‍या टप्‍प्‍यात 10 ट्रॅक्‍टर मनपाच्‍या स्‍वच्‍छतेच्‍या ताफ्यात सामील झाल्‍याने अकोला शहरातील दैनंदिन स्‍वच्‍छतेचे काम जास्‍त प्रभावीपणे होणार आहे, असे यावेळी महापौर सौ.मसने यांनी सांगतिले तसेच अकोला शहरातील नागरिकांनी आपल्‍या घरात आणि प्रतिष्‍ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा डस्‍टबीन मध्‍ये  गोळा करून शहरात ईतरत्र न टाकता मनपाच्‍या कचरा घंटा गाडी मध्‍येच टाकावे व आपला शहर संपुर्णपणे स्‍वच्‍छ करण्‍याच्‍या कामामध्‍ये सहकार्य करावे असे आवाहन महापौर सौ.र्अचना जयंत मसने यांनी यावेळी केले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने