सत्य लढा न्यूज गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान.

 गडचिरोली :- जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती - कोटगुल जंगल परिसरात पोलिस व नक्षलवाद्यां मध्ये मोठी चकमक झाली. यात जवळपास 26 नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काँबॅट ऑपरेशन संदर्भात सविस्तर माहिती दिली. यामध्ये 26 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचं त्यांनी सांगितलं. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच नक्षलवाद्यांचे मोठे नेते ठार झाल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

पोलीस - नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.


प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील

ग्यारापत्तीच्या जंगलात शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवीत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला. या चकमकीत 26पेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. चकमकीत चार पोलिस जवान जखमी झाल्याचे कळते. या.चकमकीबाबत प्रचंड गोपणीयता बाळगली जात आहे. अद्याप अधिकृत आकडेवारी बाहेर आलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरूनच सहा नक्षलवादी ठार झाल्याचे बोलले जात आहे.  झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची अद्याप नेमकी ओळख पटलेली नाही. पण, यामध्ये संघटनेचा मोठा नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी अद्याप पोलिसांची कारवाई सुरूच आहे.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने