सत्य लढा न्यूज अकोला पोलिसांचे शांततेचे आवाहन.

 त्रिपुरा घटनेचे पडसाद अमरावती शहरात उमटले असून सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.


∆ सामाजिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट, माहिती, पोस्टर सोशल मीडियावर टाकू नये.


∆ लोकसमूह, गट समूहाने एकत्र येणे टाळावे, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी.


∆ गल्ली, मोहल्ला, नगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये.


∆ कोणत्याही  प्रकारच्या अफवा, चुकीची माहिती पसरवू नये. फॉरवर्ड करू नये.


∆ नागरिकांनी कोणत्याही अफवा, अपमाहिती अपप्रचार यावर विश्वास ठेवू नये


∆ प्रत्येक नागरिकांनी सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.


∆ अफवा पसरवणाऱ्या, तेढ निर्माण करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


∆ प्रत्येक नागरिकांनी सामंजस्याची समन्वयाची भूमिका घ्यावी व शांतता कायम ठेवावी.


∆ सामाजिक एकता, एकोपा, शांतता कायम रहावी यासाठी प्रयत्न करावेत. 


∆ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी पोलिस प्रशासनाला तत्पर माहिती द्यावी.


∆ कोठेही अनुचित प्रकार, हिंसा, तेढ निर्माण होत असल्यास पोलीस प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी.


अकोला पोलीस प्रशासन

शहर वाहतूक नियंत्रण शाखा 7020514160,

8888437888




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने