श्री स्वामी समर्थ दुर्गा चौक दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी.

 *श्री स्वामी समर्थ दुर्गा चौक दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी*


अकोला- अकोला शहरामध्ये आज श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दत्त महाराजांचा जन्म हा ब12 वाजून 39 मिनिटांनी साजरा केल्या जातो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरात आज  शहरांमध्ये दुर्गा चौक स्वामी समर्थ केंद्र डाबकी रोड स्वामी समर्थ केंद्र खडकी येथील स्वामी समर्थ केंद्र येथे मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला 12 डिसेंबर पासून गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले होते हे पारायण आज म्हणजे दत्तजयंतीच्या दिवसाला समाप्ती करण्यात आली उद्या प्रत्येक केंद्रावर प्रसादाचे वितरण करून श्रीदत्त जयंती सांगता होणार आहे, याप्रसंगी दुर्गा चौक स्वामी समर्थ केंद्र प्रतिनिधी श्रीपाद चांदवडकर संजीव भाऊ ठाकूर मुकेश देशमुख राजूभाऊ उर्फ बाळू कुलट प्रशांत देवेश ठाकूर वैभव वाखारकर विक्रम चांदवडकर आधी स्वामी महिला व भक्तांनी सहभाग घेतला होता.



______________________________________________



_____________________________________________


_____________________________________________

वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया अकोला मनपा निवडणूकीत उतरणारा



 अकोला :- वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया गेल्या १० वर्षांपासून भरपूर प्रमाणात सामान्य जनतेचे काम पूर्ण करून वेल्फेअर पार्टी संपूर्ण भारतात पक्ष मजबूत करण्याचे काम करत आहे.भारतातील १२ राज्ये

 महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये आणि वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया आपले काम स्वच्छ भावनेने करत आहे. वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया हा एक नोंदणीकृत पक्ष आहे जो राजकारणात एक पर्याय म्हणून उदयास आला आहे.  राजकारणात साम,दाम,दंड,भेद असतो पण आमचा पक्षाने परिवर्तनाचा पर्याय निवडला आहे.नांदुरा नगरपालिकेत १ फैजपूर नगरपालिकेत २ अशा प्रकारे आम्हाला निवडून देऊन ३ नगर परिषद सदस्य आले आहेत.


अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही युतीसाठी समान पक्ष आणि 

मूल्यांच्या आधारे बाजूने बोलणी सुरू आहेत.आम्ही स्वच्छ प्रतिमा असलेल्या पक्षांशी युती करून पुढे जाऊ.अकोला महानगरपालिकेत शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणी, स्वच्छ वस्ती, लोकांच्या मूलभूत सुविधा आदी मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवू.अकोला शहरात १० वर्षात आम्ही शेकडो कामगारांना वेल्फेअर लेबर युनियनच्या माध्यमातून मदत केली आहे.

त्यांना त्यांचे हक्क मिळाले असून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे.अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि अकोल्यातील अनेक भागात विकासकामेही केली.पुढे मूल्यांवर आधारित राजकारणात आमची बाजू भक्कम करून आम्हीही जनतेला न्याय देण्याचे किंवा अकोला शहराचा सर्वांगीण विकास आदी विषयांतर्गत पुढे जाणार असे ऍड. कासिम रसूल यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष दिल्ली येथील ऍड. कासिम रसूल इलियास,औरंगाबाद चे मुजतबा फारूक, अकोला जिल्हाध्यक्ष महमूद उस्मान, राज्य सदस्य शहजाद अन्वर,शहर अध्यक्ष अजहर चौधरी,जहीर कॉन्ट्रॅक्टर मजदूर संघ अध्यक्ष,कलीम खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.


_____________________________________________

*शासकीय सबसिडी असलेला तांदूळ कालाबाजारी करून विक्री करनेसाठी नेत असताना अरोपिस अटक 12, पोते तांदूळ, वजन 800 किलो, मैक्सिमो गाडिसह 3,24,620, रूपयांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाची कार्यवाही**


अकोला - दि, 18, रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खबर मिळाली की गोरगरीब लोकाना शासकीय सवालती मध्ये सबसिडी वर मिलनारा तांदूळ गरीब जनते कडून कमी दरात खरेदी करून  जास्त दराने बाजारपेठेत विक्री करनेसाठी बाजारात नेला जात आहे अशा खात्रिशिर ख़बरेवरुन  मोठी उमरी परिसरात संशयित मैक्सिमो ऑटो क्रमाक MH 30 BC 2741 ची झड़ती घेतली असता सदर वाहनामध्ये   शासकीय राशनचा तांदूळ नि भरलेले 12 मोठे पोते 800 किलो वजन एक इलेक्ट्रॉनिक तराजू काटा कीमत 24,620 रुपये आणि मैक्सिमो गाड़ी कीमत 3 लाख रुपये चां मुद्देमाल असा एकूण 3 24, 620 रूपयांचा मुद्देमाल विनापरवाना आरोपी शेख नाजिम शेख सरफराज  वय 30 वर्ष रा बारषितकली जामा मस्जिद चौक, याचे कडून सदर शासकीय सबसिडी असलेला तांदूळ जपत करून अरोपिता विरुद्ध पो स्टे सिव्हिल लाइन येथे भारतीय जीवनावश्यक अधिनियम कलम 3, 7 अनवये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, 

सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल, पो हवा तुरकर, मलिये, ऐजाज अहमद यानी केली,



_____________________________________________

*रेडिओ वरील कार्यक्रम "गाता रहे मेरा दिल" फर्माईशी कार्यक्रम बंद केला असुन पुन्हा सुरू करण्याची रेडिओ  प्रेमींची मागणी*




अकोला -अकोला आकाशवाणी वरील गाता रहे मेरा दिल कार्यक्रम अचानक बंद केल्यामुळे व्हिडिओ श्रोत्यांनी दिले निवेदन प्रसार मंत्री तसेच प्रसार माध्यम यांना कळले की

 आम्ही आकाशवाणीचे नियमीत श्रोते असुन दिवसभराच्या श्रमातुन आनंद मिळावा या हेतूने "गाता रहे मेरा दिल" हा फर्माईशी कार्यक्रम नियमीत ऐकत होतो. परंतु अचानक आकाशवाणीने पुर्व सुचना न देता कार्यक्रम अधिकारी यांनी हा श्रोत्यांचा फर्माइशी कार्यक्रम बंद केला. गेल्या काही वर्षा पासुन हा कार्यक्रम नियमीत सुरू होता. कार्यक्रम अधिकाऱ्याच्या मनमानी वृत्तीने हा कार्यक्रम बंद करण्याचे कारण अद्यापही समजु शकले नाही. यामुळे आकाशवाणीला होणारा पत्रपुरवठा कमी झाला. हा कार्यक्रम बंद करण्याचा घाट आकाशवाणी अकोलाने घातला. वरीष्ठांचा कुठल्याही प्रकारचा आदेश नसतांना आपण हा कार्यक्रम बंद केला यामुळे आकाशवाणी श्रोता गण नाराज आहे या बाबत हा कार्यक्रम सुरू न केल्यास आम्ही नभोवाणी मंत्री माहिती प्रसारण मंत्री आणि प्रधानमंत्री यांचेकडे निवेदन देवून या कार्यक्रमा विषयी आकाशवाणी पुना सुरू करण्यात यावा असे निवेदन यावेळी देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने