मनपा आयुक्त आणत आहेत व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा? लेखी आश्वासन देऊन सुद्धा कारवाई नाही उपोषण कर्त्यावर पुन्हा उपोषण करण्याची वेळ.

 *मनपा आयुक्त आणत आहेत व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा?*



*लेखी आश्वासन देऊन सुद्धा कारवाई नाही उपोषण कर्त्यावर पुन्हा उपोषण करण्याची वेळ*


अकोला-दि,24 महात्मा गांधींनी सत्याग्रह आंदोलन करून देशाला स्वतंत्र मिळून दिले होता, तसेच अण्णा हजारे अशा सत्याग्रह आंदोलन करून आपल्या मागण्या पूर्ण केल्या होत्या, मात्र अकोला मनपा मध्ये दत्तात्रेय बाळापुरे तर्फे चेतन्य बाळापुरे यांनी चार स्मरण पत्र देऊन सुद्धा सत्याग्रह आंदोलनाचा पवित्रा उचलला होता आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले मात्र मनपा प्रशासन बातो का बाजार असल्याचे चैतन्य बाळापुरे यांनी म्हटले आहे, आज सोमवार रोजी दत्तात्रेय बाळापुरे तर्फे चैतन्य बाळापुरे  हे पुन्हा आमरण उपोषणास बसले आहेत, मौजे मलकापुर सर्वे क्र. 31भुखंड क्र.11पार्ट वरील भुखंडधारक श्री विश्वास महल्ले, सौ.रजणी महल्ले, श्री अरुण जुबळे, सौ लक्ष्मी मसने, यांच्या मालकीच्या भुखंडावर मुदत बाह्य बांधकाम प्र.क्र.14|294/12,1 नुसार विकासक श्री. संतोष मसने द्वारे केलेल्या अनाधिकृत बांधकामाव मा. आयुक्त साहेब म. न. पा. अकोला द्वारे दि. 18/10/2012 दि.व 06/08/2021च्या नोटीस अनुसार  संपूर्ण कार्यवाहीची अमलबजावणी करण्यात यावी व कायम स्वरूपी सदर प्रकरणाचे निवारण करण्यात यावे   त्यामागणीकरीतादि.27/12/2021रोजी बेमुदत उपोषण सुरु केले होते दि. 31/12/2021रोजी उपोषणाच्या पाचव्या दिवशी क्षेत्रीय अधिकारी श्री निकाळजे दक्षिण झोन उपोषण कर्त्याची मागणी मान्य केली व लेखी आश्वासन सुद्धा दिले परंतु  क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासना अनधिकृत  बांधकामावर अचापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही या करीता दि. 19/09/2022 रोगी स्मरण पत्र 4  मनपा आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी  यांना सादर केले परंतु सदर 4 स्मरण पत्रानुसार अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही सदर अनाधिकृत बांधकामावर करण्यात आली नाही यामध्ये काही देवान-घेवान झाल्याचा आरोप चैतन्य बाळापुरे यांनी केला आहे,

त्या कारणामुळे व वरील मागणी करीता दि. 24/01/2022 रोजी अकोला मनपा मुख्य कार्यालयाच्या समोर ते पुन्हा  सत्याग्रह आंदोलन करीत आहे, जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असे दत्तात्रय बाळापुरे तर्फे चैतन्य बाळापुरे यांनी सत्य लढा सोबत बोलताना सांगितले.


______________________________________________

गंगानगर वासियांना मूलभूत सुविधेसाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे बेशरम आंदोलन... 


अकोला- अकोला महानगर पालिका हद्दी येत असलेल्या  बायपास येथील गंगानगर 1 व 2 येथे मूलभूत सुविधा नसले कारणाने येथिल रहिवासी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे .येथे नाल्या व रस्ते नसल्याने  परिसरात ये जा करण्यासाठी तसेच नाल्या नसल्याने रत्यावर पाण्याची दुर्गंध पसरली आहे.यासाठी स्थानिक नागरिकांनी या पूर्वी 4 वेला निवेदन दिले आहे परंतु यावर आज रोजी परंत कोणतीही ठोस कार्रवाई झालेली नाही .

 यासाठी आज राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी अकोला महानगर युवकचे वतिने  आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते  व 8  दिवसाचे आत समस्या निकाली न  काढल्यास  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा देण्यात  आले होते परंतु कोणत्याही प्रकारची कार्रवाई न झाल्याने.

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे आमदार अमोल दादा मिटकरी ,महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांचे मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष अजय मते याचे नेतृत्वात  बेशरम आंदोलन  करण्यात आले याप्रसंगी बुढन गाडेकर, कार्याध्यक्ष सावल  ,अब्दुल नईम,मोहम्मद फजल, मो फिरोज ,आकाश धवसे, अब्दुल नाझिम,मंगेश इंगले, अक्षय देशमुख, अविनाश इंगले, नितिन सिरसाट,सोनू पटेल,बशीर खान ,शेख नवेद ,सैयद साद,अहेफाज,इम्रान,  सलमान, मो फैसल,शे मुख्तार,आदि सह परिसरातील नागरिक उपस्थित होते .


_____________________________________________
*‘दारू पिऊन वाहन चालविणा-या ऑटो चालकावर शहर
वाहतुक नियंत्रण शाखेने केली कायदेशीर कार्यवाही”*

अकोला- दि. २४शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथील पोलीस अमंलदार पोना / श्रीकृष्ण गायकवाड यांची टॉवर चौक येथे डयुटी असतांना अंदाजे १२ वाजताचे दरम्यान बस स्टॅन्ड मार्गे टॉवर चौक येथे चालणा-या वाहन क. + MH30AA6278 हे वाहन आडवा तिडका चालत येत असतांना दिसला तत्पुर्वी दोन अज्ञान इसमाने येवुन सांगीतले की सदर वाहन चालक हा लोकांना धडका मारत आहे करीता सदर वाहन थांबवुन चौकशी केली असता वाहन चालक त्याचा तोल सांभाळण्यास असमर्थ होता व त्याने तेथेच अंग टाकले असता त्यास पोस्टे रामदास पेठ येथे नेले व विचारपुर केली असता त्याने आपले नाव राजु एकनाथ नेमाळे रा. नायगाव वार्ड नं. १, अकोट फैल अकोला असे सांगीतले व मेडीकल करीता नेण्यात आले असता सदर वाहन चालक हा दारू पिलेला असुन दारूच्या अमलाखाली आहे असा डॉक्टरांनी अभिप्राय दिला. करीता सदर वाहन चालकावर शहर वाहतुक नियंत्रण शाखे तर्फे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

अकोला शहरातील सर्व वाहन चालक, ऑटो चालक, दुचाकी, चारचाकी वाहन चालक यांना सुचित करण्यात येते की, वाहतुकीचे नियम जसे अवैध प्रवासी वाहतुक करणे, दारू पिवुन वाहन चालविणे, फन्ट सिट वाहन चालविणे, रॉग साईड वाहन चालविणे, ओव्हर स्पीड वाहन चालविणे अश्या सर्व वाहतुक रहदारीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून वाहन चालवावे अन्यथा शहर वाहतुक नियंत्रण शाखे कडुन कायदेशी कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन करण्यात येत आहे.

_____________________________________________
*कॉलखेड़ परिसरात वरली  जुगारावर छापा  5 आरोपीना अटक विशेष पथकाची कार्यवाही **

 अकोला-दि, 24पोलिस आधिक्षक  यांच्या मार्गदर्शनाखालील  वीशेष पथकास मिळालेल्या ख़बरेवरुन कॉलखेड़ परिसरात  वरली जुगारावर पैसे हारजीत खेलताना  मिळून आले  त्यांचे जवळून नगदी 1690 नगदी, मोबाइल 4 कीमत  26000,  वरली मटक्याच्या चिठ्या  एक मोटरसायकल कीमत 40000 अस। एकूण 68,000 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी, 1, भीमराव गनपत इंगोले ,2 गजानन महादेव केकाड़ी,3सुखदेव लट्टुजी राउत 4, अनंता श्रीकृष्ण नेमाड़े 5रामेश्वर श्रीराम लाहोलकर सारे रा खड़की कॉलखेड़ अकोला यांच्या विरुद्ध पो स्टे खदान येथे  जुगार कायद्यानवये गुन्हा नोंद करण्यात आला आहे,

______________________________________________

*कुख्यात गुंडास एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द*

अकोला-दि 24 अकोट  येथे राहणारा कुख्यात गुंड अमोल श्रीकृष्ण चिंचोळकर, वय ३२ वर्षे, याचे वर यापूर्वी जबरी चोरी करणे, डांबुन ठेवणे व दुखापत करुन जबरी चोरी करणे, रस्ता अडवणुक करुन पैश्याची मागणी करणे व शिवागाळ करून मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवून कुख्यात गुंड अमोल श्रीकृष्ण चिंचोळकर, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २४/०१/२०२२ रोजी पारीत केला. मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून अमोल श्रीकृष्ण चिंचोळकर याचा तात्काळ शोध घेवून त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक २४/०१/२०२२ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पूर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, मोनिका राउत, तसेच सहायक पोलीस अधीक्षक, अकोट उप-विभाग, अकोट, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेका मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. अकोट शहर येथील पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे तसेच पो.स्टे. तील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावति असुन माहे-जुलै २०२० ते जानेवारी २०२२ हया कालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकुण ५५ गुन्हेगारांनावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.
______________________________________________

*प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात*

*पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण*

अकोला, दि.२४ भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे बुधवार दि.२६ रोजी सकाळी सव्वा नऊ वा. होणार आहे. याप्रसंगी  राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण  होईल. कोविड साथीच्या पार्श्वभुमिवर कोविड नियमांचे पालन करीत मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यासंदर्भात शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या दिवशी सकाळी साडेआठ ते दहा या दरम्यान  ध्वजारोहणाचा अन्य कोणताही  शासकीय अथवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अशा ठिकाणी हे कार्यक्रम सकाळी साडेआठ वा. पूर्वी किंवा दहा वा. नंतर आयोजित करावे,असे परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.




*राष्ट्रध्वजाच्या प्लास्टीक, कागदी प्रतिकृती वापरास बंदी*

अकोला, दि.२४ राष्ट्रीय सण उत्सव या काळात कागदाच्‍या व प्‍लास्‍टीकच्‍या राष्‍ट्रध्‍वज प्रतिकृतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्‍यात येतो. ध्‍वजसंहितेतील तरतुदीनुसार अशा वापरावर बंदी असुन असा वापर करणारे नागरिक, उत्‍पादक, विक्रेते, वितरक व मुद्रक यांचेवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

यासंदर्भात जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय, अशासकीय कार्यालये, स्‍वयंसेवी संस्‍था, प्रतिष्‍ठाने, स्‍थानिक प्राधिकरणे, शैक्षणिक संस्‍था,कार्यालये, प्रतिष्‍ठाने व प्राधिकरणे तसेच इतर संस्‍थांनी ध्‍वजरोहणाच्‍या वेळी ध्‍वज वापराबाबत भारतीय ध्‍वजसंहितेमध्‍ये दिलेल्‍या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच वापरास उपयुक्‍त नसलेले, फाटलेले, जीर्ण व खराब झालेले ध्वज वापरू नये  किंवा माती लागलेले तसेच रस्‍त्‍यावर, मैदानात पडलेल्या राष्‍ट्रध्‍वज  प्रतिकृती गोळा करुन ते तालुका व जिल्‍हास्‍तरावर निर्माण करण्‍यात आलेल्‍या यंत्रणेस सुपूर्द करावेत. विल्‍हेवाट लावण्‍याकरीता गोळा केलेले राष्‍ट्रध्‍वज व राष्‍ट्रध्‍वज प्रतिकृती तालुका पातळीवर तहसिलदार कार्यालय व जिल्‍हा पातळीवर जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा करावेत. राष्‍ट्रध्‍वज प्रतिकृतींची परस्‍पर विल्‍हेवाट लावल्याचे आढळल्‍यास संबंधितांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येईल.

प्‍लास्‍टीक व कागदी राष्‍ट्रध्‍वजांचा वापर थांबविण्‍यासाठी नियंत्रण व जनजागृती करण्‍याकरीता जिल्‍हा व तालुका पातळीवर समित्‍या गठीत करण्‍यात आल्‍या आहेत. शैक्षणिक संस्‍था, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्‍था व सर्व यंत्रणामार्फत ही बाब विद्यार्थी व नागरिकांच्‍या निदर्शनास आणुन देण्‍याकरीता सर्वांनी सहकार्य करावे,असे  आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.
______________________________________________

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील निर्णय*

*सन २०२२-२३ करीता जिल्ह्याच्या सर्वसाधारण*

*योजनेच्या नियतव्ययात ५० कोटींची वाढ*

*दिव्यांग कल्याण योजनांसाठी ३१ रोजी मंत्रालयात स्वतंत्र बैठक*

अकोला, दि.२४ जिल्ह्याच्या सन २०२२-२३ च्या सर्वसाधारण योजनेच्या नियतव्ययात ५० कोटी ७६ लक्ष रुपयांची वाढ करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त व नियोजन अजित पवार यांनी जाहीर केले. जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा घेण्यात आला. त्यात यावेळी झालेल्या चर्चेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याणासंदर्भात केलेल्या सुचनांना सहमती दर्शवित याबाबत राज्यस्तरीय विकास कार्यक्रम ठरविण्यासाठी सोमवार दि. ३१ रोजी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करावी,असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री बच्चू कडू हे मंत्रालयातून,अमरावती येथून विभागीय आयुक्त पियुष सिंह,जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, सहा. नियोजन कैलास देशमुख,  उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या वार्षिक योजनेत सर्वसाधारण योजनांसाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी १४९ कोटी २४ लक्ष रुपयांच्या नियतव्ययास मंजूरी देण्यात आली होती. त्यात विविध यंत्रणांनी प्रस्तावित केल्यानुसार, वाढीव निधीची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यात वाढ करण्यात आलेल्या विकास घटकांमध्ये पाणंद रस्ते विकास,  पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम,  शाळांसाठी नविन खोल्या, शौचालये बांधकाम,  मनपा हद्दवाढीमुळे नव्याने समाविष्ट झालेल्या भागात पायाभुत सुविधा विकास, महिला सबलीकरण, दिव्यांग कल्याणाच्या योजना राबविणे, कौशल्य विकास कार्यक्रम अशा विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या.

त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी ५० कोटी ७६ लक्ष रुपयांच्या वाढीव नियतव्ययास मंजूरी देण्याचे घोषित केले. त्यामुळे आता जिल्हा सर्वसाधारण योजनेसाठी २०० कोटी रुपयांच्या नियतव्यय आराखडा झाला आहे.

पालकमंत्र्यांच्या सुचनांची दखल;

३१ रोजी मंत्रालयात बैठक

जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण व विकास कार्यक्रमासंदर्भात केलेल्या सुचनांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार दि.३१ रोजी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. याबैठकीत दिव्यांग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी, दिव्यांगांच्या उच्चशिक्षणासाठी सुविधा निर्मितीसाठी संशोधन केंद्र स्थापन करणे, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवनाची उभारणी करणे अशा मुद्यांवर चर्चा होणार आहे.
______________________________________________

*जिल्हा क्रीडा पुरस्कार घोषित*

अकोला,दि. २४ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात देण्यात येणारे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२१-२२ ची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार बुधवार दि. २६ रोजी लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वरुपात रोख दहा हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्हे वितरीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली आहे.

यंदाचे जिल्हा क्रीडा गुणवंत पुरस्कार सन २०२१-२२ याप्रमाणे-

गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला)- कु. विधी राकेश रावल(बॉक्सिंग)

गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष)-  सुदर्शन गोपिकृष्ण येनकर(बॉक्सिंग)





*कोविडःआरटीपीसीआरमध्ये 208 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू, 122 डिस्चार्ज;*

*रॅपिड ॲन्टीजेन सात पॉझिटीव्ह*

अकोला दि.24 आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 299 अहवाल प्राप्त झाले. त्यात 101 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 107 असे एकूण 208 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
_____________________________________________

*हातात धारदार शस्त्र तलवार घेवून दहशत निर्माण करणारे अरोपितास तलवार सह अटक**

अकोला-दि, 24  एक इसम हातात धारदार शस्त्र तलवार घेवून  जुल्फिकार दरगाह परिसरात दहशत निर्माण करीत आहे अशी खात्रिशिर ख़बरेवरुन  सदर दहशत निर्माण करणारे इसमास पंचासमक्ष जुल्फिकार के
दरगाह समोरून डाबकी रोड येथून ताब्यात घेवून त्याचे नाव पता विचारले असता शेख अफरोज शेख इब्राहिम  वय 22 रा भगतवाडी ऐसे सांगितले त्याचे जवळून एक धारदार शस्त्र तलवार  ज्याची लंबाई 89 सेमी  पाते 4 सेमी रुन्द मुठ असलेली कीमत 1000 रूपयांची बेकायदेशीर रित्या बालगताना मिळून आल्याने  त्याचे विरुद्ध पो स्टे डाबकी रोड येथे आर्म एक्ट कलम  4,  25 अनंवये  गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे  
 सदर कार्यवाही मा पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या पथकाने केली,



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने