*प्रजासत्ताक दिन थाटात साजरा:विकासासाठी एकता आवश्यक- पालकमंत्री बच्चू कडू*
अकोला-,दि.२६ आपला देश हा विविध धर्म, पंथ, विचारांच्या लोकांनी बनलेला आहे. आपल्या देशातील तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहोचवायचा असेल तर या सर्व घटकांची एकता आवश्यक आहे, त्यामुळे सर्वांनी एकोप्याने राहून तळागाळातील लोकांच्या विकासासाठी कार्य करु,असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी कोविड नियमांचे पालन करीत हा सोहळा पार पडला. येथील लालबहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उप विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी , लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीदांचे कुटुंबिय आदी उपस्थित होते.
पुरस्कार, पारितोषिक वितरण व कॉफी टेबल बुकचे विमोचन
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देणाऱ्या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार, आर.आर. आबा सुंदर गाव स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायती तसेच विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भित्तीचित्र स्पर्धाः- बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे हेमंत उत्तमराव उपरीकर प्रथम, अनिकेत धर्मराज मंडलेकर व्दितीय, प्रतिक महेश वाघ तृतीय तर दिपुजा राजेंद्र हरणे, संतोष डिंगाबर राऊत व नंदु वासुदेव गवई यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार (2019-20)
कानडी ग्रा.पं. ता. अकोला-सरपंच सैय्यद मुमताजबी इसाक,
जितापुर ग्रा. पं. ता. अकोट- सरपंच विठ्ठल मंगळे,
बहादुरा ग्रा.पं. ता.बाळापूर-सरपंच अनिताताई माळी,
पाटखेड ग्रा.पं. ता. बार्शिटाकळी- सरपंच महादेवराव मानकर,
मधापुरी ग्रा.पं. ता.मुर्तिजापूर- सरपंच प्रदीप ठाकरे यांना प्रदान करण्यात आले.
(2020-21)
कापसी ग्रा.पं. ता. अकोला- सरपंच अंबादास उमाळे,
अकोलखेड ग्रा.पं. ता.अकोट- सरपंच रत्नप्रभाबाई निचंळ,
शेळद ग्रा.पं. ता. बाळापूर- सरपंच सागर उपरवट,
राजुरा ग्रा.पं. ता.मुर्तिजापूर-सरपंच वनमालाताई आखरे यांना प्रदान करण्यात आले.
जिल्हा क्रीडा पुरस्कारः-
महिला गटातून विधी राकेश रावल(बॉक्सिंग)
पुरुष गटातून सुदर्शन येनकर (बॉक्सिंग).
भव्य रांगोळी कलावंत अमृता शेनाड व चमू यांना तसेच
संगणक परिचालक गणेश नाईक यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
तसेच सामाजिक कार्याकरीता जावेद जकारीया व त्याच्या चमूस, नैसर्गिक आपत्तीच्या काळात केलेल्या मदत कार्याबद्दल दीपक सदाफळे व संत गाडेगाबाबा चमू, वंदे मातरम आपात्कालीन पथक व जिल्हा आपत्ती पथकातील सुनिल कल्ले व हरिहर निमकंडे यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गाडगे यांनी केले.
______________________________________________
*श्री संत तुकाराम महाराज विद्यालय किनखेड (पुर्णा) ता.अकोट जि. अकोला येथील कर्मचारी यांचे आमरण उपोषण अवैधरित्या*
*शाळा समिती*
अकोला- दि 26 श्री संत तुकाराम महाराज विद्यालय किनखेड (पुर्णा) ता.अकोट जि. अकोला येथील कर्मचारी यांचे आमरण उपोषण अवैधरित्या शाळेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक हे आम्हाला वांरवार पैशाची मागणी करतात सदर आरोप हा हेतुपुरस्पर लावलेला आहे बिनबुडाचा आरोप आहे. या आरोपामंध्ये शालेय सुचना वही मंधील ५ टक्के रक्कम जमा करावी अशी नमुद असणारी सुचना माहे जुन २०११ मध्ये इनकम टॅक्स रीटर्न व शालेय स्कुल बस डीसेल खर्च करणे करीता सदर शिक्षकाना ५ टक्के जमा करावेत व त्यामधुन खर्च करावा अशी सुचना काढली होती परंतु ही बाब स्वइच्छेने होती व तसेच कोणाची इच्छा नसलेमुळे ती योजना तेव्हाच रदद केली, तसेच कोणकडुन काही घेतले नाही सदर सुचना वही ही श्री कुले शिपाई यांचे कडे सुचना देण्या करीता दीली असता सदर सुचनेचे फोटो काढुन ती सुचना समाजमाध्यमावर व्हायरल केली व त्या सुचनेचे अदयाप पर्यत गैरवापर करून वरीष्ठांची वा इतर लोकांची दिशाभुल केली जाते व आमच्या कडुन पाच टक्के मागीतले जातात अशा अपप्रचार केला जातो. श्री बेंडे, श्री नवलकार व श्री राठोड यांचे या सुचनेशी काही संबंध नाही तरी देखील सदर तीन्ही शिक्षक सदर संदर्भ देवुन इतरांची दिशाभुल करतात.उलट हे वरील सर्व उपोषण कर्ते- हे मुख्याध्यापक व वरीष्ठांची यांची उध्दट पणाची आहे तीन्ही शिपाई यांनी मुख्याध्यापक यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे सदर शिपायावर पोलीस स्टेशन मार्फत गुन्हे दाखल आहे. सदरच्या गैरवर्तणुकी मुळे श्री गोंडचवर यांची रितसर
चौकशी समीती नेमुन सेवा समाप्त केली आहे सदर शिपायाचे शाळा न्याधीकरण अमरावती येथे सेवा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सदर व्यक्ती गावातील असल्यामुळे व शालेय प्रशासनाने सेवा समाप्त केले गुळे गावातील ग्रामपंचायत प्रशासनाला समोर करून शाळेविरोधी वर्तन करीत आहे. तसेच शिक्षक गजानन नवलकार यांनी देखील मु.अ यांना कार्यालयामध्ये येवुन (लाकडी बेंच मारण्याचा प्रयत्न केला सदर बाबतीत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे.
सदर उपोषण कर्ते यांनी शाळेवर प्रशासक नेमणे व मुख्याध्यापक यांचा पगार बंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे. परंतु शाळेवर प्रशासकाच्या नेमणुकीच्या तरतुदी मंध्ये शाळा बसत नाही वरील कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी व प्रशासन शालेय नियमांचे पालन करतात व आपल्या जबाबदारया पार पाडतात सदर शाळेचे कुठलेही शैक्षणिक हीताच्या विरोधी वर्तवणुक नाही मागील परीक्षेचे निकाल उत्तम आहेत शालेय प्रशासन सुव्यवस्थीत आहे आर.टी.आय कायदयाचे पुर्णपणे पालन केलेले आहेत शैक्षणिक कामकाज समाधानकारक आहे त्यामुळे साधारण परीस्थीतीत प्रशासक नेमण्याची आवश्यकता नाही तरी देखील सदर कर्मचारी प्रशासन नेमण्याचे मागणी रेटुन धरत आहे जेने करून मुख्याध्यापक व वरीष्ठांचे अधिकार संपावे व आपण आपल्या मर्जीनुसार वागावे अश्या उद्देशाने गावातील ग्रामपंचायत प्रशासनाला समोर ठेवुन प्रशासकाची मागणी करत आहेत. तसेच शाळेचा पिण्याचा पाण्याचा नळ यांनी गेली एक वर्षापासुन बंद केला आहे
श्री बेंडे यांनी वेतन देयक सादर केले नाही असा आरोप केला आहे सदर वेतन देयकाला सदचे शालार्थ आय डी अमान्य असलेमुळे संचमान्यता दुरूस्त्री न झालेमुळे वेतन देयक सादर झाले नाही तसेच वेतन पथकाने स्वीकारले नाही तरीही सदर शिक्षक माझे वेतन देयक सादर केले नाही असा सतत आरोप करत आहे. व इतरांना चेथावनी देत आहे.
शिपाई कुले यांचे संदर्भात जाणीव पुर्वक गैरहजर आहे असे नमुद केले आहे. सदर शिपाई यांची दीवटी सकाळी ७ ते दुपारी ३ व दैनदिन ८ तास या प्रमाणे लावली आहे सदर दीवटी हि नियमानुसार दीली आहे सदर कर्मचारी हा माहे डीसेंबर मध्ये सकाळी ७ वाजता न येता दुपारी ११.०० नंतर येवुन आपल्या मर्जी प्रमाणे येजा करतो मी. सकाळी ची दीवटी करत नाही असे उध्दटपणे बोलतो कुठलेही कामकाज करीत नाही दुपारी येतो सेल्फी फोटो काढतो व मनमानी निघुन जातो सदर महीन्यात उपस्थीती नगण्य आहे. तरीसुध्दा सुधारणेची संधी देवुन त्यांचे उपस्थीत दिवसांचे डीसेंबर २०२१ चे वेतन देयक सादर केले आहे
सदर निवेदनामध्ये श्री गोंडचवर यांना शाळेवरून काढुन टाकले आहे असे म्हटले आहे. विनाकारण कुठल्याही कर्मचारी यांना कामावरून कमी करता येत नाही. सदर शिपायांचे बाबत सदर शिपायाने सेवाकाळात केलेली अनेक गैरवर्तने त्यावर दिलेली सुचनापत्रे, शोकॉज नोटीस, खुलासा, सुधारणेंची संधी समन्वय, समझोता इत्यादी करून देखील सदर शिपाई यांचे वर्तनात सुधारणा न झालेमुळे रीतसर शालेय शर्ती नियमावली १९८१ ला आधीन राहुन रीतसर चौकशी समीती नेमुन पुरावे, साक्षीदार, पळताळणी ईत्यादीच्या आधारे सदर शिपायाची माहे एप्रील २०२१ पासुन सेवासमाप्त केली आहे. सदर शिपायाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे तरी देखील सदर कर्मचारी यामंध्ये सहभागी आहे.
उपोषण कर्ते शिक्षक यांचे आपल्या अध्यापनावर लक्ष नाही इतर विध्वसंक बाबीकडे लक्ष असलेमुळे चालु शैक्षणिक वर्षात वर्ग ५ वी मध्ये एकही विदार्थी प्रवेशित नाही त्यामुळे सदर शिक्षकांच्या अध्यापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच निवेदनामध्ये विदार्थी टॉन्सफर करीत असल्याचा आरोप केला आह. विदार्थी पालकांनी केलेल्या विंनती अर्जानुसार विदार्थ्याना पाहीजे असलेल्या शाळेत प्रवेश दिला जातो त्यामुळे सदर आरोप बिनबुडाचा
आहे उलट या शिक्षकांनीच शाळेत बोगस विदार्थी नसतांना बोगस विदार्थ्यांची असल्याची तकार केली आहे. सदरची तकार उपलब्ध आहे. ७ वरील निवेदनामध्ये श्री गजानन ग्यानदेवराव नवलकार व गणेश साहेबराव राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत तसेच यामध्ये ते सहभागी आहेत सदर शिक्षक इतर कर्मचारी यांचे मनोबल वाढविणे करीता आणी शाळेची बदनामी करणे करीता यामध्ये सहभागी झाले आहे, त्यांना मुख्याध्यापक व संस्थाअध्यक्ष यांचे
मनोबल कमी करावयाचे आहे
मान्यता प्राप्त खाजगी अनुदानीत / विनाअनुदानीत व अंशता अनुदानीत शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे तकारीवर कार्यवाही करण्याकरीता तक्रार निवारण समीती महाराष्ट्र शासन शालेय व क्रीडा विभाग शासन निर्णय प्रकार २०१९ प्र.क ७५ टी एनसी ४ दिनांक २९ ऑगष्ट २०१९ नुसार समीती स्थापन केली आहे. वरील प्रमाणे कोणत्याही तकारी असल्यास सदर समीतीकडे न्याय मागणे उचीत आहे सदर समीतीने दिलेला निर्णय या शालेय प्रशासनास व कर्मचारी यांनी बांधील असतो. परंतु सदर कर्मचारी हे अनधिकत व बेकायेदेशिर पणे उपोषण करून शालेय प्रशासनाची जनमानसात बदनामी करण्याचे दुष्टीने उपोषण करण्याचे ठरवीले आहे सदर कर्मचा-यांचे वारवार उपोषणास बसुन परीसरात शाळा व संस्थेची प्रतीमा खराब होवुन विदार्थी पटसंख्या कमी करण्याचा यांचा प्रयत्न आहे.
त्यानुसार मा. पालकमंत्री महोदय, मा. जिल्हाधिकारी महोदय मा. शिक्षणाधिकारी महोदय यांना नम्रपणे कळविण्यात येते की वरील बाबतीच आमच्यावर अन्याय होवु नये योग्य ती दखल घेण्यात यावी करीता सविनय खुलासा शासकीय विश्रामगृहात येथे पत्रकार परिषदेत श्री संत तुकाराम महाराज विद्यालय किनखेड अध्यक्ष यांनी सांगितले.
______________________________________________
*बेघरांच्या निवाऱ्यासाठी सुविधायुक्त इमारत लवकरच- पालकमंत्री बच्चू कडू*
अकोला-,दि.26 जिल्ह्यातील बेघर व्यक्तिंना निवासाची सुविधा अधिक उत्तम देण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त इमारतीचे निर्माण करण्यात येईल. त्यासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पालकमंत्री बच्चू कडू यांनी मनपा व आाशाकिरण महिला विकास संस्थाव्दारे संचलीत संत गाडेबाबा बेघर निवारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, मनपा उपायुक्त पंकज जवजाळ, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, तहसिलदार सुनिल पाटील, आशाकिरण महिला विकास संस्थाचे अध्यक्ष दुर्गा भड, व्यवस्थापक उषा राऊत, आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की, बेघर निवारा केंद्रात वास्तव्यास असणाऱ्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन द्या. प्रत्येकाला सहायता अनुदान मिळेल याकरीता आवश्यक ती कार्यवाही तातडीने करा. तसेच प्रत्येकांना रेशन कार्ड तयार करुन धान्य उपलब्ध करुन द्या. बेघर निवारा केंद्रात राहत असलेल्या महिला व पुरुषांचा बचत गट तयार करुन त्याच्या शारिरीक क्षमता व पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन द्या. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा.
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी बेघर निवारातील महिला व पुरुषांची आस्थेने विचारपूस करुन त्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वस्त केले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी बेघर निवारातील सर्वांना जॅकेट वाटप केले व त्यांच्यासोबत अल्पोहाराचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनिष हिवराळे यांनी केले.
_____________________________________________
*मध्यान्न भोजनामुळे कामगारांना मिळेल दिलासा-पालकमंत्री बच्चू कडू*
अकोला-दि.२६ शासनाच्या कामगार विभागाने इमारत बांधकाम व अन्य कामगारांसाठी मध्यान्न भोजन देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे कामगारांना अल्पदरात पौष्टिक अन्न देऊन दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मध्यान्न भोजनाची योजना राबविली जात आहे. या योजनेद्वारे कामगारांना त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन दुपारचे जेवण देण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत केली जाते. या योजनेची सुरुवात आज जिल्ह्यात करण्यात आली. त्यासाठी म्हाडा वसाहत बांधकाम साईट येथे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते कामगारांना मध्यान्न भोजनाचा लाभ देण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, सहाय्यक कामगार आयुक्त राजू दे गुल्हाणे यांची उपस्थिती होती. यावेळी गुल्हाणे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, जिल्ह्यात ७२ बांधकाम साईट्स तसेच जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्या या योजनेशी संलग्नित करण्यात आल्या असून त्याचा लाभ जिल्ह्यातील तीन हजार ९०६ कामगारांना मिळेल. ही नोंदणी प्रक्रिया सुरु असून येत्या कालावधीत अधिक कामगार या योजनेचा तसेच मंडळाच्या अन्य कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील.
आपल्या भाषणात पालकमंत्री म्हणाले की, कामगारांनी श्रम करणे थांबवले तर सगळं जग थांबेल. कामगारांचे निर्मिती व श्रमाचे कौशल्याची जोड नसेल तर भांडवलदारांचे भांडवलही व्यर्थ ठरेल. कामगारांचे जीवनमान अधिक उंचावून समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेत भोजन देतांना संबंधितांना अन्नदानाची भावना ठेवावी. ही सेवा आहे हे ध्यानात ठेवावे. या योजनेद्वारे कामगारांना दिलासा मिळेल असा विश्वास पालकमंत्री कडू यांनी व्यक्त केला.
त्यानंतर पालकमंत्र्यांनी व उपस्थित मान्यवरांनी स्वतः कामगारांना भोजन थाळी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जया भारती यांनी केले.
_____________________________________________
*पालकमंत्र्यांनी केले कलागुणसंपन्न बालिकांचे कौतूक*
अकोला- दि.26राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कलागुण संपन्न असलेल्या दोन बालिकांचे कौतूक करण्यात आले. त्यात वैभवी विलास गवई या दिव्यांग बालिकेने गायलेल्या बेटी बचाओचा संदेश देणाऱ्या गिताच्या व्हिडीओचे विमोचन केले. तसेच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवणारी पूर्वा प्रमोद बगळेकर या बालिकेचेही त्यांनी कौतूक केले. या वेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.
______________________________________________
*लालबहादुर शास्त्री स्टेडियम येथे साकारली भव्य रांगोळी*
अकोला,दि.26 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लालबहादुर शास्त्री स्टेडीयम येथे भव्य रांगोळी साकारण्यात आली.राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनीही आज या रांगोळीची पाहणी केली व कलावंतांची प्रशंसा केली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, नितीन खंडागळे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, आदी उपस्थित होते.
मोक्षता आर्ट ॲण्ड इव्हेंटच्या संचालक अमृता सेनाड व त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळीव्दारे भव्य प्रतिमा निर्माण केली आहे. सलग बारा तासात साडेपाच हजार स्केअर फुट जागेवर दोन हजार किलो रांगोळीचा वापर करुन रांगोळी साकारली. या भव्य रांगोळीची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवर झाली असल्याची माहिती अमृता कुशल सेनाड यांनी दिली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून व निवासी उपजिल्हाधिकार संजय खडसे यांच्या मार्गदर्शनात भव्य रांगोळी साकारण्यात आली असून त्यासाठी जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले यांनी समन्वयक म्हणून काम केले.
______________________________________________
*नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी लवकरच मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन- पालकमंत्री बच्चू कडू*
अकोला,दि.२६ प्रस्तावित नवीन पदवीपूर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेला वित्तीय तरतूदीसाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी लवकरच मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
अकोला येथे नविन पदवीपूर्व पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या कामाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नवीन पदवीपुर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. मिलिंद थोरात, सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली की, या प्रकल्पासाठी २७.१४ हेक्टर आर जमिन प्राप्त झाली असून हस्तांतरण प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. तथापि, या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ, पायाभुत सुविधा निर्मितीसाठी वित्तीय तरतूद केल्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करणे आवश्यक आहे, त्याशिवाय भारतीय पशुचिकित्सा परिषदेकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविता येणार नाही. त्यासाठी हा मान्यतेचा प्रस्ताव पाठविण्यासाठी शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित व्हावा, यासाठी मंत्रालयस्तरावर लवकरात लवकर बैठक आयोजित करावी,असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले. या प्रकल्पाची एकूण किंमत ३५० कोटी रुपये असून एकूण ३३० पदांची आवश्यकता असणार आहे. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पशु महाविद्यालयात १३० पदांना मान्यता असल्याने २०० पदे निर्माण करुन भरावी लागतील. त्यांची निर्मिती व नियुक्ती ही महाविद्यालय सुरु होतांना टप्प्या टप्प्याने करता येणे शक्य आहे,असेही यावेळी सांगण्यात आले.
______________________________________________
*विशेष पथकाकडून दारू जप्त*
अकोला - दि, 26 विशेष पथक अकोला यांना खात्रिलायक खबर मिळाली कि ग्रा. कौलखेड जहागीर येथील सिंधूताई सुधाकर तायडे ही तिच्या राहते घरी विना परवाना दारू ची विक्री करत आहे अश्या खात्री लायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून रेड केली असता तिच्या कबज्यात नग, देशी दारू बॉबी संत्रा चे 124नग असा एकूण 7440रु.चा मु्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध महा. दारूबंदी कायदा कलम 65 ई कायदयाचे अन्वये पो. स्टे.बोरगाव मंजू येथे गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे...
तसेच पेट्रोलिंग दरम्यान खात्रिलायक खबर मिळाली कि ग्रा.काटेपूर्णा येथील देवानंद श्रवण वानखडे हा त्याच्या राहते घरी विना परवाना दारू ची विक्री करत आहे अश्या खात्री लायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून रेड केली असता तिच्या कबज्यात नग, देशी दारू बॉबी संत्रा चे 93 नग असा एकूण 2790रु.चा मु्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध महा. दारूबंदी कायदा कलम 65 ई कायदयाचे अन्वये पो. स्टे.बोरगाव मंजू येथे गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे...
*सदरची कारवाई मा. पो अधीक्षक सा. जी. श्रीधर सा.,अपर पो. अधीक्षक एम.राऊत मॅडम,यांच्या मार्गदर्शन खाली पो. नि. विलास पाटील सा.आणि विशेष पथकने केली.
______________________________________________
*स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या कडून मोटर सायकल चोरी करणा-या आरोपीस जेरबंद*
अकोला -दि, 26 स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या कडून मोटर सायकल चोरी करणा-या आरोपीस जेरबंद
करून त्यांने चोरी केलेल्या ०३ मोटर सायकल जप्त करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत
स्थानिक गुन्हे शाखा येथील तपास पथकाला दि. २५/१/२०२२ रोजी गोपणीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमी वरून मोटरसायकल चोरी करणारा गुन्हेगार नामे शेख जुबेर उर्फ कुरशीद शेख अयुब वय २३ रा. विकास नगर गायगांव ता बाळापुर अकोला, यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता सांगितले की, त्यांने पो.स्टे. बाळापुर अप न ६६८/ २०२० कलम ३७९ भादवी मधील चोरी गेलेली हिरो एच एफ डिक्स मोसा कंमाक एम एच ३० ए डब्ल्यु ६०७६ किंमत अंदाजे २५,०००/- रूपये तसेच हिरो होन्डा प्लस विना क्रमाकाची किंमत अंदाजे २५,०००/-रूपये व बाजाज डिस्कवर १३५ विना कंमाक किंमत अंदाजे २०,000/ रूपये असा ७०,००० किंमतीची मोटर सायकल जप्त करून तपास कामी पोस्टे बाळापुर यांच्या ताब्यात आरोपीस देण्यात आले. तसेच पोस्टे बोरगांव मंजु अप.न ३२२/१९ कलम ३७९ भादवी व पोस्टे उरळ अपन २६१/२१ कलम ३७९ भादवी मधिल यापुर्वी जप्त करण्यात आलेल्या मोटर सायकली चोरी केल्याचे कबुली दिली.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. जी श्रीधर सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मोनिका रात मॅडम यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, पोउपनि. गोपाल जाधव ए. एस. आय. दशरत बोरकर नापोकॉ गोकुळ चव्हाण पो.कॉ स्वप्नील खेडकर पो.कॉ लिलाधर खंडारे पो. कॉ शेख अन्सार चालक. ना. पो. कॉ. नफिस व अक्षय बोबडे यांनी केली.
______________________________________________
एस टी महामंडळ संपकरी कर्मचाऱ्यांचा भीक मांगो आंदोलन सविस्तर बातमीचा व्हिडिओ.