*अखेर मंत्रालय दिले महानगरपालिकेतील भ्रष्टाचारा च्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश*
*मनपातील सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप.....*
अकोला=गेल्या 2014 पासून केन्द्रात भारतीय जनता पार्टी ची संत्ता असुन मा.पंतप्रधानांनी "न खाऊंगा न ही खाने दूंगा"असा नारा देत भ्रष्टाचार करणाऱ्याना आळा घालण्याचे काम केले परंतु अकोला मनपात तिला खुद्द सत्ताधारी नगरसेवकांनी भ्रष्टाचार करून मोदी सरकार ला घरचा अहेर देण्याचे कार्य केले. कुठे गेले ते आमदार जे विकासासाठी जिल्हाधिकार्याना खडे बोल सुनावणारे. संत्य लढा नेहमीच मनपातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकत होता हे उल्लेखनीय.शौचालय घोटाळा, कर आकारणी, अम्रुत योजना,पोकलँड,विद्युत, ठेकेदारी,मोबाईल टाँवर,खुले भुखंड,भाड्याने वाहन,जंपीग पदोन्नती,अग्रिम धन,हळदी कुंकू, सायकल घोटाळा वगैरे वगैरे हे सर्व घोटाळे करण्यात पटाईत जंपीगवाल्यावर या आधीच कार्यवाही झाली असती तर प्रशासनावर ही वेळ आली नसती.या सर्व प्रकारास नगरसचिव अधिकारी जवाबदार आहेत. अशी चर्चा मनपा वर्तुळात होत आहे,शहराचे नगर सचिव खूप मोठे पद आहे संपूर्ण शहराची जवाबदारी याचे वर असते.विषेशतः ते प्रशासनाचे असतात नाही कोणत्याही पार्टीचे असतात.परंतु पदाची लालच आणि पैशाचा मोह असलेल्या माणसाला आपण काय करतो ह्याची जाणीव नसने म्हणजे मी नाही त्यातली..सारखा प्रकार दिसून येतो.शहरातील नागरिकावर आडमाप कर लादुन भाजपाने अंन्याय केल्याचे यावरून दिसून येते.नाहीतर काय गरज होती काळ्या यादितील स्थापत्य कन्सल्टन्सी प्रा.लि.कंपनीला ठेका द्यायची.प्राप्त माहिती नुसार दोन कोटी ची रक्कम ठराव न घेताच या कंपनी ला दिल्याची चर्चा मनपात सुरू आहे.याची चौकशी या निमित्ताने व्हायला पाहिजे.याच कालावधीत 29 कोटींचा शौचालय घोटाळा उघडकीस आला असून आजपर्यंत हे करणारे मोकाट कसे काय? महाराष्ट्र शासनाने अकोला आयुक्तावर जवाबदारी दिली असुन आयुक्त महोदया तपास करत आहेत. नक्कीच त्याना झालेला प्रकार लक्षात येईल. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल कारण दस्तावेज स्वता जवळ असल्यावरही ठरावाच्या काँप्या बाहेर कश्या गेल्या यावर चिंतन करण्याची गरज आहे. कोण आहे तो झारीचा शुक्राचार्य, कंस मामा.जो सर्व गुप्त माहिती लिक करत आहे. जंपीगवाल्ये विधी तज्ञाची प्रकृती खराब झाली की केल्या गेली हा विषय संशोधनाचा आहे. आता असे अनेक विभाग प्रमुखांचे उदाहरण समोर येतील यात शंका नाही. आतातरी मा.आयुक्तांनी सावध राहण्याची चर्चा शहरात होत आहे. या आधीही मुलेप संजय राठी आत्महत्या,तत्कालीन आयुक्त गिरधर कुर्वे, चंद्रशेखर रोकडे,बिपिन शर्मा,उत्कर्ष गुठे,यावरही गून्हे दाखल झाले आहे यास ही मनपातील बोगस अधिकारी जवाबदार आहे. यासर्व प्रकारावरून एक गोष्ट लक्षात येते की घरका भेदी लंका ढाये सत्ताधाऱ्यांना सुरुंग लावण्यासाठी बाहेर चे कोणीच नसुन स्वताच सत्ताधारी वाले जिम्मेदार आहे. यावर मा.आयुक्त झालेल्या ह्या भ्रष्टाचारावर कश्याप्रकारे लगाम लावतात यावर सर्व शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
____________________________________________________