कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा  दिलासा.

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा  दिलासा.


मुंबई दि17:  कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.


या शासन निर्णयात म्हटले आहे की,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि.३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरांतीसाठी "एक वेळची विशेष बाब" म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.


 कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक, या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल, अशा प्रकरणी देखील ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी देखील "एक वेळची विशेष बाब" म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी देखील दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने "एक वेळची विशेष बाब" म्हणून परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल.

______________________________________________

*कोविड 19 मध्ये मरण पावलेल्या वारसांना 50 हजार अनुदान देण्याचा राज्य शासनाचा निर्णय*


_____________________________________________

**घरगुती गैस सिलेंडर खाजगी वहानाचे ऑटो रिक्शा मध्ये भरने साठी साठवानुक करून घरगुती गैस सिलेंडर ची कालाबाजारी करणारे इसमावर छापा ,19 घरगुती गैस सीलेड़र 2 गैस भरणेची मशीन व इतर साहित्य 1,50,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त, विशेष पथकाची कार्यवाही**

अकोला - दि, 17  रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की, जुनेशहर हमजा प्लॉट कडबा कटर जवळ  एका गोडावून मध्ये विनापरवाना घरगुती गैस सिलेंडर हे खाजगी ऑटो रिक्शा वहानाचे मध्ये भरले जातात त्यासाठी गोदावून मध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गैस सिलेंडर साठवून करून ठेवलेले आहे व जास्त दराने जास्त किमतीत ते विक्री करून घरगुती गैस ची कालाबाजारी करीत आहे अशा ख़बरेवरुन छापा मारलाअसता आरोपी रुस्तम भीमराव शीतले वय 35 वर्ष रा जेतवन नगर खदान याच्या जवळून गोदावून मधून 19 भरलेले गैस सिलेंडर व 2 गैस भरनेच्या मशीनरी , 1 गैस वजन करनेचा वजनकाटा  व इतर साहित्य असा 1,50,000 रूपयांचा मुद्देमाल घटनास्टलावरुणं जपत करण्यात आला आहे, आरोपी विरुद्ध भारतीय जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3, 7 अनवाये गुन्हा पो स्टे जुनेशहर येथे दाखल करण्यात आलेला आहे, 

सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक  जी श्रीधर सर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राउत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  विलास पाटिल, त्यांचे पथक मधील पो हवा तुरकर, मालिये, एजाज अहमद यांनी केली,




_____________________________________________

*पातुर येथील लाभक्षेत्र व बुडीत क्षेत्रावरील जमिन खरेदी विक्री व्यवहारावरील निर्बंधात सुट*


 अकोला, दि.१७ पातुर लघु पाटबंधारे प्रकल्पातील उच्च चिंचखेड व सावरखेड येथील बुडीत क्षेत्र ३२.४० हे.आर तसेच चिंचखेड, बोडखा व पातुर येथील लाभक्षेत्र २९० हेक्टर आर क्षेत्रातील जमीनीच्या हस्तांतरण, पोटविभागणी, विभाजन, स्थानांतरण व खरेदी विक्रीवर लागू असलेले निर्बंध उठविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  निर्गमित केले आहेत.


या संदर्भात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी प्रमाणित केले आहे की,  या प्रकल्पाचे भूसंपादन तथा पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पासाठी आणखी खाजगी जमीन  संपादन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्री हस्तांतरण व्यवहारावरिल निर्बंध उठविण्याट यावे,असा प्रस्तावही सादर केला होता. त्यानुसार ह्या गावाच्या परिमंडळातील जमिनीच्या हस्तांतरण, पोटविभागणी, विभाजन, स्थानांतरण व खरेदी विक्रीवर लागू असलेले निर्बंध भुसंपादन अधिकारी यांचेकडे सुरु असलेल्या प्रकल्पा व्यतिरिक्त लाभक्षेत्रातील जमीनीचे खरेदी विक्री व्यवहारावरील निर्बंध उठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

_____________________________________________

*अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त आज (दि.१८)व्याख्यान*


 अकोला, दि.१७  अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने  ‘अल्पसंख्याक यांना त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव’  या विषयावर व्याख्यानाचे शनिवार दि. १८ रोजी लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे आयोजीत करण्यात आले आहे.


या कार्याक्रमाला कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात व्याख्याते जेष्ठ विधीज्ञ ॲड. मोहम्मद डोकाडिया,भारतीय बौद्ध महासभाचे अध्यक्ष पी.जे. वानखडे, सचिव डॉ. एम.आर.इंगळे,महाराष्ट्र राज्य अप्लसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहेल परवेज अली, सचिव अलिम देशमुख व ॲड. नजीब शेख उपस्थित राहून प्रबोधन करणार आहे.   या कार्यक्रमाचे संयोजन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व समन्वयन गजानन महल्ले यांनी केले आहे.


------------------------------------------------------------------------------------

______________________________________________

*स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्थेचा उपक्रम; पशूंमधील आधुनिक भुलपद्धतीः एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक*

अकोला, दि.१७ पाळीव किंवा वन्य पशूंमध्ये औषधोपचार करताना पशुवैद्यकांनी शस्त्रक्रियेदरम्यान भूलतंत्रज्ञानाच्या नवनवीन पद्धती जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असून यामुळे पशूंच्या वेदना पातळीत घट होऊन शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक विद्याशाखा, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर यांनी व्यक्त केले.

येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत येथे महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक संघटना (MSVC) यांचे संयुक्त विद्यमाने आणि भारतीय पशुवैद्यक परिषद (VCI) पुरस्कृत ‘पशूंमधील सर्वसाधारण भूल पद्धती’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाचे आयोजन (दि.१५) निरंतर पशुवैद्यक शिक्षण (CVE) कार्यक्रमांतर्गत करण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. उपाध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथि भारतीय पशुवैद्यक परिषद तथा मा. सदस्य - कार्यकारिणी परिषद, मपमविवि, नागपुर डॉ. संदीप इंगळे, डॉ. एस. सेंथिल कुमार, तंजावर हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफल देऊन स्वागत केले.प्रास्ताविक संयोजक समन्वयक पशू शल्यचिकित्सा व क्ष किरण विभाग प्रमुख  प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांनी केले.


उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. उपाध्ये यांनी पशूंच्या शस्त्रक्रियेदरम्यान असलेले भूल तंत्रज्ञान पद्धतीचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले.डॉ. इंगळे यांनी पशूवैद्यकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत पशूसेवेचा वसा जपण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या प्रशिक्षणात पशूसंवर्धन विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातून सहाय्यक आयुक्त पशूसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी तसेच अकोला व नागपुर येथील प्राध्यापकवृंद आणि


स्नातकोत्तर पशूवैद्यक विद्यार्थी मोठ्या संख्येने कोविड नियमावलीचे पालन करत उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी केले. उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना याप्रसंगी डॉ. सेंथिल कुमार, डॉ. थोरात आणि डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी लहान व मोठ्या पशूंमध्ये भूल (anesthesia) देण्याच्या विविध तंत्रज्ञानाची ओळख प्रात्यक्षिकच्या माध्यमातून करून दिली.


समारोपप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. व्ही.बी. देशमुख, डॉ. अवघड, डॉ. आखरे आणि डॉ. पंकज घावट यांनी समाधानकारक प्रतिक्रिया देत प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभिप्राय व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. दिघे यांनी  पशूवैद्यकांनी भूल पद्धतीचा उपयोग आत्मविश्वासपूर्ण तर्‍हेने करण्याचे मत प्रतिपादित केले. याप्रसंगी सूत्रसंचालन डॉ. प्रवीण बनकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राऊळकर यांनी केले. या प्रशिक्षणासाठी डॉ. चैतन्य पावशे, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. श्याम देशमुख, डॉ. महेश इंगवले, डॉ. राऊळकर, डॉ. कुरळकर यांचेसह डॉ. रत्नपारखी, डॉ. काळे, तसेच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



_____________________________________________

*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; भित्तीचित्र स्पर्धेस प्रारंभ*

 

अकोला, दि.१७  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला व डॉ. बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील एतिहासिक स्थळे, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची माहिती, स्वच्छता इ. विषयावर भितींवर चित्रकलेद्वारे  प्रदर्शित केली जाणार आहे. आज जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवार भिंतीवर चित्रण करुन या स्पर्धेस आज प्रारंभ झाला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, डॉ. बाबासाहेब ढोणे महाविद्यालयाचे  प्रा. गजानन बोबडे आदी उपस्थित होते. या भित्तीचित्र स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ७५ चित्रकार व  चित्रकला महाविद्यालयातील  विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.  या स्पर्धेत शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, प्रमुख घटना, स्वच्छतापर संदेश, पर्यावरण, जिल्ह्यातील महत्वाचे स्थळे अशा विविध  विषयाचे चित्रण केले जाणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यात प्रथम पारितोषिक पाच हजार, व्दितीय पारितोषिक चार हजार व तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये आहे. या स्पर्धेला नाशिकचे चित्रकार बाळ नगरकर व हिंगणघाटचे चित्रकार हेमंत मोहड हे परीक्षक  म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.



_____________________________________________

*अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, अकोला यांनी पो.स्टे बार्शिटाकळी जिल्हा अकोला येथील अपराध क ४१४ / २१ कलम ३६३ भादवि दाखल गुन्हा उघडकिंस*


अकोला- अकोला जिल्हयामध्ये मा. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर सा. तसेच मा. पोलीस अधिक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६ (अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने मागिल महीन्यापासुन आजपावेतो एकुण २५ गुन्हे व ६ निर्सिंग उघडकिस आणले आहेत.


पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे अपराध क्रमांक ४१४ / २०२१ कलम ३६३ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल असुन गुन्हा प्रलंबित होता. पो स्टे बार्शिटाकळी येथुन गुन्हयाचा तपास दिनांक ०८/१२/२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला कडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्हयातील पिडीत मुलीबाबत शोध घेत असतांना गुप्तबातमीदारांमार्फत माहीती मिळाल्याने लागलीच अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील पिडीत मुलगी हीचा शोध घेवुन ताब्यात घेतले. त्यानंतर पिडीत मुलीला विश्वासात घेवुन विचारपुस करून टाकळी पो.स्टे ला रितसर ताब्यात देण्यात आले.


मा. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर सा तसेच मा अपर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कामगिरी ही पोनि श्री संजय खंदाडे, सपोनि प्रिती ताटे, सपोनि महेश गावंडे, अंमलदार, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, पोहेकॉ धनराज चव्हाण, नापोको आशिष अघडते, मपोकॉ पुनम बचे, मपोकॉ करिष्मा गावंडे यांनी केली असून लवकरच इतर गुन्हयामध्ये सुध्दा तत्परतेने पिडीत मुली व आरोपी यांचा कसुन शोध घेऊन गुन्हयांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करित आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने