कोविडमुळे मृत व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांस सानुग्रह अनुदान*
*लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*
अकोला,दि.१५ कोविड १९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांना ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर कोविड मुळे मृत पावलेल्या व्यक्तिंच्या नातेवाईक, वारसांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती-
त्यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉग ईन करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड (पीडीएफ, जेपीजी), मृत्यू प्रमाण पत्र(पीडीएफ, जेपीजी), अर्जदाराचा आधार संलग्न बॅंक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते कमांक दिलेल्या बॅंक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी),आणि रुग्णालयाचा तपशिल आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस कोविड १९ चे निदान झाले असे कागदपत्र (पीडीएफ, जेपीजी), तसेच कुटुंबातील सर्व वारसांचे हमीपत्र व स्वयंघोषणा पत्र अपलोड करावे. या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळविण्यासाठी लॉग ईन करता येईल. अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in वर Document Required या टॅब वर उपलब्ध आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह सहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.
-------*-----------------*------------***-----------------*----------------------
जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी ‘जलशक्ती अभियान’*
अकोला, दि.15 जलसंधारणाच्या विविध उपचारांचा अवलंब करुन जलस्त्रोत्यांचे बळकटीकरण करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरचे बांधकाम व दुरुस्तीद्वारे पाण्याचा साठा वाढविणे, अस्तित्वातील तलाव-जलस्रोतांचे पुनरूज्जीवन करणे, पावसाळ्यापूर्वी नद्यांचे पुनरूज्जीवन करणे, सर्व पाणीसाठवण बांधकामांची, योजनांची जीओ टँगिंगसह प्रगणना करणे, जलसंधारण आणि जलसंधारण संरचनेसाठी वैज्ञानिक योजना करणे व जलशक्ती केंद्राची स्थापना करणे आदि उद्धिष्टांवर आधारित जलशक्ती अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत वैज्ञानिक जिल्हास्तरीय जलसंधारण योजनेचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांचे मार्गदर्शनात शाखा अभियंता संजय कुंभारे केंद्रामध्ये तांत्रिक सहाय्यक कामकाज पाहणार आहेत. या अभियानानिमित्त जलशक्ती केंद्र फलकाचे अनावरण जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी राजेश गिरी, लेखाधिकारी परळीकर, शाखा अभियंता संजय कुंभरे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
--------------*-----------------*-----------------*--------------*---------------
जिल्ह्यात कलम 36 अन्वये स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान*
अकोला,दि.15 जिल्ह्यात ग्रामपंचायत पोट निवडणूक मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या कालावधीमध्ये शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे पेक्षावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना बुधवार दि. 15 रात्री आठ वाजेपासून ते गुरुवार दि. 23 डिसेंबरचे रात्री 12 वाजेपर्यत जादा अधिकार प्रदान केले आहेत. यात रस्त्यावरुन जाणाच्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक अशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी या विषयी निर्देश देणे. मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवून न देणे. अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नद्यांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धूण्याचे, उतरण्याचे ठिकागी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्यावे किंवा गाण्याचे किंवा ढोल, ताश, शिट्टया व इतर कर्कश वाद्य वाजविणे इत्यादी बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक उपहाराच्या (अतिथीगृहाच्या) जागेत ध्वनीक्षेपकाचा(लाऊडस्पिकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांचे कलम 33,36,37 ते 40,42,43 व 45 अन्वये कलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पूष्टी देणारे योग्य आदेश देणे इ. अधिकारांचा समावेश आहे. या आदेशाचे कोणीही, कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास पोलीस आधिनियम कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आदेशात नमूद केले आहे.
----------------------------------+++-*------+++++-------------------------
उद्यापासून (दि.१७) दिव्यांगांची नोंदणी;*
*विविध योजनाचा मिळणार लाभ*
अकोला, दि.१५ जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी शुक्रवार दि. १७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत दिव्यांग नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. नागरी भागातील मोहिमेकरिता महानरपालिका, नगरपरिषद, नगरपंचयातीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रभाग निहाय पथके तयार करण्यात आले आहेत. तरी दिव्यांगांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
नागरी भागात प्रभागनिहाय तयार केलेल्या पथकाव्दारे दिव्यांगाच्या सर्वेक्षणास शुक्रवार दि. १७ पासून सुरूवात करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात या कालावधीत घरोघरी पथकाव्दारे भेटी देऊन दिव्यांगांना मार्गदर्शन करतील. तसेच आपले सरकार सेवा केंदात दिव्यांगांचे नि:शुल्क नोंदणी केली जाईल. नोंदणी मोहिम दि. १७ ते ३१ या कालावधीत नि:शुल्क होणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरी भागातील दिव्यांगांनी आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
---------*-------------------------------------*---------------------------------
*विशेष पथकाची मलकापूर येथे अवैध दिरू विक्री करणाऱ्या धाड*
अकोला दि : १५ रोजी विशेष पथक मा पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या आदेशाने पो स्टे खदान हदित अवैध धंद्यांवर रेड करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दारकडून खात्रीलायक बातमी मिळाली की एक इसम शिवणी बायपास जवळ एका टीन टपरी मध्ये अवैध रित्या दारू बाळगून विक्री करीत आहे तेथे धाडी टाकली असता एक इसम बसंता सुखदेव दारोकार रा अटकरी ता तेल्हारा हा आपल्या दुकानात अवैध रित्या दारू बाळगून विक्री करताना मिळून आला त्याच्या जवळून टेंगो पंच सखू संत्रा चे ४८ कवॉटर किंमत ३,८४० रू चा मुदेमाल जप्त करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध पो स्टे खदान येथे महाराष्ट्र दारू बंदी कायदा अण्वे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
*सदर कार्यवाही मा पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकाने केली*
------------------+-+-------++++++--------------++++------------++++