सत्य लढा न्यूज विदर्भ माझा पार्टी अकोला मनपा निवडणूक मध्ये 50 टक्के आरक्षण महिलांना देणार आहे -टाले.

 अकोला  ---महानगरपालिका विकास आराखडा

वित माझा पार्टी ची स्थापना ही विदर्भ राज्याची स्थापना होदुन विदर्भाचा विकास करण्याच्या उद्देशाने केलेली आहे. अकोला महानगर पालिकेच्या होउ  घातलेल्या निवडणुका विदर्भ माझा पार्टीने  लढविण्याचे ठरविले आहे. त्याबाबत अधिकृत घोषणा दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी विदर्भ माझा पार्टीचे कार्यालय नागपूर येथे पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजकूमार तिरपुडे यांनी केले. त्यावेळी महासचिव मंगेश तेलंग, जिल्हाध्यक्ष अजाबराव टाले, गणेश गौरखेडे, महासचिव राहुल जाधव व प्रसिध्द प्रमुख संघपाल शिरसाट हजर होते. अकोला शहराच्या सर्वागीण विकासासाठी विदर्भ माझा पार्टी कटीबध्द असुन शहरात होत।नसलेल्या विकासावर  पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपूड़े यांनी भाष्य केले, शहराच्या विकासासाठी विदर्भ माझा पार्टीचा जाहीरनामा व विकासलामा त्यांनी प्रसिध्द केला व आराखडा सुध्दा बनविला आहे. विदर्भ माझा पार्टी स्त्रियांना ५० टक्के उमेदवारी देणार  आहे., विदर्भ माझा पार्टी अकोला महानगर पालिकेची निवडणुक समविचारी पक्षाला सोबत।घेवुन लढविनार  आहे,, विदर्भ माझा पार्टी शहरातील नागरीक सुविधा ज्यामध्ये अवास्तव लावलेला रस्ताकर,  अग्नीशमन कर, शिक्षणकर, वृक्षकर, रो.ह.उपकर आणि शिक्षण उपकर माफ करेल. शहरातील घणकचरा समस्या, डम्पींग ग्राउंड समस्या, फुटपाथ वाल्यांची समस्या याचे  निराकरण करून निकृष्ठ रस्त्याची समस्या, रहदारीवरील नियंत्रण, प्रदृषण नियंत्रण, खुली उद्याने  व शहराच्या स्वच्छतेची उपाययोजना करून सोडविण्याची घोषणा केली आहे.,अकोला महानगर पालिकेत असलेला प्रचंड भ्रष्टाचार व त्यामुळे नागरीकांना होत

असलेल्या अतोनात यातना यातुन विदर्भ माझा पार्टी नागरीकांची सोडवणुक करण्याचा प्रयत्न करेल. डाबकी रोड खुल्या मैदानाचे सुशोभीकरण करणे. त्या अनुषंगाने अकोला शहराचा सुध्दा विकास समीत आहे. या सर्व समस्या

सोडवणुक करण्याबाबत विदर्भ माझा पार्टी अकोला महानगर पालिका निवडणुक लढविण्याचे असल्याची माहिती आज अकोला जिल्हाध्यक्ष आजाबरव टाले यांनी आज  पत्रकार परिषदेत सांगितले  या  पत्रकार परिषदेत राहुल जाधव जिल्हा महासचिव, गजानन हरणे, अभिषेक नहाटे, आदींची उपस्थिती होती.






______________________________________________

कोविड लसीकरणास नागरिकांनी

प्रतिसाद द्यावा-जिल्हाधिकारी निमा अरोरा.

अकोला,दि.१६  कोविड लसीकरणाचे लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’, ही मोहिम सुरु करण्यात आली असून मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. यासंदर्भात आज जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत त्यांनी यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले.


जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो-पटोकार, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली गेल्या १० तारखेपासुन लसीकरणाची विशेष मोहिम सुरु झाली असून लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसादही झाला आहे. गेल्या पाच दिवसांत पहिला डोस घेतलेल्या व्यक्तिंचे प्रमाण आता ५९ टक्के झाले असून दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण २७.२१ टक्के आहे. लोकांना लसीकरणाचे फायदे समजावणे, लोकांना आवाहन करणे, त्यासाठी प्रत्यक्ष कॉल करणे इ. उपाययोजनांसोबत रेडिओ व अन्य माध्यमांद्वारे जनजागृती करणे या उपायांचा अवलंब जनजागृतीसाठी करण्यात येत आहे. ग्रामपातळीवर तसेच  शहरातही स्थानिक यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगावे,असे निर्देश श्रीमती अरोरा यांनी दिले.

______________________________________________

बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू.

अकोला, दि.16  सामाजिक न्याय विभागामार्फत बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय मुलांचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. मागास  प्रवर्गातील होतकरु विद्यार्थ्यांना गुणवत्ते व जातीनिहाय ऑफलाईन इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या परीक्षेत प्रवेश देण्यात येणार आहे. वसतीगृहात प्रवेशितांना मोफत भोजन, निवासव्यवस्था, शैक्षणिक साहीत्य, निर्वाह भत्ता व स्वच्छता भत्ता दिला जातो.  प्रवेश प्रक्रिया विद्यालय व महाविद्यालय येथे प्रवेशाकरीता राबविल्या जात आहे, असे बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे.

______________________________________________

तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या

सभापती पदांची सोमवारी(दि.22) निवडणूक.


अकोला,दि.16   जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या तेल्हारा व अकोला पंचायत समितीमधील रिक्त सभापती पदाच्या निवडणूक मंगळवार दि. 22 रोजी होणार आहे. या निवडणूकीकरीता तेल्हारा व अकोला तालुक्यातील तहसिलदार यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्त पदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार सभापती पदाची निवडणूकीकरीता अध्यासी अधिकारी सोमवार दि.22 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारतील व दुपारी तीन वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेत सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडेल. तेल्हारा पंचायत समितीचे सभापती पद महिला तर अकोला पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण मागासवर्ग प्रवर्गातील राहतील. ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

______________________________________________

नामनिर्देशन पत्र मंगळवार(23)पर्यंत दाखल.

अकोला,दि.16   निवडणूक आयोगाने अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दि. 16 ते 23 नोव्हेंबरपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी 11 ते 3 वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावे, असे अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  कळविले आहे.


नागनिर्देशनाकरीता कागदपत्रे : नामनिर्देशन सादर करतांना नमुना 2 ई नामनिर्देशनसोबत विहीत नमुन्यातील प्रतिज्ञालेख (नमुना26) नोटरी केलेली असावी, अनामत रक्कम 10 हजार रुपये, अनुसूचित जाती-जमातीचे उमेदवाराकरीता पाच हजार रुपये राहिल. अनुसूचति जाती-जमातीचे असल्याबाबत पुरावा सादर करणे आवश्यक, उमेदवार ज्या मतदारसंघातील मतदार आहे त्या मतदारसंघातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदार यादीची प्रमाणित प्रत, अलीकडील पासपोर्ट(2x2.5सेमी) आकाराचे दोन फोटो व फोटोच्या मागील बाजुस उमेदवारांची स्वाक्षरी असणे आवश्यक, मानत्या प्राप्त किंवा नोंदणीकृत पक्षातर्फे नामनिर्देशनापत्र सादर करतांना फार्म एए व फार्म बी सादर करावे.तसेच नामनिर्देशनपत्रावर दहा सुचकांची स्वाक्षरी घेणे आवश्यक राहील.   


नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचे वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात फक्त तीन वाहन तसेच पाच व्यक्तींना प्रवेश अनुज्ञेय राहिल, असे पत्राव्दारे कळविले आहे.

_____________________________________________

एपीजीपी व्‍दारा टाकण्‍यात आलेल्‍या पाईपलाईनच्‍या रस्‍त्‍यांची मनपा आयुक्‍त यांनी केली पाहणी.


अकोला दि. 15 नोव्‍हेंबर रोजी मनपा आयुक्‍त कविता व्दिवेदी यांनी अमृत अभियान अंतर्गत अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये टाकण्‍यात आलेल्‍या पाईपलाईनमुळे खोदण्‍यात आलेल्‍या अंतर्गत रस्‍त्‍यांच्‍या दुरूस्‍तीच्‍या कामाची पाहणी केली. ज्‍यामध्‍ये ज्‍योति नगर, गुरूदेव नगर, पोळा चौक येथील पोलीस चौकी, आदर्श कॉलोनी जलकुंभ जवळील आदि रस्‍त्‍यांची पाहणी केली.


         दुरुस्ती केलेल्या रोड चे काम व्यवस्थित न झाल्याने रोड नादुरुस्त झाले आहेत आणि रोड दुरुस्तीचे कामाबाबत विलंब होत असल्याने तसेच कामे व्यवस्थित न झाल्याने कंत्राटदारांचे देयकातून पैसे कपात करण्यात आले होते त्यानंतर मजीप्रा तसेच म न पा विभागा मार्फत संयुक्तिक पणे तपासणी करण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते परंतु माजीप्रा PDMC असूनही अद्यापही मजीप्रा यांनी यादी दिली नाही त्यामुळे तपासणी न झाल्याने कंत्राटदाराने कामे बंद केली आहेत. सदर रस्‍त्‍यांची मनपा आयुक्‍त यांनी पाहणी केली असता वरील ठिकाणी रोड दुरुस्तीचे काम व्यवस्थित न झाल्याचे आढळून आले. यावेळी मनपा आयुक्‍त यांनी मनपा जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग आणि एम.जी.पी. यांनी संयुक्‍तरित्‍या तपासणी करून सदर रस्‍ते  तातडीने दुरूस्‍त करण्‍याबाबतची कार्यवाही करावी तसेच दुरूस्‍ती अंतर्गत डांबरी रस्‍त्‍यांच्‍या जागी डांबरी रस्‍ते आणि कॉंक्रीट रस्‍त्‍यांच्‍या जागी कॉंक्रीट रस्‍ते तयार करण्‍यात यावे अशा सुचना दिल्‍या.


यावेळी जलप्रदाय विभागाचे प्र.कार्यकारी अभियंता ए.जी.ताठे, मनपा आयुक्‍त यांचे स्विय्य सहाय



क जितेंद्र तिवारी, जलप्रदाय विभागाचे अभियंता नरेश बावणे, कैलास निमरोट आदींची उपस्थिती होती.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने