लसीकरणाबात मनपा उपायुक्‍त डॉ.जावळे यांनी घेतली महाविद्यालयातील एनएसएस* *को-ऑर्डिनेटर यांची बैठक*.

 लसीकरणाबात मनपा उपायुक्‍त डॉ.जावळे यांनी घेतली महाविद्यालयातील एनएसएस

को-ऑर्डिनेटर यांची बैठक.

अकोला दि. 16 नोव्‍हेंबर 2021  – अकोला महानगरपालिका क्षेत्रामधून कोरोना आजारामुळे होणा-या मृत्‍यु टाळण्‍यासाठी आणि कोरोना आजारावर संपुर्णपणे आळा घालण्‍याकरीता शहरातील प्रत्‍येक नागरिकानी कोरोना लस घेणे अत्‍यंत आवश्‍यक असून आज दि. 16 नोव्‍हेंबर 2021 रोजी मनपा उपायुक्‍त डॉ.पंकज जावळे यांनी त्‍यांच्‍या दालनात शहरातील महाविद्यालयातील एन.एस.एस. को-ऑर्डिनेटर यांची विशेष बैठक घेतली.

             या बैठकीमध्‍ये उपायुक्‍त डॉ.जावळे यांनीकॉल सेंटर करीता प्रत्‍येक कॉलेज मधून विद्यार्थ्‍यांची दोन टीम तयार करणेकॉलेज परिसरात पथनाट्यव्‍दारे लसीकरणासाठी जनजागृती करणेशहरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थीविद्यार्थ्‍यांचे पालक व घरातील सर्व सदस्‍यांची लसीकरण करून घेणेशहरात कमी प्रमाणात लसीकरण झालेल्‍या भागामधील नागरिकांना लस घेणे संदर्भात प्रोत्‍साहीत करून लाभार्थ्‍यांना नजीकच्‍या लसीकरण केंद्रावर आणणेविद्यालय परिसरात माझे विद्यार्थ्‍यांचे कुटुंब माझी जबाबदारी अशा आशा आशयाचे फलके लावून जनजागृती करणे, 100 टक्‍के लसीकरण झालेल्‍या विद्यालयातील विद्यार्थ्‍यांना प्रोत्‍सहनपर प्रमाणपत्र देणे, लसीकरणाची टक्‍केवारी कमी असलेल्‍या भागांमध्‍ये विद्यर्थ्‍यांची टीम तयार करून लस घेण्‍यासाठी प्रोत्‍साहित करणे,  100 टक्‍के लसीकरण झालेल्‍या घरांवर हिरव्‍या   रंगाची, 70 टक्‍के लसीकरण झालेल्‍या घरांवर केसरी रंगाची आणि लसीकरण न झालेल्‍या  घरांवर लाल रंगाची खूण करणेआदिंबाबत सुचना देण्‍यात आली आहे. या बैठकीत मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, सिताबाई कला महाविद्यालयातील प्राचार्य अमोल गावंडे, प्राचार्य हरीष नरेटी, आर.एल.टी.कॉलेज येथील डॉ.रश्‍मी जोशी, आशिष मुठ्ठे, एल.आर.टी.कॉलेज येथील निलेश चोटिया, शिवाजी महाविद्यालयातील प्राचार्य रोहन बुंदेले, खंडेलवाल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डिम्‍पल मापारी आदिंची उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने