बुडालेल्या युवकाचा मृत्यूदेह गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने काढला शोधून अकोला येथील शिवनी खदान येथील घटना*

 अकोला (शिवणी) :- बुडालेल्या युवकाचा मृतदेह गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथक यांनी अकोला शिवनी खदान एम आयडीसी येथील येथील ऋषी पंजाब लोखंडे वय अंदाजे (18) वर्ष या युवकाने शनिवारी 27 नोव्हेंबर दुपारी आंघोळी साठी एमआयडीसी नं. दोन ला लागून असलेल्या खदानीत उडी घेतली असता तो पाण्यात बेपत्ता झाल्याची माहीतीवरुन स्थानिक नागरिकांनी मृतदेह शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु 30 फुट खोल पाणी असल्याने काहीच मिळुन आले नाही यामुळे शिवनी येथील प्रविण पातोळे आणी एम आयडीसी पो.स्टे. चे ठाणेदार विजय चव्हाण साहेब यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. लगेच दीपक सदाफळे हे आपल्या सहका-यांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयातुन रेस्क्यु बोट घेऊन घटनास्थळी पोहचले आणी सर्च ऑपरेशन चालु केले जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी खदानित चित्तथरारक अंडर वॉटर बॅक डाईव्ह सर्चिंग केले असता दोन तासात मृतदेह शोधुन बाहेर काढला सर्व ऑपरेशनसाठी अकोला म.न.पा.ची अग्निशमन दलाची टीम विभाग प्रमुख मनिष कथले यांच्या नेतृत्वात अशोक प्रधान, ऊमेश भिरड, प्रकाश बनकर, राहुल वाकोडे, वाहन चालक गजानन दामोदर हे सहभागी होती आणी स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी एमआयडीसी पो.स्टे. ठाणेदार विजय चव्हाण साहेब आणी त्याचे सहकारी हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने