*अकोला महानगरपालिकेतर्फे 27 नोव्हेंबर 28 नोव्हेंबर कालावधी 18 वर्षावरील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचे अकोला महानगरपालिके तर्फे आव्हान*
अकोला दि. 25 राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत भारत निवडणूक आयोगाकडू यज्ञन राबविण्यात येणा-या विधान सभा मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाकरीता विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. आगामी अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता विधानसभा मतदार संघाची मतदार यादी वापरली जाणार आहे. करिता अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावण्याकरीता तसेच निवडणूक लढविण्याकरीता नाव नोंदविण्याची ही संधी आहे. करिता मा. राज्य निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी आपल्या जवळच्या मतदान केंद्र इमारतीत नाव नोंदणीसाठी विशेष शिबीर आयोजित केले आहे, तसेच आपणास आवश्यक असलेल्या माहितीसाठी1950 ही हेल्पलाईन सुरु केली आहे तसेच व्हॉट्स अॅप महाव्होटर, चॅटबॉट क्र. +91 7669300321 किंवा http://bit.ly/mahavoter वर संपर्क करता येईल तसेच ऑनलाईन नाव नोंदणी www.nvsp.in या पोर्टलवर करता येईल.

_____________________________________________
*100 टक्के लसीकरणासाठी महिला बचत गटांनी आपला सहभाग नोंदवावा.*
– *कविता व्दिवेदी मनपा आयुक्त.*
अकोला दि. 25 अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे आयोजित दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या संस्था असलेल्या वस्तीस्तर संघाच्या बैठकीत मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांनी अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना लसीकरण 100 टक्के होण्यासाठी महिला बचत गटांना आवाहन केले.
स्वच्छता अभियान अंतर्गत गुड मार्निंग पथक असो किंवा ईतर सामाजिक उपक्रमामध्ये बचत गटांनी आपले मोलाचे सहकार्य दिले असून कोरोनाला संपुर्णपणे हद्दपार करण्याच्या या राष्ट्रीय कामामध्ये सुध्दा महिला बचत गट हे सक्रीय सहभाग द्यावे अशी आशा मनपा आयुक्त यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी महिला बचत गटांनी आप-आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये कोरोना रोकथाम बाबतचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नागरिकांना जागृत करणे याचसोबत लसीकरण संदर्भात प्रवृत्त करणे संदर्भात कार्यकरावे अशा सुचना दिल्या. तसेच जो पर्यंत अकोला शहरात प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होणार नाही तो पर्यंत हर घर दस्तक अंतर्गत अविरत आपला सहभाग नोंदवून 100 टक्के लसीकरण होईपर्यंत कार्य करण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, एन.यु.एल.एम. विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर, गणेश बिल्लेवार, वैद्यकीय आरोग्य विभागाचे श्रीमति मकासरे, गवारगुरू व मनपा अधिनस्त असलेल्या सर्व बचत गटांच्या संस्थांचे प्रतिनिधी, एन.यु.एल.एम. विभागाचे समुदाय संघटक व माविम सहयोगिनी यांची उपस्थिती होती.