*घनकचरा व्यवस्थापन वर मनपा आयुक्त यांचा मोठा निर्णय*
*मनपा प्रशासनाने घेतले 21 नवीन ट्रॅक्टर*
*जुने वीस ट्रॅक्टर मिळूनआता अकोला मनपाकडे 41 ट्रॅक्टर उपलब्ध*
*जम्पिंग प्रोमोशन वरील असलेले अधिकाऱ्यांचे ट्रॅक्टर आल्यामुळे काम झाले कठीण*
अकोला दि. 6 अकोला महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तर शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनानुसार व वितरीत निधी अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाने 21 ट्रॅक्टर वाहन खरेदी बाबत जी.एम.पोर्टलवर निविदा प्रसिध्द केली असता सोनालीका इंटरनॅशनल ट्रॅक्टरचे दर स्पर्धात्मक दृष्ट्या कमी असल्याने 21 ट्रॅक्टर वाहन त्यांचे मार्फत प्रशासनाने खरेदी केली आहे. त्यामधून मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांच्या मार्गदर्शनात पहिल्या टप्प्यात प्राप्त 10 ट्रॅक्टर मनपाच्या सेवेत कार्यान्वीत करण्याकरिता दि. 6 रोजी महानगरपालिकेत सफाईचा मुंद्दा निकाली लागण्याचे संकेत दिसत आहे. परंतु या अगोदर ठेकेदारी पद्धत वर असलेले ट्रॅक्टर यांनी मनपा ला करोडचा चुना लावत शहरातील घनकचरा समस्या निकाली काढली नाही उलट सत्ताधार्यांना हाताशी धरून मनपा आयुक्तांना घेराव घालण्याचे प्रकार करण्यात आले होते, आता मनपा प्रशासनाने 21 ट्रॅक्टर विकत घेतल्यामुळे याआधी मनपा मध्ये किती ट्रॅक्टर उपलब्ध आहेत याची विचारणा वाहन विभाग प्रमुख यांच्याकडे केली असता मनपाकडे जुने ट्रॅक्टर 20 उपलब्ध असल्याचे सांगितल आता शहरातील घनकचरा समस्या 41 ट्रॅक्टर मुळे निकाली लागेल *परंतु ट्रॅक्टर वरील ट्रॉली ची हाईट वाढवल्यास एकाच फेरीमध्ये 2 टन घनकचरा उचलणे सोपे जाईल त्यामुळे मनपाचा होणारा खर्च हा फार कमी प्रमाणात होईल व जीपीएस बसल्यास ट्रॅक्टरच्या फेऱ्या वर नजर राहील कचऱ्याची समस्या मार्गी लागेल*
*परंतु ट्रँक्टर्वर वाहन चालकांची गरज भासेल. आजही मनपातील आस्थापनेवरील वाहनचालक अधिकारी,बाबुगिरीचे काम पाहत असुन मनपा प्रशासनाला कसरत करण्याची गरज भासणार नाही याच ड्रायव्हरांना मुळपदावर आणण्याकरिता मा.आयुक्तांना तारेवरची कसरत करावी लागणार नाही ? तसेच ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर साठी पदाधिकारी सतर्क झाले असून मनपा आयुक्तांना मनपा आयुक्त ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर ची भरती स्वतः हाताळतात की सत्ताधारी हाताळतात असा प्रश्न महानगर वासियांना पडला आहे . वाहनचालकाचे प्रश्न की पुन्हा मानधनावर वाहन चालकांची भरती घेतात हे येणाऱ्या काळात दिसेल*. मा.आयुक्तांनी शहराच्या साफसफाई बाबत योग्य निर्णयामुळे संत्ताधार्याची चांगलीच गोची झाली असुन आजपर्यंत लुट लो आफर वर गंप्प बसण्याची वेळ आलेली आहे. पुढे सार्वत्रिक निवडणुकीत अशामुळे नागरिकानी योग्य उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील रहावे असा सुर महानगर क्षेत्रातील नागरिका मधुन ऐकाला मिळतआहे.
जम्पिंग प्रोमोशन वरील असलेले अधिकाऱ्यांचे ट्रॅक्टर आल्यामुळे काम झाले कठीण.