कविता व्दिवेदी, मनपा आयुक्त*
अकोला दि. 8 नोव्हेंबर अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर दुकानदारांव्दारे रस्त्यावर पायरी, टीनशेड आणि डिसप्ले लावून अतिक्रमणे करण्यात आले आहे, याचसोबत विविध प्रकारच्या किरकोळ व्यावसायिकांव्दारे हातगाड्या व ठेले लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात अरूंद झाले आहे यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होउन वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तसेच अकोला मनपा क्षेत्रातील छोट्या आणि मोठ्या नाल्यावर नागरिकांव्दारे अतिक्रणे करण्यात आले आहे यामुळे नाले सफाईच्या कामात अडचण निर्माण होत आहे. यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारे मनपा क्षेत्रात टप्प्या-टप्प्याने अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविली जाणार असून पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची तसेच नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
तरी शहरातील सर्व अतिक्रमण धारकांना मनपा प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येत आहे कि, त्यांनी आपले अतिक्रमणे तात्काळ स्वतःहून काढून मनपा प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा त्यांचे विरूध्द नियमानुसार दंडात्मक कारवाई करून अतिक्रमणे काढण्यात येणार आहे व त्यांचा संपुर्ण खर्च हा संबंधीत अतिक्रमण धारकांकडून घेण्यात येणार आहे तरी संबंधितांनी याची नोंद घेउन आपले अतिक्रमणे स्वतःहून काढून मनपा प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती.