अजगर व दोन कोब्रा जातीच्या सापांना पकडून सर्प मित्राने दिले जीवनदान*

 




अजगर व दोन कोब्रा जातीच्या सापांना पकडून सर्प मित्राने दिले जीवनदान*
अकोला = बोरगाव मंजू परिसरामधील रंभापुर शेत-शिवार येथील डॉक्टर सतीश इंगळे यांच्या शेतात ८ वाजताच्या सुमारास खूप मोठा अजगर त्यांचे भाऊ हरभराच्या शेतात राखनदारी करत असताना शितल इंगळे यांना दिसून आला ते भयभीत झाल्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलून घेतले तेथील गौरव नवलकार यांनी  सर्पमित्र प्रशांत नागे व पंकज नवलकार यांना फोन लावून कळवले त्यांनी वेळेचा विलंब न करता त्या ठिकाणावर पोहोचून त्या रॉक पायथॉन जातीच्या अजगराला अत्यंत शिताफीने पकडले व तेथील शेतकऱ्यांना भयमुक्त केले व तसेच दहिगाव गावंडे येथे कॉमन कोब्रा जातीच्या नाग रात्री १ च्या दरम्यान चेतन कोलतकार  यांच्या घरी पकडण्यात आला व अन्वी मिर्झपुर शेत शिवारामध्ये संदीप शिरसाट यांच्या शेतात एक कोब्रा जातीचा साप पकडण्यात आला व हे २ कोब्रा जातीचे नाग व १ रॉक पायथॉन जातीचा अजगर हे जंगलामध्ये वनविभागाचे सुरेश गवई  साहेब यांच्या उपस्थितीमध्ये वन विभागाच्या परिक्षेत्रा मध्ये सुखरूपपणे सुरक्षित जागेवर सोडण्यात आले यावेळी सर्पमित्र प्रशांत नागे, कुमार सदांशिव ,सुगत वानखडे ,विवेक पागृत, रितेश बोंबडे, वैभव धुमाळे मेजर अनिल राठोड, हेमंत देशमुख सर्व सर्प मित्र मंडळी यांनी आज अथक परिश्रम घेऊन या तीन सापांना सुखरूप सुरक्षित जगलात सोडण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने