*जमावबंदी आदेश लागू संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये संपूर्ण शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावबंदी आदेश लागू* *रविवार दिनांक 21/11/2021 रात्री 12.00 वाजेपासून मंगळवार दिनांक 23/11/2021 चे रात्री 12.00 वाजेपर्यंत अकोला जिल्हयातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येत आहेत*.

 


अकोला जिल्ह्यात संपूर्ण शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावबंदीचे आदेश लागू

*रविवार दिनांक 21/11/2021 रात्री 12.00 वाजेपासून मंगळवार दिनांक 23/11/2021 चे रात्री 12.00 वाजेपर्यंत अकोला जिल्हयातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येत आहेत*.

अकोला= त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद सर्व राज्यामध्ये उमटत आहेत. त्याच प्रमाणे अमरावती व यवतमाळ तसेच नांदेड या जिल्हयामध्ये घडलेल्या घटना लक्षात घेता अकोला जिल्हयामध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना पडू नये याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला यांनी संपूर्ण अकोला जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहायो या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबत विनंती केली आहे. आणि
अमरावती व यवतमाळ तसेच नांदेड यामध्ये घडलेल्या घटना लक्षात घेता संपूर्ण अकोला जिल्हयामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून कोणताही अनुचित प्रकार पडू नये या करिता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

नीमा अरोरा, भा.प्र.से. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, अकोला  अधिकारानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

1,रविवार दिनांक 21/11/2021 रात्री 12.00 वाजेपासून मंगळवार दिनांक 23/11/2021 चे रात्री 12.00 वाजेपर्यंत अकोला जिल्हयातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येत आहेत.

2. जमावबंदीच्या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी बाहेर किवा चारपेक्षा जास्त व्यक्तीच्या जमायास प्रतीबंध राहील

. 3. अकोट व अकोला या शहराकरिता उपविभागीय दंडाधिकारी यांनी निर्गमित केलेले आदेश कायम राहतील.

4. कांविड लसीकरणाचे काम नियमितपणे सुरु राहील
,5. कोणत्याही प्रकारच्या रैली धरणे आंदोलने, मोर्चा ईत्यादीचे आयोजन करता येणार नाही.

6. सदर आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यांचे

अधिनस्त अधिकारी / कर्मचारी व संबंधीत विभाग यांना त्यांचे स्तरावरून अवगत कराये. तसेच जिल्हयात फायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता त्याच प्रमाणे या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधांची किंवा काढलेल्या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्याही व्यक्तीने, भारतीय दंड संहिता, (1860 या 45 ) याच्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानन्यात येईल,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने