२३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत रात्री १०ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू*

 


२३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत रात्री १०ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू*

अकोला = उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला यांनी याअगोदर संदर्भीय पत्र क्रमांक अन्वये दिनांक १७/११/२०२१ दुपारी १२.०० वाजता पासून ते दि. १२/११/२०२१ चे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत जमावबंदी व संचारबंदी तसेच सदर्भीय पत्र क्रमांक २ व ३ अन्वये दिनांक २३/११/२०२९ चे सकाळी ०६.०० पर्यत संचार बंदी आदेश लागू करणेबाबत प्रस्तावित केले होते. परंतु आजरोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला यांनी संदर्भीय पत्र क्रमांक ४ अन्वये पुन्हा अकोला शहरता अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संचारबंदी वाढविणे आवयश्क असल्याबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यअनुषंगाने आज रोजी संपूर्ण अकोला शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी दिनांक २३/११/२०२१ चे रात्री १०.०० बाजता पासून ते दि. २५/११/२०२१ चे सकाळी ०५.०० वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत संचारबंदी बाबत खालील प्रमाणे आदेश लागू करण्यात येत आहे.
(A) रात्री १०.०० ते सकाळी ०५.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात येत आहे.

संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरु राहतील सदर आदेशाचे काटेकारपणे पालन करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करावा. सदर कालावधीत कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील किंवा विभिन्न जाती धर्माच्या दोन गटा मध्ये तेढ

निर्माण होईल असे कोणतेही कृत्य, वक्तव्य करणार नाहीत व अफवा पसरविणार नाहीत.
२. जातीय भावना भडकवणारे आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमांव्दारे प्रसारीत करणार नाहीत, तसेच

आक्षेपार्ह पोस्ट टाकणार नाही व समाज माध्यमांचा गैर वापर करणार नाहीत.

३. कोणत्याही प्रकारचे रॅली, धरणे, मोर्चाचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन करणार नाही.

४. निवडणुक प्रचार संदर्भात काही कार्यक्रम असल्यास यासदर्भात निवडणुक निर्णय अधिकारी यांचे

वेगळ्याने परवानगी घेणे बंधनकारक राहील.
५. सदर कालावधीत कोविड १९ लसीकरणाचे सत्र पुर्ण क्षमतेने पूर्वी प्रमाणेच सुरु रहील.

सदर आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्तीने आदवि १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र अपराध केला आहे असे मानण्यात येईल,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने