विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक- ८२२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क.

 


अकोला, दि.२३ विधान परिषदेच्या अकोला बुलडाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली असून या मतदार संघात ८२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 



यासंदर्भात निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. 


त्यानुसार,   या मतदार यादीत आता-


अकोला जिल्हाः-  जिल्हा परिषद अकोला-६० मतदार, अकोला महानगरपालिका-  ८१ मतदार, अकोट नगरपरिषद-३६, तेल्हारा नगरपरिषद-१९, बाळापूर नगरपरिषद- २६,  पातूर नगरपरिषद-१९, मुर्तिजापुर नगरपरिषद-२६,  बार्शी टाकळी नगरपंचायत- २०, (एकूण मतदार-२८७)


वाशिम जिल्हाः- वाशिम जिल्हा परिषद-५८, नगरपरिषद वाशिम-३४, नगर परिषद कारंजा-३२, नगर परिषद मंगरुळ्पीर-२१, नगरपरिषद रिसोड-२३,(एकूण मतदार-१६८)  


बुलडाणा जिल्हाः- जिल्हा परिषद बुलडाणा-७१, नगरपरिषद बुलडाणा-३१, नगर परिषद चिखली-३०, नगर परिषद देऊळगाव राजा-२१, नगर परिषद सिंदखेड-१९,  नगर परिषद लोणार-२०,  नगर परिषद मेहकर-२७,  नगर परिषद खामगाव-३७, नगर परिषद शेगाव-३२, नगर परिषद जळगाव जामोद-२१,  नगर परिषद नांदुरा-२६, नगर परिषद मलकापूर-३२ (एकूण मतदार- ३६७) या प्रमाणे मतदार संख्या  आहे.


 एकूण मतदार संघात  ३८५ पुरुष तर ४३७ स्त्री मतदार मिळून ८२२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

______________________________________________

ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांकरीता निवडणूक कार्यक्रम जाहीर. November 22, 2021

अकोला, दि. 22 (जिमाका)- राज्‍य निवडणुक आयोगाचे पत्र दि.17 नोव्‍हेंबर 2021 रोजीच्‍या पत्रान्‍वये निधन, राजिनामा, अर्नहता किंवा इतर अन्‍य कारणामुळे ग्रामपंचायतीतील रिक्‍त झालेल्‍या पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.


            राज्‍य निवडणुक आयोग यांनी त्‍याचेकडील दि.17 नोव्‍हेंबर व दि.18 नोव्‍हेंबर चे आदेशान्‍वये व मा. सर्वोच्‍च न्‍यायालय यांचेकडील दि. 04 मार्च 2021 चे आदेशान्‍वये तसेच सन 2021 चा महाराष्‍ट्र अध्‍यादेश क्र.3, दिनांक 23 सप्‍टेंबर 2021 रोजीच्‍या अध्यादेशान्‍वये नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाच्‍या रिक्‍त जागा भरण्‍यापूर्वी त्‍या ग्रामपंचायतीचे एकुण आरक्षण 50 टक्‍केच्‍या मर्यादेत ठेवावे आणि नागरिकांच मागासवर्ग प्रवर्गाचे एकुण आरक्षण 27 टक्‍कयापर्यंत ठेवावे. तसेच नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाची अतिरिक्‍त ठरलेली रिक्‍त जागा सर्वसाधारण जागा म्‍हणून अधिसूचित करण्‍यासाठी पुर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्‍द केलेल्‍या अंतिम प्रभाग रचनेमध्‍ये सुधारणा करण्‍यात यावी असे आदेशित केलेले आहे.


      मा.राज्‍य निवडणुक आयोग यांनी त्‍याचेकडील दि.17 नोव्‍हेंबर व 18 नोव्‍हेंबर 2021 चे आदेशान्‍वये सर्व तहसिलदार यांनी ज्‍या ग्रामपंचायतील मधील आरक्षण 50 टक्‍के पेक्षा जास्‍त झाले तसेच नागरिकांच मागासवर्ग प्रवर्गाचे एकुण आरक्षण 27 टक्‍के पेक्षा जास्‍त झाले त्‍या ग्रामपंचायतीमधील नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाची अतिरिक्‍त ठरलेली रिक्‍त जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरता आरक्षीत करण्‍या करिता प्रस्‍तावित केले आहे. मा.राज्‍य निवडणुक आयोग यांनी त्‍याचेकडील दि.17 नोव्‍हेंबर व 18 नोव्‍हेंबर 2021 चे आदेशान्‍वये खालील प्रमाणे अकोला जिल्‍हयातील तालूका निहाय नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाची अतिरिक्‍त ठरलेली रिक्‍त जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरता दि. 22 नोव्‍हेंबर 2021 रोजी सूधारित आदेशाव्‍दारे मान्‍यता प्रदान करण्‍यात आली आहे.

____________________________________________

जिल्ह्यात ३० नोव्हेंबरनंतर लसीकरण केंद्रांच्या संख्येत होणार घट: त्या पूर्वी लसीकरण करुन घ्यावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन.

अकोला, दि.२३ जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. तथापि, या अभियानानंतर अभियानानिमित्त वाढविण्यात आलेली लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.  तरी नागरिकांनी दि.३० नोव्हेंबरच्या आत आपल्या घरानजिक असलेल्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.


जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी  विशेष मोहिम राबविली जात असून आज अखेर जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या लोकांची संख्या ९ लक्ष २७ हजार इतकी असून दुसरा डोस घेतलेले ४ लाख २१ हजार ७०० इतकी आहे. जिल्ह्यात १८ वर्षे वयावरील लसीकरणासाठी पात्र १४ लक्ष ३३ हजार व्यक्तिंचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सद्यस्थितीत १५० लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात लोकांच्या घरांच्या जवळ, एकाच वेळी अधिक लोकांसाठी त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या नजिक विशेष सत्र आयोजित करण्यात होते. तसेच लोकांच्या सोयीनुसार लसीकरण वेळही बदलण्यात येत आहे. तथापि, अभियान कालावधीनंतर (दि.३०) वाढवलेली केंद्र संख्या कमी होईल. तेव्हा नागरिकांनी आता अधिक जवळ केंद्र आहेत तेथे लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

_____________________________________________

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: संविधान दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२६) उद्देशिका वाचन व ७५ हजार प्रतिंचे वितरण; जिल्हा प्रशासनाचा उपक्रम*

अकोला, दि.२३ संविधान दिनानिमित्त शुक्रवार दि.२६ रोजी जिल्हा प्रशासनामार्फत ७५ हजार संविधान उद्देशिकांच्या प्रतिंचे वितरण करण्यात येणार असून सकाळी ११ वाजता संविधान उद्देशिकेचे वाचन होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.  मुख्य समारंभ जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.


यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी  मार्गदर्शन केले. या बैठकीस जिल्ह्यातील महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख, सामाजिक न्याय विभाग, महिला बालविकास विभागाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे संविधान उद्देशिकेच्या ७५ हजार प्रति वितरीत करण्यात येणार आहेत. या प्रति शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, सर्व शासकीय कार्यालये आदी ठिकाणी वितरीत करण्यात येतील. यानिमित्ताने सर्व शाळा महाविद्यालयांसह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन होईल. जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी  ११ वाजता होईल.  या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त श्रीमती कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचे संयोजन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनीकेले आहे. याकार्यक्रमास उपस्थितीचे तसेच जिल्ह्याभरातील सर्व कार्यक्रमांमधील सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

_____________________________________________

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग व प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना;प्रस्ताव मागविले*

अकोला, दि. २३ महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच आंतररष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करता यावी यासाठी खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास भोजन,  तसेच देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण, प्रशिक्षण उपकरणे, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात / खरेदी करणे गणवेश या बाबीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील पात्र खेळाडुंकडून आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.


जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, या योजनेसाठी ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, एशियन कप, राष्ट्रकुल स्पर्धा, एशियन कप, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, वर्ल्ड कप, शालेय आशियाई / जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या खेळ/ क्रीडा प्रकाराचा समावेश असेल तेच खेळ / क्रीडा प्रकार वरील नमुद इतर स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय असतील.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत खेळाडू महाराष्ट्र राज्याचा १५ वर्षाचा रहिवासी असावा, खेळाडूने गत तीन वर्षात कनिष्ठ / वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करून किमान एकदा पदक मिळविले असणे आवश्यक आहे. भारतीय खेळ महासंघ अथवा अधिकृत भारतीय खेळ संघटना यांच्यावतीने अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी निवड झाल्याबाबत प्रमाणपत्र संबंधीत खेळाडूकडे असावे. निमंत्रित स्वरूपाच्या स्पर्धासाठी झालेली निवड पात्र ठरणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रताधारक खेळाडूने अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधून विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन मंगळवार दि.३० नोव्हेंबर पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

_____________________________________________

अकोला शहरात रात्रीच्या संचारबंदीत दि.२५ पर्यंत वाढ*

अकोला, दि.२३ अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जारी करण्यात आले असून लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीत दि.२५ पर्यंत वाढ करण्यात आले असल्याचे आदेश  उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी काल (दि.२२) निर्गमित केले. तथापि, संचारबंदीचा कालावधी रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत असा करण्यात आला आहे.


यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, दि.२५ रोजी पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. संचारबंदीचा कालावधी रात्री दहा ते सकाळी पाच असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याकालावधीत आरोग्य सेवा, कोविड लसीकरण सत्र सुरु राहतील. तसेच या कालावधीत धार्मिक तेढ वाढविणारे, भावना भडकविणारे असे कृत्य. वक्तव्य, अफवा पसरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे.  समाज माध्यमांद्वारे असे संदेश प्रसारित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही  प्रकारे रॅली, धरणे, मोर्चे व अन्य कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही. निवडणूक प्रचार संबंधित  कार्यक्रम असल्यास त्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई  करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

_____________________________________________

ईरानी झोपड़पट्टी जवळ खेलविल्या जाणाऱ्या जुगार अडयावर विशेष पथकचा छापा 3 ईरानी  आरोपी अटकेत,

आज दि 23,11,21 रोजी काही ईरानी इसम काली पिवली गोटयावर अंदर बाहर पैसे लावून ईरानी झोपडपट्टी समोर जुगार खेलवित  आहे अशी खात्रिशिर खबर मिलालेवरुंन विशेष पथकनि पंचासमक्ष छापा मारला असता 3 ईरानी इसम ज्यात 1,सिकन्दर अली हिमायु अली 40 रा ईरानी झोपड़पट्टी, 2 सनुल्लाहखं।न  जाफरखान 43 रा ईरानी झोपड़पट्टी 3, शेख इरफान शेख रोशन 45 रा ईरानी झोपडपत्ति यांच्या जवळून 3 वेगवेगळ्या रंगाच्या गोटया नगदी 1000 रुपये व 1 मोबाइल कीमत 1000 रुपये असा 2000 रूपयांचा जुगाराचा ऐवज जप्त करून  जुगार प्रतिबंधक कायदयाचे अनवाये गुन्हा नोंद करून 3 अरोपितास अटक करण्यात आलेली आहे, 

पोलिसांचे आवाहन आहे वरील अरोपिता सोबत कोणीही जुगार खेडूँ नयेत ,ते पैसे जबरजस्तिने हिस्कावून घेत असतात लालसेचे बलि पडू नये ही विनति.



_____________________________________________

शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे दि. 15/11/2021 ते 21/11/2021 पर्यंत केलेली कार्यवाही चोरीला गेलेले सामान केले परत*

अकोला =  शहरात वाहतुक सुरळीत चालावी तसेच वाहतुक कोंडी होवु काही अनुचित प्रकार होवु नये करीता विविध कलमांअतर्गत शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे सतत कार्यवाही करण्यात 

येत आहे. त्या अनुषंगाने दि. 15/11/2021 ते 21/11/2021 पावेतो शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे शहरात वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालाकाविरूध्द एकुण 1976 केसेस करण्यात आल्या ज्यामध्ये सिट बेल्ट चे 131 केसेस, नंबर प्लेट कलम नुसार 40 केसेस, वाहन चालवितांन मोबाईल वर संभाशन करणा-या वाहन चालकांवर 74 केसेस, ओव्हर स्पीड वाहन चालविणा-या वाहनांवर 43 केसेस, ट्रीपल सीट वाहन चालविणा-या वाहनांवर 147 केसेस, विना हेल्मेट वाहन चालविणा-या वाहनांवर 05 केसेस व इतर कलमांअंर्तगत 1536 केसेस करण्यात आल्या व एकुण 436400/- रूपये दंड करण्यात आला ज्यामध्ये एकुण 130550/- रूपये दंड वसुल करून षासन जमा करण्यात आला व उर्वरीत पंेडींग दंड असणा-यांना वाहन चालकांना दंड भरण्याबाबत कोर्ट नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

तसेच प्रवासी व महिला सुरक्षेबाबत विशेष मोहीम अंतर्गत शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला द्वारे सुचना फलक, स्टिकर्स तयार करून शहरातील एकुण १२८९२ ऑटोवर सदर स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत. दरम्यान मागील आठवड्यात नागरीकांचे हरवीलेले ०३ मोबाईल व ०२ बॅग ट्रॅफीक अमलदारांकडुन त्यांच्या मुळ मालकास परत करण्यात आले.

           तसेच शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत शहरात विविध वाहनांनी तसेच पैदल प्रवास करणा-या नागरिंकांचे हरविलेले सामान, मोबाईल, पर्स व इतर मौल्यवान वस्तु शहर वाहतुक शाखा अकोला येथे कार्यरत अधिकारी, अमंलदार यांना रस्त्यावर बेवारस स्थितील मिळुन आले असता सदर वस्तुंना मुळ मालकांचा षोध घेवुन परत करण्यात आले ज्यामध्ये नागरीकांचे हरवीलेले ०३ मोबाईल व ०२ बॅग ट्रॅफीक अमलदारांकडुन त्यांच्या मुळ मालकास परत करण्यात आले. मुळ मालकास आपली हरवलेली वस्तु, मोबाईल व इतर साहीत्य मिळेल याची अपेक्षाच नव्हती परंतु ट्राॅफीक पोलीसांनी त्यास हरवलेली वस्तु, मोबाईल व इतर साहीत्य परत केल्याने त्याचे चेह-यावर वेगळाच आनंद दिसुन आला व त्यांनी ट्राॅफीक पोलीसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

_____________________________________________

ग्रा.पं. रिक्त पदांचा पोटनिवडणूक कार्यक्रम: सार्वजनिक सुटीच्या दिवशी नामनिर्देशन न स्विकारण्याचे निर्देश; जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेही आवश्यक*

अकोला, दि.२३ निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पद्धतीने राबविण्‍यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार  नामनिर्देशन पत्र मागविण्याचा कालावधी हा  मंगळवार दि.३० नोव्हेंबर ते सोमवार दि.६ डिसेंबर असा आहे. तथापि, या कालावधीत येणाऱ्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी  नामनिर्देशन स्विकारण्यात येऊ नये असे  राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची हमी देण्याचा कालावधी संपुष्टात आल्याने आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी  नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे,असेही आयोगाचे निर्देश आहे, अशी माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं., जि.प., पं.स. निवडणूक विभाग संजय खडसे यांनी दिली आहे.

_____________________________________________

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक- ८२२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क*

अकोला, दि.२३ विधान परिषदेच्या अकोला बुलडाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली असून या मतदार संघात ८२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 



यासंदर्भात निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. 


त्यानुसार,   या मतदार यादीत आता-


अकोला जिल्हाः-  जिल्हा परिषद अकोला-६० मतदार, अकोला महानगरपालिका-  ८१ मतदार, अकोट नगरपरिषद-३६, तेल्हारा नगरपरिषद-१९, बाळापूर नगरपरिषद- २६,  पातूर नगरपरिषद-१९, मुर्तिजापुर नगरपरिषद-२६,  बार्शी टाकळी नगरपंचायत- २०, (एकूण मतदार-२८७)


वाशिम जिल्हाः- वाशिम जिल्हा परिषद-५८, नगरपरिषद वाशिम-३४, नगर परिषद कारंजा-३२, नगर परिषद मंगरुळ्पीर-२१, नगरपरिषद रिसोड-२३,(एकूण मतदार-१६८)  


बुलडाणा जिल्हाः- जिल्हा परिषद बुलडाणा-७१, नगरपरिषद बुलडाणा-३१, नगर परिषद चिखली-३०, नगर परिषद देऊळगाव राजा-२१, नगर परिषद सिंदखेड-१९,  नगर परिषद लोणार-२०,  नगर परिषद मेहकर-२७,  नगर परिषद खामगाव-३७, नगर परिषद शेगाव-३२, नगर परिषद जळगाव जामोद-२१,  नगर परिषद नांदुरा-२६, नगर परिषद मलकापूर-३२ (एकूण मतदार- ३६७) या प्रमाणे मतदार संख्या  आहे.


 एकूण मतदार संघात  ३८५ पुरुष तर ४३७ स्त्री मतदार मिळून ८२२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

_____________________________________________

विधान परिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१: आजही दोघा उमेदवारांचे चार अर्ज दाखल*

अकोला, दि.२३ महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूक २०२१ साठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत  दोघा उमेदवारांचे  प्रत्येकी दोन असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, आता एकूण आठ अर्ज दाखल झाले आहेत,असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.


अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे या प्रमाणे-


वसंत मदनलाल खंडेलवाल(भाजपा)- दोन अर्ज, गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया (शिवसेना)- दोन अर्ज.


काल (दि.२२) चार अर्ज व आज चार अर्ज असे एकूण आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने