अकोला दि. 24 नोव्हेंबर विदेशातील काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे त्यामुळे विदेशातील काही देशांनी लॉकडाउन सुध्दा लावला आहे. भविष्य काळात आपल्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी खबरदारी घेउन कोरोनाचा प्रादुर्भावात पुन्हा वाढ होउ नये याकरिता सोशल डिस्टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करून चेह-यावर मास्क लावणे आवश्यक आहे. याचसोबत कोरोना या आजाराला प्रतिबंधीत करण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकानी कोरोनाची लस घेणे अनिवार्य आहे.
कोरोनाला नियंत्रीत ठेवण्यासाठी आणि संपुर्णपणे हद्दपार करण्यासाठी शहरातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून आणि लसीकरण करून घेउन स्वतःचे व परिवाराचे संरक्षण करण्याचे आवाहन मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांनी केले आहे.
तसेच शहरातील ज्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतलेली आहे त्यांनी कोव्हीन अॅप किंवा आरोग्य सेतू अॅप वरून आपले लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची प्रत ठेवावी. भविष्य काळात सार्वजनिक ठिकाणी (जसे शाळा, महाविद्यालये, मॉल्स, सिनेमा गृहे, जीम, व्यायाम शाळा ईत्यादी ठिकाणी) प्रवेश करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी आणि शासकीय कार्यालयातील सेवांचा लाभ घेण्यासाठी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
तरी शहरातील नागरिकांनी आपले लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची प्रत ठेवावी ज्या नागरिकांना याकामात कोणत्याही प्रकारची अडचण येत असतील त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रांवर किंवा मुख्य पोस्ट ऑफीस जवळील आर.सी.एच. कार्यालय येथे संपर्क साधून आपले प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांनी केले आहे.
_____________________________________________
*विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-2021*
*दोघा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध*
अकोला, दि.24 महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2021 साठी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची आज छाननी झाली. त्यात दोघा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले,असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.
अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे या प्रमाणे-
गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया (शिवसेना) चार अर्ज, वसंत मदनलाल खंडेलवाल(भाजपा) चार अर्ज.या दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी चार असे एकूण आठ नामनिर्देशन पत्र, दाखल केले होते, ते सर्व वैध ठरले आहेत. शुक्रवार दि.26 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे.
*खेलो इंडिया बॉक्सींग प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण*
अकोला, दि. 24 क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत खेलो इंडिया बॉक्सींग प्रशिक्षण केंद्राचे आज दि. 24 नोव्हेंबर रोजी बॉक्सींग हॉल स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते रिबीन कापून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक बॉक्सीगचे सतिशचंद्र भट, कुस्तीचे राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. कृष्णमुरारी शर्मा, लक्ष्मीशंकर यादव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मयुर नृत्य ॲकॅडमीतील चंचल गुप्ता यांनी नृत्य सादर करुन केले. तसेच खेलो इंडिया स्पर्धामध्ये पदक प्राप्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाक्सर खेळाडूंचे सत्कार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक सतिशचंद्र भट यांनी केले.
_____________________________________________
*अज्ञान वाहनाची कारला धडक मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर यांचा मृत्यू*
मूर्तिजापूर : मुर्तिजापूर येथुन जवळच असलेल्या सोनरी गावा नंजीक राष्टीय महामार्ग सहावर अज्ञान वाहनाने कार ला समोरासमोर धडक दीली या अपघातात मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर यांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुखःदायक घटना आज चार वाजताच्या सुमारास घडली असून अनिल बेलाडकर हे मूर्तिजापूरकडे परत येत असताना सोनोरी गावाजवळ हा अपघात झाल्याचे समजते. सदर घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या चार च्या सुमारास घडली.मुर्तिजापूर येथील पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर सर यांचे लहान भाऊ अनिल बेलाडकर (मंडळ अधिकारी) हे बुधवारी दुपारी कर्तव्यावर असताना राष्ट्रीय महामार्गाने आपल्या कार क्रमांक एमएच ३० एझेड २३९१ ने मूर्तिजापूरकडे परत येत होते, दरम्यान विरुद्ध दिशेने वेगाने येत असलेल्या अज्ञात जड वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला.या धडकेत त्यांच्या छातीत मोठी दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच एकच गर्दी झाली होती त्यांना मुर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
_____________________________________________
*मादक अमली पदार्थ गांजा ची शेतात झाड़े लावणाऱ्या अरोपितवार विशेष पथकाची कार्यवाही गांजाची 06 झाड़े 2700 ग्राम गांजा 30,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त धारूल शाहनूर गावाजवल शेतशिवारात गांजांची झाड़े जपत**
अकोट - दि 24 अकोट शहरात मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील *मादक अमली पदार्थ गांजा ची शेतात झाड़े लावणाऱ्या अरोपितवार विशेष पथकाची कार्यवाही गांजाची 06 झाड़े 2700 ग्राम गांजा 30,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त धारूल शाहनूर गावाजवल शेतशिवारात गांजांची झाड़े जपत**
आज दि 24।11।21 रोजी अकोट शहरात मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की धारूर शाहनूर शेतशिवारात रामेश्वर तायड़े याने आपल्या शेतशिवारात मादक अमली गूंगीकारक पदार्थ गांजाची झाड़े लागवड केलेली असून त्या झाडांचा गांजा काढून तो विक्री करीत आहे अशा खात्रिशिर ख़बरेवरुन पंच व पो स्टाप सह रामेश्वर तायड़े याच्या शेतशिवारात छापा मारला असता त्याच्या शेतात 06 गांजाची मोठी झाड़े अंदाजे 5 ते 6 फुट उंचीची झाड़े विनापरवाना लागवड करून तो संभाल व जोपासना करताना मिळून आला व त्याच्या शेतातील घरात ही 2700 ग्राम गांजा कीमत 30,000 रूपयांचा गांजा बालगुन विक्री करताना मिळून आल्याने आरोपी रामेश्वर रमेश तायड़े वय 27, रा शाहनूर ता अकोट यांच्या विरुद्ध पो स्टे अकोट ग्रामीण मध्ये NDPS ACT कलम 20B अनवये गुन्हा नोंद करून अरोपितास अटक करण्यात आलेली आहे,
सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केली, पथकास खात्रिशिर खबर मिळाली की धारूर शाहनूर शेतशिवारात रामेश्वर तायड़े याने आपल्या शेतशिवारात मादक अमली गूंगीकारक पदार्थ गांजाची झाड़े लागवड केलेली असून त्या झाडांचा गांजा काढून तो विक्री करीत आहे अशा खात्रिशिर ख़बरेवरुन पंच व पो स्टाप सह रामेश्वर तायड़े याच्या शेतशिवारात छापा मारला असता त्याच्या शेतात 06 गांजाची मोठी झाड़े अंदाजे 5 ते 6 फुट उंचीची झाड़े विनापरवाना लागवड करून तो संभाल व जोपासना करताना मिळून आला व त्याच्या शेतातील घरात ही 2700 ग्राम गांजा कीमत 30,000 रूपयांचा गांजा बालगुन विक्री करताना मिळून आल्याने आरोपी रामेश्वर रमेश तायड़े वय 27, रा शाहनूर ता अकोट यांच्या विरुद्ध पो स्टे अकोट ग्रामीण मध्ये NDPS ACT कलम 20B अनवये गुन्हा नोंद करून अरोपितास अटक करण्यात आलेली आहे,
सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केली,
_____________________________________________
*विशेष पथकाची अवैध घुटका वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही* *
अकोला- दि : २४/ विशेष पथक मा पोलिस अधिकशक साहेब यांच्या आदेशाने पो स्टे अकोट ग्रामीण हदित पैट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारकडून खात्रीलायक बातमी मिळाली की एक इसम हा आपल्या गाडी वर ग्राम जनुना ते ग्राम खिरकुंड अवैध घुटक्याची वाहतूक करीत आहे तेथे धाड टाकली असता आरोपी निशिकांत शेषराव रंगिरे वय २४ रा ग्राम अकोला जहांगीर हा आपल्या मो सा MH 30 AG 8489 हिरो होंडा स्प्लेंडर वाहन वर अवैध रित्या घुटक्याचि वाहतूक करताना मिळून आला त्याच्या जवळून १)वाह सुपारी व तंबाखू चे एकूण २५६ पॅकेट किंमत १७,३०० २)मोठी विमल सुपारी व तंबाखू ४० पॅकेट किंमत ५,०४० रु ३) छोटी विमल व तंबाखू चे ७६ पॅकेट किंमत ६,७४० ४)एक सैमसंग कंपनीचा मोबाइल किंमत १५००० रू ५)एक मोटरसायकल किंमत ६०,००० रू असा एकूण १,०४,०८० रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध पो स्टे अकोट ग्रामीण येथे महाराष्ट्र घुटका बंदी कायदा अन्वे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
*सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकाने केली*
_____________________________________________
*शहर वाहतुक नियंत्रण शाखा हरवलेला बटवा त्याला परत*
अकोला -२४ शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथील अमंलदार यांनी नागरिकाचे हरविलेला बटवा केला परत’’
शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अमंलदार पोकॉ ज्ञानेश्वर वरणकार बन 782, हे आज दि. 23/11/2021 रोजी टॉवर चौक येथे पॉईंट ड्युटीवर असता त्यांना रस्त्यावर पडलेला बटवा सापडला. सदर बटवा तापसले असता त्यामध्ये 3023 रु, Atm ची पावती व इतर महत्वाचे कागदपत्रे होती, Atm च्या पावती वरून ट्राफिक अमलदारांनी सदर बटवा मालकाचा शोध घेऊन त्यांना संपर्क करून सदर बटवा त्यांच्या मूळ मालकास ताबळतोब परत केला, सदर बटवा हा कमलाबाई तायडे रा. कुंभारी यांचा होता. ट्राफिक अमलदारांनी मालकाची योग्य शहानिशा करून सदर बटवा त्यातील सर्व पैशे व वस्तुसह त्यांना सुपूर्द केला. कमला तायडे यांनी आपला बटवा तपासून बघितले त्यातील सर्व वस्तू व 3023 रु त्यांना व्यवस्थित मिळाले, ट्राॅफीक पोलीसांनी त्यास हरवलेला बटवा परत केल्याने त्याचे चेह-यावर वेगळाच आनंद दिसुन आला, व त्याने ट्राॅफीक पोलीसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पोकॉ ज्ञानेश्वर वरणकार यांना "जगण्याचा मार्ग" हे पुस्तक भेट म्हणून दिले
शहर वाहतुक नियंत्रण शाखे तर्फे माननीय पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी नमूद नागरिकाचे हरवलेला बटवा त्यांना परत करून शाखेकडुन उत्कृश्ठ कामगीरी केल्याबद्दल सदर अमंलदाराचे कौतुक केले व अशीच कामगीरीची अपेक्षा नेहमी सर्व अमंलदारांकडुन अपेक्षीत केली आहे.
_____________________________________________
*२५ते २७ पर्यंत रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचार बंदी आदेश लागू*
अकोला- दिनांक १७/११/२०२१ दुपारी १२.०० वाजता पासून ते दि. १९/११/२०२१ चे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत
जमावबंदी व संचारबंदी तसेच संदर्भीय पत्र क्रमांक २,३ व ४ अन्वये दिनांक २५/११/२०२१ चे सकाळी०५.०० पर्यंत संचार बंदी आदेश लागू करणेबाबत प्रस्तावित केले होते. परंतु आजरोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला यांनी संदर्भीय पत्र क्रमांक ५ अन्वये पुन्हा अकोला शहरता अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संचारबंदी वाढविणे आवयश्क असल्याबाबत प्रस्तावित केले आहे. त्यअनुषंगाने आज रोजी संपूर्ण अकोला शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी दिनांक २५/११/२०२१ चे सकाळी ०५.०० वाजता पासून ते दि. २७/११/२०२१ ये सकाळी ०५.०० वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रीया
संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत संचारबंदी बाबत खालील प्रमाणे आदेश लागू करण्यात येत आहे.
A) रात्री १०.०० ते सकाळी ०५.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात येत आहे.
संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरु राहतील सदर आदेशाचे काटेकारपणे पालन करुन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करावा. सदर कालावधीत
१. कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील किंवा विभिन्न जाती धर्माच्या दोन गटा मध्ये निर्माण होईल असे कोणतेही कृत्य, वक्तव्य करणार नाहीत व अफवा पसरविणार नाहीत.
२. जातीय भावना भडकवणारे आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमांव्दारे प्रसारीत करणार नाहीत, आक्षेपार्ह पोस्ट टाकणार नाही व समाज माध्यमांचा गैर वापर करणार नाहीत.
३. कोणत्याही प्रकारचे रैली, धरणे, मोर्चाचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन करणार नाही.
४. निवडणूक प्रचार संदर्भात काही कार्यक्रम असल्यास यासदर्भात निवडणुक निर्णय अधिकारी यांचे वेगळ्याने परवानगी घेणे बंधनकारक राहील.
५. सदर कालावधीत कोविड-१९ लसीकरणाचे सत्र पुर्ण क्षमतेने पूर्वी प्रमाणेच सुरु रहील. सदर आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्तीने अदवि १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र अपराध केला आहे असे मानण्यात येई.