अकोला महानगरपालिकेतील जंपीग पदोन्नती संदर्भात माहिती सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश*
अकोला -दि २९ अकोला महानगरपालिकेतील जम्पिंग पदोन्नती संदर्भात माहिती सादर करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले होते अकोला मनपात सन.२००३पासून२००९पर्यंत सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांनी जेष्ठ कर्मचाऱ्यांना डावलून सन २००९/२०१२ मध्ये कुली,शिपाई, वाहन चालकांनी युनियन च्या मांध्यमातुन महापालिकेमधे पदाधिकार्याच्या आशीर्वादाने पदोन्नती घेतली.अशी सर्व प्रकरणे सादर करण्याचे निर्देश कर्तव्यदक्ष आयुक्तांनी दिल्याने एकच खडबळ उडाली असुन अनेक कर्मचारी आयुक्तावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.तत्कालीन आयुक्त निमा अरोरा यांनी याआधी सहा अधिकार्यांवर धडाकेबाज कार्यवाही करत त्यांना अधिसंख्या पदावर आणत सेवा संपुष्टात आणली होती.त्याच धर्तीवर आपलीही नौकरी जाणार या भितीने जंपीगवाल्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केल्याची माहिती अधिक्रुत सुत्रा कडून मिळाली आहे. बनावट दस्तावेज एलएसजीडी, एमएस सि आय टी,बोगस टिसी,सर्विस बुकाची पडताळणी केल्यास खूप मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता नकारता नाही येत.बरेच कर्मचारी आड मार्गाने सेवेत घेतल्याचे लक्षात येईल.अंन्यायग्रस्त कर्मच्यावर अंन्याय करुन स्वता तुपाशी आणि इतर उपाशी ठेवणार्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यदक्ष आयूक्त कविता व्दिवेदी कश्याप्रकारे हाताळतात या कडे सर्व अंन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्ये लक्ष लागले आहे.मनात येईल तसे पद खिरापती प्रमाणे आपसात वाटून घेतलेआहे,जंपीगवाल्यांनी शासनाची लूट केली त्याची प्रशासन वसुल करणार काय? शासनाची दिशाभूल करून पदोन्नती लाटणार्यावर गुन्हे दाखल होतील का?महत्त्वाच्या पदावर राहून केलेला कामाची चौकशी होईल का?गडगंज संपत्ती जमा केली ती जप्त करणार का?या प्रकरणाकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यी जीत होणार की हार हे पाहणे औत्सुक्याचे होईल. यांच्या वर कार्यवाही नाही झाली तर भविष्यात प्रत्येक शासनाच्या विभागामध्ये जंपीग होऊ शकते. अशा बोगस कर्मचाऱ्यांना कारागृहात टाकावे अशी मागणी शहरातील नागरिक व मनपाती
अंन्यायग्रस्त कर्मचारी करत आहे