*तड़ीपार इसम तड़ीपार आदेशाचे उल्लंघन करून अकोल्यात फिरतना मिळून आल्याने त्यास अटक, विशेष पथकाची कामगिरि**

 अकोला-  दि, 01 सराइत गुन्हेगार तड़ीपार आरोपी प्रवीण सुरेश दलवी वय39 रा हरिहर पेठ जुनेशहर यास अकोला जिल्ह्यातून  2 वर्षा करिता तड़ीपार केलेले असताना सुधा तड़ीपार आदेशाचे उल्लंघन करून गाँधीचौक अकोला मध्ये फिरतना मिळून आल्याने त्यास विशेष पथकाने अटक करून त्याचे विरुद्ध पो स्टे सिटी कोतवाली येथे महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 142 अनवाये गुन्हा नोद करून कार्यवाही करण्यात आली आहे,

सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक सा जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली , पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या पथकाने केली,



_____________________________________________

*मोठा अनर्थ टळला...*

 आज १ डिसेंबर दोजी ४.३० वाजता खचाखच प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी बस अकोट- अकोला मार्गावर पळसोद फाटा जवळ रस्ता व मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्या  झाल्याने असंतुलित बस रस्त्याच्या कडेला पलटी होत असताना सुदैवाने बचावली, सर्व प्रवासी सुखरूप*




_____________________________________________

*स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल जबरी चोरी व घरफोडी करणारा गुन्हेगार अटक एकूण ३,१०,४००/- रुचा • मुद्देमाल जप्त करण्यात आला.*


अकोला - दि३०.०९.रोजी पो.स्टे. सिव्हीललाईन जिल्हा अकोला येथे फिर्यादी नामे अजय नरेंद्र श्राफ वय ५४ वर्ष राहणार जवाहरनगर चौक, अकोला यांनी लेखी तकार दिली की, पत्रकार कॉलनी मधील अंबे माता मंदीरात तीन अज्ञात इसमांनी मंदीरातील मागील बाजुस नेवुन मारहाण करून फिचे सोन्याचे कडे, दोन अंगठया व रोख असा एकुण ३,२९,५००/- रु चा माल जबरीने चोरून नेल्याने १) अपके ८३९/२१ क.३९२, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला


सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंधाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते मार्गदर्शन व सुचना देवून रवाना करण्यात आले असता तपास पथकातील अधीकारी व अमलदार यांनी तांत्रीक विश्लेषनावरून गोपनिय माहितीवरून संशयीत आरोपी नाम सुरज उर्फ दादु संतोष खंडार वय २० वर्ष रा. बेडकर नगर अकोला यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे तिन साथीदार (विधीसंघर्ष यस्त बालक) सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवून विचारपुरस करून नमुद गुन्हयातील गेला माल हस्तगत करण्यात आला.


तसेच सदर आरोपी व त्याचा अन्य साथीदार यांनी मिळून पोस्टे सिव्हील लाईन कडील २)अप के २१०/२१ (४६१,३८०.३) अप के २११/२१ क. ३७९, तसेच पोस्टे रामदासपेठ ४) अप.नं. ९५१/२१ क.३८०.५) ९५२/२१ क ३८० प्रमाणे दाखल गुन्हे केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्हयातील गेला माल असा एकूण ३,१०,४००/- रूचा माल हस्तगत करून आरोपी नाम सुरज उर्फ दादु संतोष खंडारे वय २० वर्ष रा. अंबेडकर नगर अकोला यास पुढील तपास कामी पोस्टे सिद्दील लाईन यांचे ताब्यात देण्यात आले.


सदरीची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक सा.श्री जी श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक सा. श्रीमती मोनिका राउत, मार्गदर्शनाखाली पोनि. संतोष महल्ले, स्थागुशा अकोला, सपोनि नितीन वाण, स्पोउपनि गोपीलाल मावळे, नापोका संतोषबई, विजय यादव, फिरोज खान, संदीप काटकर, मनापोको गिता अवचार, पोशि शक्ती कांबळे, विरेंद्र उदय शुक्ला, पवन यादव, सतीष गुप्ता, सुशील खंडार चालक अक्षय बोबडे यांनी केली आहे.

_____________________________________________

*विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;*


*दावे व हरकती रविवार(दि.5) पर्यंत मागविल्या*


अकोला,दि.1 राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. कार्यक्रमानुसार  निवडणूक आयोगाने निर्धारीत दावे व हरकती रविवार दि. 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.


दावे व हरकती स्विकारण्याचा सुधारीत कालावधी याप्रमाणे : दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार दि. 1 नोव्हेंबर ते रविवार दि. 5 डिसेंबर 2021 पर्यंत. दावे व हरकती सोमवार दि. 20 डिसेंबर पर्यंत निकालात काढणे. तर अंतीम मतदार यादी बुधवार दि. 5 जानेवारी 2022 प्रसिद्धी होईल.


जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक फॉर्म भरून देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुध्दा प्रस्तृत मोहिमेत घेण्यात येणार आहे. तरी अकोला जिल्ह्यातील सर्व नाव व पात्र मतदार यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव नोंदवावे किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपच्या मदतीने सुध्दा मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. या व्यतिरिक्त ज्या मतदारांना ऑफलाईन पध्दतीने आपले नाव नोंदवावयाचे असेल त्यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे देण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

_____________________________________________

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-2021


22 मतदान केंद्रावर होणार मतदान


अकोला, दि.1(जिमाका)- विधान परिषदेच्या अकोला बुलडाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीकरीता 22  मतदान केंद्रास मान्यता देण्यात आले आहे. मान्यता प्राप्त मतदान केंद्राच्या याद्या गुरुवारी(दि.2) रोजी संबंधित तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी, नगरपालिका यांच्या कार्यालयाच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.


मतदान केंद्राची यादी याप्रमाणे : 1) बी.आर. हायस्कुल, सभागृह क्र.1 पोस्ट ऑफीसचे मागे, अकोला, 2) तहसिल कार्यालय, तहसिलदार यांचे दालन अकोट, 3) तहसिल कार्यालय, संजय गांधी शाखा तहसिल कार्यालय तेल्हारा, 4) पंचायत समिती, पंचायत समिती सभागृह बाळापूर, 5) नगर  परिषद, नगर परिषद सभागृह पातुर, 6) तहसिल कार्यालय, संजय गांधी शाखा, तहसिल कार्यालय, मुर्तीजापूर, 7) पंचायत समिती, पंचायत समिती सभागृह बार्शिटाकळी , 8) तहसिल कार्यालय, तहसिल सभागृह वाशिम, 9) तहसिल कार्यालय कारंजा, 10) तहसिल कार्यालय, तहसिल सभागृह मंगरुळपीर, 11) तहसिल कार्यालय, रिसोड, 12) तहसिल कार्यालय, बुलडाणा, 13) तहसिल कार्यालय, मिटींग हॉल चिखली, 14) तहसिल कार्यालय देऊळगाव राजा, बुलडाणा, 15) तहसिल कार्यालय, सिंदखेड राजा बलुडाणा, 16) तहसिल कार्यालय, मिटींग हॉल, लोणार बुलडाणा 17) पंचायत समिती, पंचायत समिती सभागृह मेहकर, 18) तहसिल कार्यालय, खामगाव जि. बुलडाणा, 19) तहसिल कार्यालय, शेगाव जि. बुलडाणा, 20) तहसिल कार्यालय जळगाव जामोद जि. बुलडाणा 21) पंचायत समिती, मिटींग हॉल, पंचायत समिती नांदुरा, 22) तहसिल कार्यालय, प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, मलकापूर

_____________________________________________

पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाचे


जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते लोकार्पण


अकोला,दि.1- शेतकऱ्यांना पिक विमा योजनेची माहिती सहज व साध्या पद्धतीने घरपोच मिळावी याकरीता एचडीएफसी एर्गो कंपनीव्दारे ‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवा सुरु केली आहे. या सेवाचे विमोचन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज करण्यात आले. ‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी याकरीता जनजागृती करा, असेही निर्देश संबंधिताना देण्यात आले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाचे लोकार्पण कार्यक्रम पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक आलोक तेरानिया, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी संध्या करवा, जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, एचडीएफसी इर्गो कपंनीचे जिल्हा समन्वयक रुपेश दिक्षीत, दिलीप सेन, सुनिल भालेराव, तालुका अधिक्षक शंशीकिरण जांभरुणकर, नंदकुमार माने आदि उपस्थित होते.


 ‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवा ही स्वयंचलित प्रोग्राम व चॅटबॉट आहे. जो पुर्णत: डिजिटल प्लॅटफॉर्म आधारित शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासेवेव्दारे पिक विमासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे त्या व्यक्तीला ऑनलाईन व्हाट्सअप बॉटव्दारे मेसेज करुन दिल्या जाते.  ही माहिती मिळवण्याकरीता शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये 7304524888 नंबर सेव्ह करून या नंबरवर व्हाट्सअपव्दारे  हाय(HI) टेक्स्ट मॅसेज पाठवून पिक विमा योजनेबाबतची माहिती तसेच प्रश्नाचे उत्तरे व पीक विमा योजनेत सहभाग नोंदवल्याबाबतची माहिती ‘पिहु’ व्हाट्सअप बॉट सेवेव्दारे उपलब्ध होईल.


‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाचे फायदे :


1)    प्रधानमंत्री पीक विमा योजना व पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक योजनेमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर पिक विमा अर्जाची स्थितीबाबत माहिती उपलब्ध होईल.


2)   विमा योजनेबद्दल विविध प्रकारचे विचारले जाणारे प्रश्नाचे उत्तर यामध्ये मिळेल. उदा. प्रधानमंत्री पीक विमा म्हणजे काय?,  नुकसान भरपाई कशा प्रकारे निश्चित केली जाते?, कोणत्या जोखीम बाबीचा व पिकाचा समावेश आहे?, इत्यादी.


3)   शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने पिक नुकसानीची पूर्वसूचना किंवा तक्रार देण्याकरिता माध्यम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.


4)  योजनेत सहभाग नोंदवला आहे त्याबद्दलची संपूर्ण धोरण पॉलिसीची माहिती मिळेल.


5)  शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसूचना किंवा तक्रार दिल्यानंतर सर्वेक्षणाची(पंचनामा) स्थिती किंवा पीक नुकसान भरपाई, दावा, रक्कम स्थिती याव्दारे समजू शकेल.


6)   पीक विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कृषी व पशु संबंधित अन्य माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


बाईक रॅली व प्रचार रथाला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दाखवली हिरवी झेंडी


अकोला,दि.1- एचडीएफसी एर्गो जनरल इन्शूरन्स कंपनीच्या विद्यमाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत व अमृत महोत्सवानिमित्त दि. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान पीक विमा आठवडा राबविण्यात येत आहे. या सप्ताहमध्ये पीक विमाची जनजागृती व्हावी याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बाईक रॅली व चित्ररथाला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.


जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, पीक विमा योजनेची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. तसेच पिक विमासंबंधी येणाऱ्या अडचणीचे निवारण करुन त्याची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घ्यावी. याकरीता कृषी विभाग व एचडीएफसी इर्गो कपंनीचे समन्वयक यांनी प्राधान्याने काम करावे, असेही निर्देश दिले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक आलोक तेरानिया, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी संध्या करवा, जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, एचडीएफसी इर्गो कपंनीचे जिल्हा समन्वयक रुपेश दिक्षीत, दिलीप सेन, सुनिल भालेराव, तालुका अधिक्षक शंशीकिरण जांभरुणकर, नंदकुमार माने आदि उपस्थित होते.



मतदार जनजागृती अभियान;


श्रीमती एलआरटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य  


अकोला,दि.1- श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्याव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पथनाट्याव्दारे मतदार जनजागृती कार्यक्रम सादर केले. पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन असे पथनाट्य शहराच्या महत्वाच्या ठिकाणी सादर करुन मतदार  जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी(पुनवर्सन) सदाशिव शेलार, बाबासाहेब गाडवे, गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, श्रीमती एलआरटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एल. येऊल, डॉ. एम. जे. साबू, डॉ. एन. एन. चोटिया, डॉ. एन. एम. गुट्टे आदि उपस्थित होते. तसेच या पथनाट्यामध्ये तेजस घोडे, अश्विनी कुळकर्णी, राहुल पोपळघट, राधा इंगळे, शिवानी नागे, निरंजन देशमुख, प्रिया सरदार यांनी सादर केले.




जिल्हाधिकारी यांनी घेतला लसीकरण मोहिमेचा आढावा


कमी लसीकरणाच्या ठिकाणी गती वाढविण्याचे निर्देश


अकोला, दि.1- कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’, ही मोहिम सुरु करण्यात आली असून या मोहिमेमुळे लसीकरणाची गती व प्रमाण वाढले आहे. तथापि काही भागात लसीकरण कमी आहे अशा ठिकाणी लक्षकेंद्रीत करुन गती वाढवा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.  यासंदर्भात आज जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत त्यांनी यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले.


जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो-पटोकार, नगर प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, महिलाव बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, मनपा वैद्यकीय अधिकारी विलास मरसाळे, मनपा वैद्यकीय अधिकारी अस्मिता पाठक, तसेच सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात लसीकरणाची विशेष मोहिम सुरु झाली असून लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसादामुळे गती वाढली आहे. परंतु काही भागात लसीकरण कमी आहे अशा ठिकाणी लसीकरण केंद्र वाढवावे. लसीकरण प्रमाण वाढविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, लसीकरणाचे फायदे समजावणे, लोकांना आवाहन करणे, त्यासाठी प्रत्यक्ष कॉल करणे इ. उपाययोजनांसोबतच रेडिओ व अन्य माध्यमांद्वारे जनजागृती करावे. तसेच लसीकरण कमी असलेल्या भागात तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी व स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष केंद्रीत करुन लसीकरण प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावे,असे निर्देश श्रीमती अरोरा यांनी दिले.




विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;


दावे व हरकती रविवार(दि.5) पर्यंत मागविल्या


अकोला,दि.1- राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. कार्यक्रमानुसार  निवडणूक आयोगाने निर्धारीत दावे व हरकती रविवार दि. 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.


दावे व हरकती स्विकारण्याचा सुधारीत कालावधी याप्रमाणे : दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार दि. 1 नोव्हेंबर ते रविवार दि. 5 डिसेंबर 2021 पर्यंत. दावे व हरकती सोमवार दि. 20 डिसेंबर पर्यंत निकालात काढणे. तर अंतीम मतदार यादी बुधवार दि. 5 जानेवारी 2022 प्रसिद्धी होईल.


जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक फॉर्म भरून देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुध्दा प्रस्तृत मोहिमेत घेण्यात येणार आहे. तरी अकोला जिल्ह्यातील सर्व नाव व पात्र मतदार यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव नोंदवावे किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपच्या मदतीने सुध्दा मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. या व्यतिरिक्त ज्या मतदारांना ऑफलाईन पध्दतीने आपले नाव नोंदवावयाचे असेल त्यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे देण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.











टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने