28 मे रोजी लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता प्रत्येक नागरिकांना निमंत्रण देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची

 28 मे रोजी लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता प्रत्येक नागरिकांना निमंत्रण देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची

अकोला ‌ उत्तम दळणवळणाची व्यवस्था तसेच अकोला च्या संस्कृती विकासाच्या कार्याला गती देण्यासाठी विकास पुरुष नितीन गडकरी यांनी दोन उड्डाणपूल उपलब्ध करून देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव निधी देण्यासाठी तत्पर असणाऱ्या त्यांच्या आगमन प्रसंगी 28 मे रोजी लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता प्रत्येक नागरिकांना निमंत्रण देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले भारतीय जनता पार्टी पश्चिम दक्षिण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते तर मंचावर आमदार गोवर्धन शर्मा अनुप धोत्रे, संजय जिरापुरे संजय गोडा संजय गोडफोडे जयंत मसने अक्षय गंगाखेडकर, अमोल गोगे , निलेशनीनोरे राजेंद्र गिरी अमोल गीते, एडवोकेट देवाशीष काकड दिलीप मिश्रा चंदा शर्मा हेमंत शर्मा बीबी ताई गीते कल्पनाताई सटवा ले, मंगेश सावरकर सुनील बाठे सुनील कांबळे, जयश्री दुबे विजय ठाकूर, विनोद मापारी, आनंद बलोदे, मोहोकार,विजय चौधरी , डॉक्टर संजय ढोरे आदी प्रामुख्याने उपस्थित 28 मे शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता स्थानिक क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभेत लोकार्पण सोहळा अकोलकर यांच्या साक्षीने सुवर्ण अक्षरांनी लिहून जाणारे इतिहासाच्या कार्यक्रमाला अकोलेकर आतुर असून त्यांना निमंत्रण देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करावी असे आवाहन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले जनताजनार्दन हे लोकशाही मधील मालक असून त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी सक्षम असून लोकनेते संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याच्या विकासासाठी व शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली. मतदार कार्यकर्ता तसेच समाजातील सर्व स्तरातील नागरीकांचा सहभाग घेऊन भारतीय जनता पक्ष विकासाच्या कार्याला गती देत असते या गतीला आशीर्वाद देण्यासाठी जागतिक विक्रम करून जलद गतीने दळणवळणाची सोय कमी वेळात कमी खर्चात उपलब्ध करून देणारे विकास पुरुष नितीन गडकरी यांच्या आगमनाने शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन अनुप धोत्रे यांनी केले. दिलीप मिश्रा यांनी कार्यक्रमाचे संचालन तर प्रास्ताविक अमोल गोगे आभार प्रदर्शन हेमंत शर्मा यांनी केले.

============================================

विध्यार्थ्यांना मनपा शाळांमधून इंग्रजी माध्येमातून शिक्षण ध्यावे -डॉ अशोक ओळंबे



अकोला -प्रत्येक नागरिकाला आपला पाल्य इंग्रजी शाळेमधून शिकावा असे वाटत असून खाजगी शाळांची प्रचंड फी असल्यामुळे त्यांना खाजगी शाळेमधून आपल्या पाल्यांना शिकवणे शक्य होत नाही याउलट मनपाच्या मराठी, हिंदी तसेच उर्दू शाळामध्ये अल्प प्रमाणात प्रवेश होत असल्यामुळे मनपाच्या शाळा ओस पडत असून लाखो रुपये शिक्षकांच्या पगारापोटी मनपाला खर्च करावे लागत आहेत.अकोला मनपा मध्ये मक्तेदारी समजणाऱ्या जनसेवकांच्या शिक्षणाबाबत असलेल्या अनास्थेमुळे इंग्रजी माध्येमातून शिक्षण ह्यापूर्वीच सुरु व्हायला पाहिजे होते ते सुरु होऊ शकले नाही ते आता तरी सुरु व्हावे अशी अपेक्षा नागरिकांची असून,मुंबई मनपा शाळेमध्ये चालू वर्षांपासून सी बी एस ई अभ्यासक्रम सुरु होत असून किमान अकोला मनपा शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातुन शिक्षण सुरु करावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.ह्यापूर्वी अकोला मनपा शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून विध्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.चालू आगामी सत्र 2022 पासून मनपा शाळांमधून इंग्रजी मधून संपूर्ण शिक्षण सुरु केल्यास खाजगी शाळेमध्ये जाणारे व फी जास्त असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मनपा हद्दीमधील हजारो विध्यार्थ्यांना मनपा शाळांमधून इंग्रजी माध्येमातून शिक्षण घेता येईल,व गेली 2 वर्षांपासून कोविड संसर्गामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना न्याय मिळेल अशी मागणी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे, प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्त सौं कविता त्रिवेदी मॅडम यांना केली असून आयुक्तानी पुढाकार घेऊन अकोलेकर जनतेसाठी योग्य निर्णय घेऊन मनपा शाळांमध्ये इंग्रजी माध्येमातून शिक्षण सुरु करून अकोला मनपाला नावलौकिक मिळून ध्यावा जेणेकरून मनपा अकोला शिक्षणा क्षेत्रामध्ये सम्पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण करेल अशी विनंती त्यांनी यावेळी मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने