संत गजानन महाराज शेगाव पालखीचे श्रीराज राजेश्वर नगरीत आगमन ८ जून ला
अकोला : श्री संत गजानन महाराज पालखीचे आनंद व दर्शन गेल्या दोन वर्षात कोरोना निर्बंधामुळे हा भक्ती सोहळा झाला नाही. यावर्षी मात्र यावर्षी ८ जूनला श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपुर करीता यावर्षी प्रस्थान करणार आहे यावर्षी हा सोहळा पूर्ववत होणार असून श्रींची पालखी ६ जून रोजी शेगाव येथून पंढरपुर करीता प्रस्थान करणार आहे. ८ व ९ जून रोजी पालखीचा राज राजेश्वर नगरी येथे मुक्काम असणार आहे.दोन दिवस श्रीराज राजेश्वर नगरीत श्रींच्या पालखीचे अत्यंत भक्तीमय वातावरणात स्वागत केले जाणार आहे . लाखो भाविक श्रींचे दर्शन घेण्यार आहेत, करोणा चे सावट असल्यामुळे गेल्या दोन वर्षात भाविकांना हा भक्ती आनंद तसेच दर्शनाचा लाभ घेता आला नव्हता. मात्र आता दोन वर्षा नंतर यावर्षी श्री संत गजानन महाराज पालखीचे श्रीराज राजेश्वर नगरीत भक्तांकडून भव्य दिव्य स्वागत होणार आहे
========================
थकित पाणीपट्टी कर आणि अवैध नळ जोडणी धारकांवर मनपा जलप्रदाय विभागाव्दारे कारवाई.
अकोला दि. 20 मे 2022 – मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकित पाणीपट्टी कर आणि अवैध नळ जोडणी धारकांवर मनपा जलप्रदाय विभागाव्दारे नळ जोडणी खंडीत करण्याची मोहीम सुरू असून आज दि. 20 मे रोजी मनपा क्षेत्रातील पश्चिम झोन अंतर्गत गुलजारपुरा येथील मुख्य पाईप लाईन वरील 20 अवैध नळ कनेक्शन खंडीत करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या कारवाईत जलप्रदाय विभागातील कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे, कनिष्ठ अभियंता तुषार टिकाईत, म.न.पा.झोन कंत्राटदार सुरेंद्र नारखेडे आदींची उपस्थिती होती.
तसेच मनपा क्षेत्रातील दक्षिण झोन अंतर्गत मलकापुर येथील सुरेका नगर, जुने मलकापुर, गुरूकुल कॉलोनी आणि शिक्षक कॉलोनी येथील 33 अवैध नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे. या कारवाईत जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच.जी.ताठे, कनिष्ठ अभियंता कैलास निमरोट, अभिषेक गई, अक्षय वाईंदेशकर, आशिष भालेराव, निवृत्ती दातकर, प्रवीण वरॅळकर, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, फिटर सुबोध वानखडे, अंकुश राठोड, अक्षय शेगोकार, राजु मांजरे, सुरेश वाहुरवाघ, प्रकाश अंभोरे यांचेसह अतिक्रमण विभागातील कर्मचा-यांचा समावेश होता.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकित पाणी पट्टी धारकांना तसेच अवैध नळ जोडणी धारकांना मनपा जलप्रदाय विभागाव्दारे आवाहन करण्यात येत आहे कि, त्यांनी थकित पाणी पट्टी कर भरून तसेच अवैध असलेली नळ जोडणी वैध करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच थकित पाणी पट्टी देयकाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास अकोला महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाशी संपर्क साधून देयके दुरूस्त करून थकित पाणी पट्टी कराचा भरणा वेळेवर करून नळ जोडणी खंडीत करणे सारख्या अप्रीय कार्यवाही टाळावी.
========================================
अकोट विधानसभा मतदारसंघातील मुख्य रस्त्याच्या कामाला गती शासन देत नाही
अकोला - अकोट विधानसभा मतदारसंघातील मुख्य रस्त्याच्या कामाला गती शासन देत नाही आता पालकमंत्री पाणंद योजना अंतर्गत 100 रस्ते खोदून ठेवून शेतकऱ्यांना शेतमजुरांना व गावकऱ्यांना त्रास देण्याचा हेतू प्रशासन व सरकारचा आहे का असा सवाल भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी करून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केला या आंदोलनात अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा महानगर भाजपाध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात माधव मानकर, वसंत बाछुका , श्री अतुल अग्रवाल गिरीश जोशी अजय शर्मा राजेंद्र गिरी यांनी सक्रिय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती सभा घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केला जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सावरकर यांनी देऊन यातील विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व बांधकाम विभाग का झारीतील शुक्राचार्य बनवत असल्याचा प्रश्न आमदार गोवर्धन शर्मा यांनी उपस्थित केला तर शेतकरी शेतमजूर व ग्रामस्थांना त्रास देण्यात मागील शासनाचा व प्रशासनाचा तसेच महाविकास आघाडीचा काय हेतु आहे असा सवाल भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केला यावेळी बांधकाम विभाग जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी सहभागी होते जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केला जिल्ह्यातील रस्ते अकोट मतदारसंघातील प्रमुख रस्ते सोबत शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पानंद रस्ते का करण्यात येत नाही असा सवाल आमदार भारसाकळे यांनी केला हरीश पिंपळे तसेच भाजपा पदाधिकारी माहिती मिळतात जिल्हाधिकारी कार्यालय समोर जमा झाले सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्ष लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचा विकास कामे जोपर्यंत कामांना सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे यावेळी शेगोकार,गाडे आदी उपस्थित होते शेतकऱ्यांना येणे जाण्यासाठी ही योजना शासनाची असून त्रास देण्यासाठी आहे का असाही प्रश्न या निमित्ताने सुरू होत आहे मार्च आधी निधी मंजूर झाला आतापर्यंत कामे करण्यात आली नाही कामे रस्ते खोदून सर्वसामान्यांना त्रास देण्यात मागील काय असाही सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सर्व रस्त्यांची कामे शीघ्र गतीने करून जिल्ह्यातील सर्व कामे त्वरित सुरू आंदोलन जिल्हाभर येतील असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी दिला ,
अमोल गोगे गणेश अंधारेसतोष पांडे राजेंद्र गिरी हरिभाऊ काळे अजय शर्मा विकी ठाकूर मनोज साहू संजय गोडफोडे, केशव पोतदार, दिलीपमिश्रा, वंशी ठाकूर, आनंद शर्मा,गणेश सपकाळ, संतोष डोंगरे, हेमंत शर्मा, योगेश मानकर तुषारभिरड अभिजीत कडु उमेश सटवाले रमेश करीहार अनिल नावकार, संजय जिरापुरे अनुप धोत्रे शितल जैन जस्मीत सिंग ओबराय, पवन महल्ले, गणेश सारसे टोनीजयराज अनिता चौधरी राजेश चौधरी, नवीन जाधव, समाज कर कर, निलेश ढेवा , मनीष बुंदेले ,सतीश येवले, संजय गोडा, अवचार प्रशांत,अक्षय गंगाखेडकर, राहुल इंगळे, निलेश निनोरे राजू बालाजी शर्मा ,रमेश अलकरी अधिकारी सपकाळ , विजय चौधरी , उमेश गुजर , अश्विनी हातवळणे , रणजित खेडकर , वैकुंठ ढोरे , गिरीराज तिवारी , शंकर राहुल घोटे लखन जोशी गणेश पावसाळे सहभागी झाले होते जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्हा परिषद अधिकारी लेखी देऊन पंधरा दिवसात कामे करण्याचे अभिवचन दिल्यानंतर भाजप नेत्यांनी आंदोलन मागे घेतले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांना माहिती पडत असून जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली मातृशक्ती युवाशक्ती तसेच शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
======================================
अकोला कृषि विद्यापीठात "चीफ रेक्टर T-10" क्रिकेट स्पर्धाचे आयोजन!
अकोला कृषी विद्यापीठामध्ये सेवारत प्राध्यापक, शास्त्रज्ञ,अधिकारी- कर्मचारी वर्गांचे तसेच कृषि शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे संकल्पनेतून आणि मार्गदर्शनात अकोला कृषि विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गासाठी विद्यापीठ स्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन गत काही वर्षांपासून करण्यात येत आहे. क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, यासह रांगोळी कथा गायन स्पर्धांचे आयोजन अकोला मुख्यालयी करण्यात येत होते. या स्पर्धांना मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेत कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे अंतर्गत अधिकारी-कर्मचारी वर्गांचे विद्यापीठस्तरीय सामन्यांचे आयोजन अकोला कृषी विद्यापीठातून सुरू झाले व आज ही मालिका अकोल्यासह परभणी कृषी विद्यापीठ,राहुरी कृषी विद्यापीठ, आणि दापोली कृषी विद्यापीठ स्तरावर राबवत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गांना आपले कलागुण दर्शविण्याची तथा परस्पर सहकार्य एकोपा आणि मैत्रीची भावना जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य सफल होत आहे
आता याच मालिकेत कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देत विद्यापीठांतर्गत क्रिकेट महोत्सवाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य वसतिगृह अधीक्षक यांचे नेतृत्वात वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना करिता 3 ते 5 जून 2022 दरम्यान विद्यापीठाचे क्रीडांगणावर करण्यात येत आहे. " चीफ रेक्टर - T-10 क्रिकेट कॅम्पस ट्रॉफी 2022 " या क्रीडा महोत्सवाचे निमित्ताने अकोला कृषी विद्यापीठात शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळातील आपले कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली असून अधिकाधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील विजेता उपविजेता संघासह उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजांना आकर्षक बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले असून मा. विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाचे माध्यमातून आयोजित तथा भारतीय स्टेट बँक शाखा डॉ. पं दे कृ वि प्रयोजित या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठांतर्गत मुख्य वस्तीगृह अधीक्षक यांच्यासह सर्वच वसतिगृहांची अधिक्षक त्यांचे सहकारी प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी गण अथक परिश्रम घेत आहेत.
==============================
उरळ पोलिसांची धडाके ची कारवाई.
उरळ पोलिसांची धडाके ची कारवाई. हकीकत अशी आहे की नमूद करता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व एन पी सी 20 79 चे गायगाव ते निमकर्दा पेट्रोलिंग करीत असताना यातील गुप्त बातमीदाराने पोलिसांना बातमी दिली की हात्रुन कडून एक मोटरसायकल फॅशन प्रो गाडी क्रमांक MH.30,1692 ही गाडी गोवंश घेऊन येत आहे अश्या खात्रीलायक बातमी वरून पोलिसांनी गायगाव गणपती जवळ नाकाबंदी केली असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक मोटर सायकल दिसली म्हणून पोलिसांनी पोस्टची मदतीने त्यास पकडून त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव शेख आझाद शेख युनूस राहणार हात्रुन असे त्याने सांगितले त्यावरून पोलिसांनी त्याचे झाड झडती घेतली असता त्याच्या जवळून 50 किलो गोवंश अंदाजे दहा हजार रुपये व एक मोटर सायकल किंमत 50 हजार रुपये असा एकूण 60 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन घटनास्थळी जप्त केला व पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला सदर कारवाई ही पोलीस स्टेशन ठाणेदार अनंत राव वडतकर साहेब सोबत विजय सिंग झाकटे सोबत रघुनाथ नेमाडे यांनी ही कारवाई केली.
==============================
अकोट, जि. अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी.डी.ए. अॅक्ट अन्वये
अकोट एक वर्षाकरीता स्थानबध्द ईप्तेखार प्लॉट, अकोट येथे राहणारा कुख्यात गुंड शाकीर खॉ. बिस्मिल्ला खॉ., वय २८ वर्षे, याचे वर यापूर्वी रस्ता अडवणुक करणे व शिवागाळ करून मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, अवैधरित्या शस्त्रबाळगणे, गंभीर दुखापत करणे, जबरदस्ती गृह प्रवेश करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुद्ध गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड शाकीर खॉ. बिस्मिल्ला खॉ. याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २०/०५/२०२२ रोजी पारीत केला. मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून शाकीर खॉ. बिस्मिल्ला खॉ.
याचा तात्काळ शोध घेवून त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक २०/०५/२०२२ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांचे
मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, मोनिका राउत, तसेच सहायक पोलीस अधीक्षक, अकोट उपविभाग, अकोट, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. अकोट शहर येथील पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे तसेच पो.स्टे. तील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरूध्द एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावति असुन माहे-जुलै २०२० ते मे २०२२ हया कालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकुण ६६ गुन्हेगारांनावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे
==============================
गोवंश जनावर चोरी, धान्य चोरी, मोटार सायकल चोरी, इत्यादी चोरीचे ०९ गुन्हे उघडकीस आणुन १,६४,०००/- रु मुद्देमाल जप्त करून ०४ आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
अकोला जिल्हयातील विविध विकाणी घडलेल्या गोवंश जनावर चोरी, धान्य गोरी, दुकान फोडुन केलेली चोरी याबाबतचे उघडकीस न आलेल्या गुन्हयाचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर साहेब मार्गदर्शक सूचना दिल्याने सदर गुन्हयाया तपास करीत असताना दि. १६/०५/२०२२ रोजी गोपनिय माहीती मिळाली की, शेख मोहसिन शेख मकसुद वय २६ वर्षे रा. अकोट फैल, अकोला याने त्याचे साथीदाराचे मदतीने गोवंश जनावर चोरी केली आहे अशा माहीती वरून त्यास विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदाराचे जदतीने ०१) पो.स्टे. बार्शीटाकळी अप. क. १२/२०२२ कलम ३७९ भा. द. वि. ०२) पो.स्टे. बार्शीटाकळी अप. क. ५१ / २०२२ कलम ३७९ भा.द.वि. ०३) पो.स्टे. मुर्तीजापुर शहर अप. क. १२४/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. मधिल गोवंश गाय बैल चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्याचे कडुन रोख ५९,०००/-रू जप्त करण्यात आले. सदर आरोपी पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. बार्शीटाकळी यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच दि. १६/०५/२०२२ रोजी आरोपी जामे मयुर दिलीप गिरी वय २९ वर्षे रा. सिरसो ता. मुर्तीजापुर याने पो.स्टे. बोरगाव मंजु अप. क. २५/२०२२ कलम ४६१,३८०, ४२७ मा.द.वि. तसेच पो.स्टे. बोरगाव मंजु अप.क. ९७ / २०२२ कलम ३७९ भा.द.वि. मधिल गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याचे कडुन गुन्हयातील ७६००/-रू जप्त करून पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. बोरगाव मंजु यांचे ताब्यात देण्यात आले.
दि. १९/०५/२०२२ रोजी माहीती मिळाली की, आरोपी नागे लक्ष्मण बळीराम दळवी वय ६० वर्षे रा.. पिंजर, अकोला व आरोपी नामे गंगेश कसनदास राठोड वय २३ वर्षे रा. जनुना ता. बार्शीटाकळी यांनी परीसातील तुरी चोरी केली आहे. अशा माहीती वरून ठाणेदार सपोनि. अजयकुमार वाढवे, पोउपनि मेश्राम, व पो. स्टाफ पो.स्टे. पिंजर यांचे मदतीने आरोपीस ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी पो.स्टे. बोरगाव मंजु ०१) अप.क.४६ / २०२२ कलम ३७९ भा.द.दि. ०२)पो, स्टे, बोरगाव मंजु अप. क ४८/ २०२२ कलम ३७९ भा.द.वि. ०३) पो.स्टे. पिंजर अप. क्र. १५२/२०२२ कलम ४६१,३८०,५११ मा.द.वि. मधिल गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांचे कडुन ७८,०००/-ल किंमतीची तुर जप्त केली तसेच आरोपी नामे मंगेश कसनदास राठोड वय २३ वर्षे रा. जनुना ता. बार्शीटाकळी याचे कडे असलेली मोटार सायकल हिरो पॅशन प्रो एम. एच. ३७ एम ९००३ किंमत अंदाजे २०,०००/- रू हि पो.स्टे. जडलका जि. वाशिम अप.क. १३३ / २०२२ कलम ३७९ भा.द.वि. मधिल असल्याने जप्त करून आरोपी पुढील तपास कामी पो.स्टे. बोरगाव मंजु यांचे ताब्यात देण्यात आले. एकंदारीत गोवंश जनावर चोरी, तुर चोरी, मोटार सायकल चोरी व इतर चोरीचे ०९ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १,६४,०००/- रू. मुददेमाल जप्त करून ०४ आरोपी अटक करण्यात आले.
कार्य पोलीस अधिक्षक श्री. जी. श्रीधर सा. मा. अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती ओनिका राउत मॅडम, पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. गोपाल जाधव. ए. एस. आय. दारत बोरकर, नितीन ठाकरे, नापोकॉ गोकुल चव्हाण, पो. कॉ. लिलाधर खंडारे, पो.का स्वप्निल खेडकर पो को अन्सार शेख, ना.पो. कॉ/ नफीस शेख, अदाय बोबडे, पो. कॉ. विजय कबले यांनी केली.
=====================================
मातोश्री पाडलोग रस्ता मोरगाव भाकरे ते मांजरी या रस्त्याचे एक किलोमीटर उद्घाटन
मातोश्री पाडलोग रस्ता मोरगाव भाकरे ते मांजरी या रस्त्याचे एक किलोमीटर उद्घाटन दि 17/5/2022/ झाले असुन या रस्त्याचे काम लवर सुरू होणार आहे या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे व या रस्त्याची पूर्ण पाहणी महादेवराव भागवत मडळ अधिकारी आगर पोलिस पाटील दत्तात्रय माळी सरपंच उमाताई माळी भुरे ठेकेदार दादा वंजारे ज्ञानेश्वर ढेवळे गोपाल भटकर मिलींद खंडारे संतोष आवटे दिनेश भोबडे बंडु माळी व तसेच गावातील शतकरी हजर होते
-----------_-----------------_-----------------------
*महत्वाचे; सुधारित दौरा कार्यक्रम रद्द*
मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकोला येथील दौरा कार्यक्रम रद्द झाला आहे.





