भाजपच्या आमदारांची पोलखोल ..... बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना चा प्रकार भारतीय जनता पार्टी करीत आहे -
आमदार अमोल मिटकरी
अकोला दिनांक १४ छत्रपती संभाजी महाराज जयंती च्या दिवशी विधान परिषद चे सदस्य झाले होते आज या सदस्य पदाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्य विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आमदारांची पोलखोल यावेळी त्यांनी केली ते पुढे म्हणाले की ग्रामीण भागात तसेच शहरी भागात मला जे काही करता आले ते मी या दोन वर्षात करून दाखवले बोरगाव मंजू येथे उप रुग्णालय दिले मात्र अकोला पूर्वचे आमदार रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत,
हे रुग्णालय महाविकास आघाडीच्या वतीने उभारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच तेल्हारा तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न फार गंभीर होता तसेच चिपी धरणाचा प्रश्न हा फार गंभीर होता अधिवेशनात त्याचा पाठपुरवठा करून 84 खेडी अंतिम मंजुरात दिली ते सुद्धा श्रेय महाविकास आघाडीच असल्याचं त्यांनी सांगितले चिपि धरणाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी 22 कोटी प्रशासकीय मान्यता त्यांनी दिली ते श्रेय सुद्धा महाराष्ट्र आघाडी सरकारचे आहे, मात्र भारतीय जनता पार्टीचे अकोट व अकोला पूर्व या दोन्ही मतदारसंघात कामे केल्याचा दावा ते करीत आहेत या दोन्हीही मतदार संघातील आमदार श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, काल रोजी चिपी धरणाचा श्रेयवाद लाट्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे आकोटच्या आमदारांनी लाटण्याचा प्रयत्न केला आघाडी सरकार हे कुछ कामे असल्याचा दावा ते करत आहेत असे भारतीय जनता पार्टी करीत आहे ते पुढे बोलताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्याचे खासदार हे बऱ्याच दिवसापासून आजारी आहेत ते जनतेमध्ये कुठेच दिसत नाहीत मात्र खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, हा भाजपचा खोटारडेपणा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीने बोरगाव मंजू चे रुग्णालय आम्ही बांधले तसेच चिपी धरण आम्ही बांधले पाणीपुरवठ्याचे प्रश्न आम्ही सोडवले असे श्रेय भारतीय जनता पार्टीने फुकटामध्ये लागू नये असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे तसेच अकोल्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल चालू करण्याकरिता प्रामाणिक पणे भारतीय जनता पार्टीच्या खासदार तसेच चार आमदार यांनी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू करण्याकरिता प्रयत्न केला असता तर आज हे हॉस्पिटल सुरू झाले असते मात्र आता आघाडी सरकार हे हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न आहे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन सुद्धा महाविकास आघाडी च करेल असे प्रतिपादन त्यांनी दिले आजच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अकोला महानगर करिता पाच कोटी तीस लाख रुपये चा निधी अजित दादा पवार यांनी दिला आहे आता काय याचे श्रेय भारतीय जनता पार्टी घेणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला भारतीय जनता पार्टी खोटे बोलणे रेटून बोलणे हे भारतीय जनता पार्टी चे संस्कार आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आज मी पत्रकार परिषद याकरिता बोलावली की उलटा चोर कोतवाल को दाटे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना चा प्रकार भारतीय जनता पार्टी करीत आहे ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र विकास आघाडी सरकार हे खंबीर आहे, मी राष्ट्रवादी चाआमदार यानात्याने मी आपणास सांगतो की फालतू श्रेय आपण घेऊ नका असे त्यांनी भाजप विषयी बोलून दाखविले ज्यांनी काम केले त्यानाच हे श्रेय मिळाले पाहिजे आज ही पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीचा पोल खोल सहपुराव्यानिशी पत्रकार परिषद बोलावली होती असे आमदार मिटकरी यांनी बोलून दाखवले
=============================
राष्ट्रवादी स्टाईलने लवकरच उडान पुलाचे उद्घाटन -
आमदार अमोल मिटकरी
अकोला -दिनांक १४ भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे व भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी उड्डाणपूल आणल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार आमदार करीत आहेत मात्र हा पूल आणला आहे निश्चित आनंदाची गोष्ट आहे मात्र आपुल चुकीच्या जागी बांधला असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे जिथे गर्दी होते त्याच ठिकाणी आपुल उतरवण्यात आला आहे आता हे पाहून हे पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अस्वस्थ होतील हे निश्चित आहे आमदार अमोल मिटकरी पुढे म्हणाले की या पुलाचे उद्घाटन लवकरात लवकर करा अन्यथा राष्ट्रवादी स्टाईलने उडान फुलाचे उद्घाटन आम्ही करू असेही नितीन गडकरी यांनी बोलून दाखविले
============================

