गावकर्यांचा बांध फुटला! गाड्यांची तोडफोड
मॉन्टोकार्लो कंपनी च्या गाड्यांची तोडफोड मा. सरपंचा सहित 21 जणांवर गुन्हे दाखल. अनेकांची नावे जाणूनबुजून गोवण्यात आल्याचि चर्चा
पातूर : पातूर पोलीस स्टेशनं हद्दीत येत असलेल्या भंडारज येथे क्षुल्लक कारणामुळे वाद होऊन वादाचे पर्यावसन गंभीर बाबीत होऊन यात तब्ब्ल 13ते 14 गाड्याचि तोडफोड करून 4 जण जखमी झाल्याचि घटना शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि भंडारज येथील माजी सरपंच दिपक इंगळे हे आपल्या मोटारसायकल ने जात असता त्यांचा अपघात घडला दिपक इंगळे यांनी याबाबत कंपनी च्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांना उद्धटपणे उत्तर देण्यात आले. मान्टोकार्लो कंपनीचे कर्मचारी नेहमी गावकरी मंडळीशी या ना त्या कारणावरुन गावकर्यांना नेहमी त्रास देतात. वाहने भरधाव वेगाने चालविने. या कंपनीच्या धुळी मुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे पिक खराब झाली .या बाबत न्याय मागीतला असता त्यांना सपशेल हाकल्यात येते.या कंपनी मागे राजकीय व प्रशाषकीय वरधस्त असल्याने कंपनीची दादागीरी वाढत चालली.दीपक इंगळे यांची अपघाताची माहिती गावकऱ्याना होताच गावकर्यांचा नेहमीच्या त्रासाचा सुटकारा व्हावा करीता गावातील 30ते 40 युवक व नागरिकांनि हातात लोखंडी पाईप, काठ्या आणून कंपनी वर हल्लाबोल करून यात तब्ब्ल 13ते 14 गाड्याच्या काचा फोडून मशीन चे सुद्धा नुकसान करण्यात आले असून या मारहाण मध्ये कंपनी चे कृष्णा अण्णप्पा लोखण्डे, संजयसिहं जुदागीरसिंग,रितुराज श्रीबाळकृष्ण, विनोद विद्यासागर भारती हे जखमी झाले असून फिर्यादी कृष्णा अण्णप्पा लोखंडे यांच्या फिर्यादी वरून गणेश दिगंबर भगत, सुरेश दीपक इंगळे, गौरव दीपक इंगळे, ऋषिकेश बळीराम इंगळे, राहुल शेळके, श्रीकृष्ण देवराव इंगळे, दिशांत सिद्धार्थ इंगळे, गुजचंद वानखडे, सम्राट दिलीप तायडे, शिवसागर वामन इंगळे, संतोष लक्ष्मण इंगळे, शुभम शिंगणे, येवलेश भोयर, गणेश मिसाळ, गौरव वाघ, गणेश राऊत, विजय भालेराव, संकेत मिसाळ, राहुल घुगे, राम भालेराव, दीपक इंगळे, असे एकूण 21 जणां विरुद्ध अप नंबर 170/22कलम 143,147,148,148,324,341,299,427,506ipc ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील आठ आरोपीना अटक करण्यात आली . कंपनीचे व प्रशाषकीय अधीकारी यांचे मधुर संबध असल्याने अनेक निर्दोष नागरीकांना या घटनेत गोवण्यात येत आहे.सदर घटनेची पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहे
============================
बासर तिर्थक्षेत्रावरील गोदावरी नदीत बुडून अकोला येथील दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू दोन्हीही विद्यार्थी आई-वडिलांना एकूण ते एक
अकोला - येथील काही विद्यार्थी धर्माबाद पासून जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील बासर तीर्थक्षेत्रावर शुक्रवारी रात्री दर्शनासाठी आले होते. शनिवारी ते नदीत पोहायला उतरले पण त्यांना पोहता येत नसल्यामुळे अकोला येथील दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे दोन्ही विद्यार्थी घरातील आई-वडिलांना एकूण ते एक असल्याचे बोलले जात आहे,तटरक्षक दलाच्या जवानांनी व कोळी बांधवांच्या मदतीने त्यांचे मृतदेह किनाऱ्यावर काढण्यात आले असून प्रतिक गावंडे वय वर्ष 22 शिक्षण एम.कॉम.व किरण लटकुटे वय वर्षे 23 शिक्षण आय.टी.असे विद्यार्थ्यांची नावे असून मुधोळ येथील सर्कल इंस्पेक्टर विनोद रेड्डी व बासर चे पोलीस उपनिरीक्षक यांनी उपरोक्त दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह म्हैसा येथे शव विच्छेदनासाठी पाठवले असून सदरील घटनेमुळे तीर्थक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.पुढील तपास मुधोळ व बासर पोलिस मिळून करीत आहेत. आज सकाळी दोन्ही विद्यार्थ्यांचा अकोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आला
==============================
वाहनाचे सायलेन्सर बिनापरवांगीने बदलवुन फटाके फोडणा-या बुलेट वाहनावर शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे केली कायदेशीर कार्यवाही
अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणा-या भागात काही खोडकर वाहन चालकांनी मुख्यतः बुलेट वाहनात विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसवुन फटाके फोडण्याचे प्रकार अकोला शहरात वाढले आहे. ज्यामुळे अशा वाहनाव्दारे रस्त्यावर चालनारे वाहन चालक तसेच महीलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक तक्रारी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी आज दि 15/05/2022 रोजी सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विषेश मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन 13 वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
सायलेन्सरव्दारे फटाके फोडणारे बुलेट वाहन तसेच इतर वाहने ज्यामध्ये कर्णकरकश आवाज करणारे अवैध साहीत्य लावुन शहरातील नागरिकांना त्रास देणा-या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करणेकरीता सदरची मोहीम अकोला शहरात सतत राबविण्यात येणार आहे.
करीता अकोला शहरातील सर्व वाहन चालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकश आवाज करणारे हाॅर्न लावण्यात आलेले आहे अशा वाहन चालकांना पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन आवाहन करण्यात येते की अशा वाहनांचे सायलेन्सर व हाॅर्न शासन नियमांनुसारच लावावे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल.
==================================
स्थानिक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन गावठी देशी बनावटी कटटा व एक पितळीवा जिवंत काडतुस वापरणारा आरोपी गजाआड २५,५००/- रु. मुददेमाल जप्त
अकोला - पो.स्टे सिहील लाईन परीसरात देन स्नेचिंग में आरोपीची माहीती काढणे करीता सरकारी वाहन फ. एम.एच.२०. एच.५५२ भी पो.स्टाफ सपोउपनि शेर अली ब.नं. १२२६ ना.पो.का.संतोश गवई बन ७६८, फिरोज आन, मास्वर धोत्रे १५०१. पा.का. रिजवानखडेब.नं.८९०, आकाश मानकर ब. २२४७, मोहम्मद आमीर २९२ चालक ना. पो. का. नफिज १२५२ पेट्रोलींग करीत असतांना विठ्ठल मार्केट जवळ गुप्त बातमी दाराकडुन माहीती मिळाली की एक इसम रेल्वे गेट समोर खुल्या जागेत न्यु तापडीया नगर सिव्हील लाईन येथे कमरेला देशी कटटा लागून बसलेला आहे. अशा खात्रीलायक माहीती वरून आम्ही सदरची माहीती मा.पो. जीसा. यांना देवून त्यांचे मार्गदर्शना खाली आम्ही दोण पंचामा विठ्ठल मार्केट उमरी येथे बोलावुन सरकारी वाहनानी घटनास्थळी जावुन दुरूनच पाहनी केली असता एक इसम रेल्वे वे खुल्या जागेत बसलेला दिसला त्यास पो.स्टाफ व पंचांचे मदतीने घेराव टाकून त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव या विचारले असता त्यांनी त्याचे नाव सैयद अवेस रजा अमीर रजा वय २२ वर्ष रा. १८ नं. शाळेजवळ, अणाभाऊ साठे फोट फैल अकोला असे सांगीतले आम्ही त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कमरेच्या पॅन्ट व्या कमरेजवळ एक बदेशी कटटा व एक जिवंत काडतूस स्टिील बॉडी असलेली दोन्ही बाजुस काळ्या रंगाची फायबर पट्टी असलेली गावटी देशी बनावटी कटटा व एक पितळीचा जिवंत काडतुस किनंत अंदाजे २५,५००/ मिळुन आले ताब्यातील इसन याला गावटी बनावटी देशी कटटा व जिवंत काडतुरा जवळ बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचार केली असता परवाना नसल्याचे त्याने सांगीतले नमुद आरोपीतां विरुध्द पो.स्टे सिव्हील येथे कलम ३.२५ आर्म ऑक्टगुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर मा अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राउत, पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोलायांचे मार्गदर्शनाखाली स.पो. नि. गोपाल ढोले. ए. एस. आय. शेरअली शेरअली पशी संतोष गवई, नापोशी फिरोज, पोशी आकाश मानकर, अभिर, धिरज, स्थागुशा अकोला यांनी केली.
===================
अवैध देशीदारु विक्री करणारे इसमावर कार्यवाहित 2 पेटी देशीदारु 6000 रूपयांचा मुद्देमाल जप्त
अकोला - दि, 15,05,22 रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास खात्रिशिर मिळाली की जूना RTO रोड़, गौतम नगर येथे अवैध रित्या देशीदारु विक्री चालू आहे अशा खात्रिशिर ख़बरेवरुन छापा मारला असता अब्दुल आरिफ अब्दुल कादर आनी विमल मोतीराम शिंदे हे अवैध रित्या देशीदारु विक्री करताना मिळून आलेत त्यांच्या जवळून देशीदारु टैंगो संत्रा च्या 2 पेटया दारू ज्यात 96 नग देशी दारू क़ीमत 6000 रूपयांचा मुद्देमाल मिळून अल्याने अरोपिता विरुद्ध पो स्टे खदान येथे महाराष्ट्र दारुबन्दी कायद्याच्या अनवये गुन्हा नोंद करण्यात अलेला आहे
सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक यानी PS खदान येथे आज केली.
==============================
स्थानिक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन ०७ गोवंशाना जिवदान ६४६०००/-रु. मुद्देमाल जप्त
अकोला - दि १४ रोजी आम्ही व पोलीस स्टॉप सहा फो. / १२२६ शेरअली, नापोशी / ७६८ संतोष दोशी/५२६ फिरोज, पोशी/ २२४७ आकाश मानकर, पोशी / २९२ अमिर, पोशी / ८२० विरज, पोथी/७५५ असे मा. पोलीस निरीक्षक सास्थागुशा अकोला याचे आदेशाने अकोला शहरात खाजगी वाहनाने रवाना झालो. अकोला शहराल पेट्रोलींग करीत असतांना उमरी पेट्रोल पंप जवळ मुखबिर कडुल खात्रीशिर माहीती मिळाली की. गोवंश जातीचे बैलांची चावाको वाहणामध्ये कोबुन कत्तली करीता वाहतुक होत आहे. अशी माहीती मिळाल्यावरून सदरची नाहीती मा. पोलीस निरीक्षक सा. स्वागुशा अकोला यांना देवून त्याचे मार्गदर्शनाखाली कारवाही करणे करीता मिळालेल्या माहीती प्रमाणे शुदि रेलवे केली असता, यावलखेड रोडने रेल्वे पटरीकडुन दोन चारचाकी पिकअप वाहन येतांना दिसले त्यांना आम्ही व पोलीस स्टॉप व पंचाचे मदतीने थांबवून वाहण क. एम. एच ३० बिडी ३२६१ मधील चालक याला त्याचे नाव असता त्याने त्यांचे नाव १) शेख हसन शेख अब्दुल वय ३२ वर्ष, रा. मोडके वाडी वाशिम बायपास जुने शहर अकोला असे सांगुन वाहनाची पाहणी केली असता वाहणामध्ये ०३ गोवंश जातीचे बेल मिळुन आले व वाहण क्र. एमएच ३० बिडी ३६४८ मधील चालक याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव २) प्रथमेश हिंमतराव लाहोळकार, वय १२ वर्ष रामगुल पो आर्शिटाकळी, जिल्हा अकोला असे सांगुन चाहणाची पाहणी केली असता वाहणामध्ये ०४ गोवंश जातीचे बैल मिळून आले. असे एकूकुन ७ बैल निर्दयतने चारचाकी वाहणामध्ये काँबुन बाधलेल्या स्थीतीमध्ये दिसून आले असा एकुन ६४६०००/- चा माल पंचासमक्ष घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आला असून सदर जनावरे आदर्श गौसेवा संस्था, महेशपुर अकोला येथे जमा करण्यात आले. नमुद आरोपीतां विरुध्द पो.स्टे सिव्हील येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण
अधीनियम प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती मोनिका राउत, पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा अकोलायांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गोपाल ढोले ए. एस. आय. शेरअली शेरअली, नापी संतोष गवई नामोशी फिरोज, पोशी आकाश मानकर, अमिर, धिरज, स्थागुशा अकोला यांनी केली.



.jpeg)