अम्रुत योजनेचा गाजावाजा?सैलानी नगर,वानखडे नगर येथे पाणी टंचाई
अमृत योजनेचे पितळ पडले उघडे
अकोला महानगरपालिका आणि संत्ताधार्यानी अम्रुत योजनेचा मोठा गाजावाजा करीत बंट्ट्याबोळ करून ठेवला. यामुळे अमृत योजनेचे पितळ उघडे पडले आहे , तर काही ठिकाणी अमृत योजनेचा पाईपच पोचला नाही शहरातील नागरिकांना पाण्यासाठी हवालदिल करून ठेवल्यामुळे डाबकी रोड परिसरातील सैलानी नगर,वानखडे नगर हा भाग शेवटी येत असल्याने त्याच्या घरापर्यंत पाणी पोहचत नाही तर दुसरीकडे पाण्याच्या टाक्या ओवर फ्लो होत आहेत गेल्या किती दिवसापासून अकोल्याचे तापमान 45,46 डिग्री तापमानात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी मोठा गाजावाजा करीत मोटर विना तिसऱ्या माळ्यावर पाणी जाणार असे खोटे आश्वासन देऊन नागरिकांना चॉकलेट दिले होते मोटर विना पाणी तिसऱ्या माळ्यावर जाणे तर सोडा नळाला पाणीच आले नाही असाच प्रकार डाबकी रोडवर परिसरात होताना दिसत आहे,ज्यादिवशी नळ येतात तेथील भागातील नागरिक मोटारी लावून पाणी घेत असल्याने ज्यांच्याकडे मोटर नाहीत त्या भागात पाणी पोहचत नाही. अश्या नागरिकावर महानगरपालिकेने मोटारी जप्तीची व दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आज नळ आले परंतु येथील नागरिकांना पाणी मिळाले नसल्यामुळे त्यांनी जलप्रदाय विभागाचे अभियंते चोपडे आणि वाँल ओपनर यांना फोन करून पाहिले असता सर्व नाँटरिचेबल असल्याचे म्हणणे आहे , अधिकारी फक्त एसी मध्ये बसण्यापुरतेच आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे, डाबकी रोडवरील सैलानी नगर,वानखडे नगरातील काही भाग आजही पाण्यापासून वंचित राहिले याबाबत आयुक्तानी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.100%अम्रुत योजनेचा गाजावाजा करणाऱ्याना येणाऱ्या निवडणुकीत त्याची जागा दाखवून देऊ अशीही चर्चा नागरिकांमधून होत आहे. येथील पाण्याचा प्रश्न आयुक्तानी सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सैलानी नगर,वानखडे नगरातील रहिवाशांनी केली आहे. पहिले अमृत योजना एक पूर्ण करावी नंतर अमृत योजना दोन सुरू करावी असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
===========================
खोटे उत्पन्नाचे दाखले सादर करुन सन 2018 पासून प्राधान्य गटाचे धान्य उचलून शासनाची लाखो रुपयांची फसवणुक
मुरलीधर प्रल्हादराव सटाले यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईकरिता निवेदन सादर
अकोला - शासनातर्फे समाजातील दुर्बल घटकांकरिता प्राधान्य गटाकरिता विशेष सवलतीच्या दरामध्ये धान्याचे वितरण करण्यात येत आहे. परंतु तहसिल कार्यालयामधून एजंटच्या माध्यमातून खोटे उत्पन्नाचे दाखले मिळवून सन 2018 पासून प्राधान्य गटातील धान्य उचलून शासनाची लाखो रुपयांची फसवणुक केली जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर प्रल्हादराव सटाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्विस्त वृथ्त असे की हरिहर पेठ स्थित स्वस्त धान्य दुकानदार सुभाषचंद्र हिरालाल यांच्या स्वस्त धान्य दुकानामधून आर. सी. नंबर 272013384870 या क्रमांकावर सन 2018 पासून शाम रामभाऊ सुर्वे हे दि टेलीकॉम इंजिनिअरींग स्टॉफ क्रेडीट को-ऑप. सोसाय. मर्या अकोला येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असून त्यांचे मासिक उत्पन्न 30,000 व वार्षिक उत्पन्न 360000 असून त्यांच्या परिवारातील राशन कार्डामध्ये चंदाताई सुर्वे यांचे वार्षिक उत्पन्न 1,80,000 व जसवंत सुर्वे हे पेशाने वकील असून त्यांचे सुद्धा वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे. असे परिवाराचे संपूर्ण एकत्रित उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त आहे. सदर परिवार हा सधन असतांना सुद्धा त्यांना प्राधान्य गटातील खऱ्या लाभार्थ्यांना डावलून या बोगस लाभार्थ्याला लाभ देवून शासनाची लाखो रुपयांची फसवणुक होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच याविषयी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे दि. 5/1/2022 व अन्न धान्य वितरण अधिकारी यांच्याकडे 7/1/2022 रोजी तक्रारीत म्हटले आहे. परंतु 3 महिन्यांपासून आजपर्यंत तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदर व्यक्तीवर नियमानुसार कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आला आहे.
===============================
दि अग्रेसेन नागरी सहकारी बँक बोरगाव मंजू स्थानांतर सोहळा थाटात!
अकोला दि अग्रसेन सहकारी बँक लिमिटेड अकोला शाखा बोरगाव मंजू येथील अग्रसेन बँक नविन इमारतीत मोठ्या उत्साहात थाटात नविन स्ववास्तु मध्ये स्थानांतर सोहळा सोमवारी सकाळी संपन्न झाला, प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार रणधीर भाऊ सावरकर हे होते तर अध्यक्षस्थानी विधान परिषद आमदार वसंतबाबु खंडेलवाल हे होते तर प्रमुख उपस्थिती बँक अध्यक्ष वसंत भाऊ बाछुका, उपाध्यक्ष तथा भाजपा अकोला महानगराध्यक्ष विजयजी अग्रवाल, जनरल मॅनेजर आशिष गोयंका, ठाणेदार सुनील सोळंके, शशिकांत खेतान, सरपंच सुनील खेळकर, माजी सरपंच मुरलीधर भटकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वानखडे डॉ केशवराव काळे, राजेंद्र पोतदार,आदी उपस्थित होते प्रसंगी अग्रसेन बँक अध्यक्ष वसंत भाऊ बाछुका यांनी बोरगाव मंजू बँक शाखेचा गत चार वर्षापासून खातेदार शेतकऱ्यांचे सुविधा व लाभ आदी बँक प्रगतीपथावर लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकातुन विषद केले,तर आमदार रणधीर सावरकर यांनी ग्रामिण भागातील सर्व सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या सोई उपलब्ध करून दिल्या बद्दल अग्रसेन बँकेच्या कार्याचे कौतुक केले,तर दि अग्रसेन बँक चे उपाध्यक्ष भाजपचे महानगराध्यक्ष विजयजी अग्रवाल यांनी आपले विचार व्यक्त करुन ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले, या वेळी बोरगाव मंजू बँक शाखेचे संचालक समितीचे अमोलजी अग्रवाल, ललित अजमेरा,सह शाखाधिकारी किशोर जाधव सह सचिन अग्रवाल, संजय तायडे गुरुजी, अशोक विल्हेकर, पंकज वाडेवाले,बाळु भटकर,प्रमोद अघडते, नितीन अग्रवाल, विनोद शेगोकार,छोटु देशमुख, सचिन नागरे, उमेश जयस्वाल, प्रकाश भवाने, संजय देशमुख, आधी कार्यक्रमाला उपस्थित होते
=============================
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून मोटरसायकल बजाज पलसर गाडी चोरीच्या संशयीतास अटक ...
अकोला दि.16 रोजी गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करीत असतांना खात्रीलायक खबर मिळाली कि डाबकी रोड भगत वाडी गल्ली. नंमबर .9 येथे राहणार नूर खान याच्या कडे चोरीची गाडी आहे... अश्या खात्रीलायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून त्याला ताब्यात घेऊन संबंधित गाडी बद्दल विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्यामुळे त्याच्या ताब्यातिला गाडी जप्त करून त्याला त्याचे पूर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नूर खान नासिर खान वय 24 रा. भगत वाडी ग. नं.9 अकोला असे सांगितले त्याचे ताब्यातून विना नंबर ची बजाज पल्सर गाड़ी मोटरसायकल जिचा चेचीस नंबर MDZA11CX1LCF023356 बजाज पल्सर दुचाकी गाडी 90,000 रु. चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले . त्याचे हे कृत्य कलम Crpc 41,1,4, जा. फौ.प्रमाणे होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन डाबकी रोड अकोला येथे कार्यवाही करण्यात आली आहे...
सदरची कारवाई मा. पो अधीक्षक सा. जी. श्रीधर सा.,अपर पो. अधीक्षक एम.राऊत मॅडम,यांच्या मार्गदर्शन खाली पो. नि. विलास पाटील सा.आणि विशेष पथकने केली..
============================
सिद्धार्थ चौक भिम नगर येथे गौतम बुद्ध जयंती साजरी
अकोला - स्थानिक सिद्धार्थ चौक भिम नगर, जुने शहर येथे भाऊ सिद्धार्थ सिरसाट यांचे अध्यक्षतेखाली भगवान गौतमबुद्ध यांना सामुहिक बुद्ध वंदना घेऊन त्रिवार अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रविंद्र सिरसाट, अशोक वाघमारे, विलास सिरसाट, गणेश ठाकुर, प्रकाश सोनोने, गणेश ठाकुर, अण्णा कोंडाणे, कुलदिप काळपांडे, प्रकाश भगत, प्रभाकर सिरसाट, अनिल नावकार, रामा सदाशिव, सुधाकर वानखडे, संतोष श्रीवास्तव, मुन्ना श्रीवास्तव, बलदेव इंगळे, अंकुश शिरसाट आदींची उपस्थिती होती, असे शैलेंद्र वानखडे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
===============================
पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी
अकोला - दि. 16 मे 2022 रोजी स्थानिक अशोक वाटीका येथे पिपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे भगवान गौतम बुद्ध यांना सामुहीक बुद्ध वंदना घेऊन त्रिवार अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे विदर्भ उपाध्यक्ष डी. एम. हाताळकर, जिल्हाध्यक्ष महादेवराव शिरसाट, जिल्हा संघटक आबा शिरसाट, जिल्हा महासचिव संजय मनवर, कुलदीप काळपांडे, देवेंद्र सिरसाट, अभयसिंह पांडे, सुधाकर वानखडे बेबीताई राठोड, गजानन जाधव, विकास रोडे, रतन अहीर, प्रकाश सोनोने, बलदेव इंगळे, अजय वाहुरवाघ, हिम्मत हिवराळे आदी उपस्थित होते. पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महानगर अध्यक्ष शैलेंद्र वानखडे यांनी कळविले.
================================
.jpeg)

