सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाल महत्त्वाचे निर्देश . ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्या
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाल महत्त्वाचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला काय हरकत आहे असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने जिल्हानिहाय त्याचा आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगावर हा निर्णय सोपवत असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगानं तातडीनं वॉर्ड रचनेची प्रक्रिया सुरु केली आहे. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची प्राथमिक प्रक्रिया आम्ही जूनपर्यंत पूर्ण करु. पण त्यानंतर लगेच पुढची प्रक्रिया ऐन पावसाळ्यात सुरु करावी लागेल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आमच्या अडचणींचा विचार करावा अशी आयोगाने सुप्रीम कोर्टाला विनंती केली.
सुप्रीम कोर्टाने आज राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न करत जिल्हानिहाय आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले.
पावसाळ्यात निवडणूक झाल्यास राज्यातल्या अनेक भागांत पूरस्थिती असते. राज्य कर्मचारी पूर नियंत्रणाच्या कामात व्यस्त असतात. या काळात सामानाची वाहतूक करणंही अवघड होऊन बसतं. शिवाय पावसाळ्यात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती आहे. आयोगाकडे असलेल्या ईव्हीएमची संख्या मर्यादित आहे.
राज्यात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900 ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. इतक्या सगळ्या निवडणुका एकत्र घ्यायच्या झाल्यास त्या किमान 2 ते 3 टप्प्यांत घ्याव्या लागतील आणि 6 आठवडे चालतील.
असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे,
================================
पोटाच्या मुलांनी लावले वडिलांच्या हक्काच्यापोटाच्या मुलांनी लावले वडिलांच्या हक्काच्या घराला कुलूप
ज्येष्ठ नागरिकांसाठी न्याय आहे का ? सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव
अकोला -आई आपल्या बाळाला आपल्या पोटात नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वागवते बाळाचा जन्म झाल्याबरोबर आई वडील हे आपल्या घरात आपल्याला सहारा देणारा आला या आनंदाने आई-वडील भारावून जातात वडील रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवितात आपले मुले ही आपल्या पायावर उभी राहावी एक आई वडिलांचे स्वप्न असते मात्र हेच मुले आई-वडिलांना त्रास द्यायला मागे पुढे पाहत नाही असाच एक प्रकार अकोल्यातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीराम धरमसिंग जाधव यांच्यासोबत घडला आहे, वडिलांनी रात्र दिवस एक करत आपल्या स्वप्नातील घर बांधले आज त्याच घरावर त्यांच्या मोठ्या व मधल्या मुलांनी ताबा घेतला आहे हाच प्रकार पाहून श्रीराम जाधव यांच्या पत्नीला हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले श्रीराम जाधव यांना सहारा देणारा सहारा निघून गेला एवढा प्रकार झाल्यानंतरही त्यांचा मोठा मुलगा व मधला मुलगा यांनी त्यांच्या वडिलांचे सहमालकीचे घर असल्यावरही त्यांना त्यांच्या रूम मधून मारहाण करीत बाहेर काढले व त्यांच्या घराला लॉक लावले याविषयी त्यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती मात्र ज्येष्ठ नागरिकांना उपविभागीय अधिकारी न्याय देऊ शकत नाहीत तर हे अधिकारी काय कामाचे? याविषयी श्रीराम जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना पूर्व सूचना १० मे ला दिली होती मात्र आजपर्यंत कुठलाही अधिकारी मला न्याय देण्यासाठी आला नाही असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना त्यांचे अश्रू अनावर होत त्यांनी त्यांच्या व्यथा व्यक्त केल्या वारंवार तक्रारी करून सुद्धा मला न्याय न मिळाल्याने आज पत्रकार समोर त्यांच्या हक्काचे व घामाचे असलेल्या त्यांच्या खोलीला जोर जबरीने लावलेले कुलूप त्यांनी आज ज्येष्ठ नागरिक श्रीराम जाधव यांनी लावलेले कुलूप तोडून टाकले जर ज्येष्ठ नागरिकांना अधिकारी यांच्याकडून न्याय जर मिळत नसेल तर ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या हक्कासाठी स्वतः समोर याची वेळ आज या अधिकाऱ्यांनी आणली आहे,
पत्रकार परिषद मध्ये श्रीराम जाधव यांनी दुःख व्यक्त केले ते पुढे म्हणाले मी सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीराम धरमसिंग जाधव मी स्वमिळकतीतुन बँकेच्या लोवर माझे कुटुंब सुखी राहावं म्हणून वारकर ले-आऊट, शालिनी यपिंग सेंटर समोर, मोबाईल टॉवर जवळ, आदर्श कॉलोनी येथे घर बांधले होत, मला तीन मुले आणि एक मुलगी आहे. आणि माझी दोन्ही मोठी मुले विनोद जाधव आणि राजेश जाधव गेल्या अनेक वर्षापासून आमच्यापासून वेगळी राहतात, विशेष म्हणजे विनोद आणि राजेश हे महाराष्ट्र पोलीस मध्ये नोकरीला आहेत त्यामध्ये मोठा मुलगा विनोद याने नुकतीच पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाला आहे, परंतु माझे दोन मोठे मूले हिस्से वाटसाठी मला व माझ्या पत्नीला त्रास देत होते. त्यांच्याकडून आम्हाला अनेकवेळा मारहाण झाली. अखेर त्यांच्या त्रासून 2018 मध्ये आम्ही दोघांनी जेष्ठ नागरिक कायद्यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यावर सुनावण्याही झाल्या तारखेवर तारीख केल्यावरही, 2018 मधील निर्णय अजून मिळाला नाही. दोन्ही मुलाच्या याच त्रासापाई माझ्या पत्नीचे हृदय विकाराच्या झटक्याने एक जुलै 2021 ला निधन झाले. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये माझा मधला मुलगा राजेश जाधव अचानक घरी आला आणि मला हिस्से वाटणी करून द्या अस म्हणत त्याने माझ्या घरातील माझ्या खोलीला जबरीने कुलूप लावले. त्यावेळी परत अकोला जिल्हाधिकारी यांना जेष्ठ नागरिक कायद्यानुसार न्याय मिळावा म्हणून अर्ज सादर केला. त्यावरही सुनावण्या झाल्या आणि जिल्हाधिकारी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तीन महिने उलटले तरीही कुठलीच कारवाई झाली नाही. माझ्या खोलीमध्ये माझे काही कपडे आणि सामान अडकून आहे. काही पैसे सुद्धा आहेत. या • खोलीमध्ये सर्व सामान माझेच आहे. मोठा मुलगा विनोद जाधव आणि राजेश जाधव अनेक वर्षांपासून ते त्यांच्या स्वतःच्या घरात वेगळा राहत असल्याने त्याच कोणतंच सामान माझ्या घरात नाही. गेल्या सहा महिन्यापासून न्यायासाठी मी भांडतो आहे. पण कुठलाही अधिकारी आला नाही आणि कुठलीच कारवाई झालेली नाही. या त्रासापासून आज मी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार बांधवांसमक्ष माझ्या हक्काच्या व घामाच्या खोलीला जोरजबरीने लावलेले कुलूप मी तोडत आहे. या संदर्भात मी जिल्हाधिकारी यांना अर्ज सादर करून पूर्व सूचना १० मे ला दिलेली आहे. आता पर्यंत भी कुलूप उपडून देण्याची शासनाची वाट पाहिली मात्र, शासन या संदर्भात सक्षम नसल्यानं
दिसून येत असल्याने, मी स्वतः माझ्या खोलीचं कुलूप तोडत आहे. आज रोजी माझ्या व माझा लहान मुलगा कुंदन जाधव व त्याच्या कुटुंबाचे जीवाचे कमी जास्त झाल्यास माझे मुले विनोद जाधव राजेश जाधव यांना जबाबदार धरण्यात यावे तसेच माझ्या दोन्ही मुलांचा माझ्या घरावर कोणताच अधिकार नाही, त्यांना मी वेळोवेळी विनोद जाधव राजेश जाधव यांना पैस्याची मदत केलेली आहे. त्या विचित्र सभामुळे त्यांच्या पहिल्या पत्नी त्यांना सोडून गेल्या होत्या त्यानंतर त्यानंतरही दोघांची दोन दोन लग्न लावून दिले होते, त्याचा खर्च सुद्धा मीच केला आहे. त्याची अनेक उलटी सुलटी प्रकरणी निस्तरण्यासाठी सुद्धा मला त्यांना पैसा द्यावा लागला. त्यामुळे आता त्यांचा माझ्यावर आणि माझ्या घरावर कोणताच अधिकार नाही. म्हणून मी माझे राहते घर माझा लहान मुलगा कुंदन जाधव याला देत असल्याचा खुलासा श्रीराम जाधव या पत्रकार परिषदमध्ये केला आहे. कारण कुंदन जाधव हा आजच्या स्थितीमध्ये प्रायव्हेट नोकरीमध्ये आपला प्रपंच चालवत आहे व तो माझी चांगल्या प्रकारे देखरेख सुद्धा करत आहे , असे श्रीराम जाधव यांनी पत्रकार परिषद मध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.
===============================
भूमीहीन शेतकऱ्यांना ई-क्लासची शेती कसण्याची परवानगी द्या; अन्यथा मुलाबाळासहीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू
बहुजन समाज पार्टी अकोलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अकोला - अकोला जिल्ह्यातील ई क्लास शेती करण्यासाठी गेल्या 25 ते 35 वर्षांपासून जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये, त्या गावातील भुमीहीन रहिवाश्यांनी नागरीकांना गायरान पडीक असलेली जागा मोठ्या कष्टाने मेहनतीने शेतीसाठी कसून ती तयार केलेली असून त्या जमिनीच्या माध्यमातून त्या कष्टकऱ्यांच्या परिवाराचा पालन पोषणाचा प्रश्न निकाली निघत आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने यावर्षी गायरानातील पडीक जमिनीवर शेती करु नये, तेथे झाडे लावण्यात येतील असे फलक लावलेले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. हा राजकीय डाव म्हणून त्याला उत्तर देणे योग्य नाही. म्हणून पक्षाने आपल्या शेतकरी बांधवांना साथ देवून शासनास बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की, भूमीहीनांना गायरानातील पडीक जमीन आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाकरिता करु द्यावी.
शासनाने जर येत्या 10 दिवसात शेतकरी बांधवांना पेरणी करण्यासाठी नव्याने आदेश देवून त्यांचे गावगुंडांपासून त्यांचे व त्यांच्या परिवाराचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांवर कोणत्याही प्रकारे अन्याय सहन केला जाणार नाही, अशी विनंती वजा इशारा बहुजन समाज पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष रमेश इंगळे यांनी दिला आहे.
निवेदन देण्याकरिता बहुजन समाज पार्टीचे सचिव विजय येलकर, जिल्हा प्रभारी डॉ. धनंजय नालट, जिल्ह्याचे विधी सल्लागार व बार असोसिएशन अकोलाचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत वानखडे, अॅड. अहमद बेनीवाले, अॅड. असद खान, बरकतभाई अली, प्रविण गोपनारायण, सचिव विरेंद्र शिरसाट, वासुदेव सराटे, सुरेश सावळे, आनंद तायडे, सुर्यभान तायडे, रामराव तायडे, कमलाबाई इंगळे, अन्नपूर्णाबाई ननीर, बेबी तेलगोटे, रामभाऊ तायडे, भिमराव तायडे, प्रेमदास डोंगरे, शरद खांडेकर,राहुल जामनिक, अजाबराव किर्तक, एकनाथ बाभुळकर, सुदाम सहारे, मारोती देवघडे, धोंडूजी बोंद्रे, अशोक मेश्राम, आत्माराम कांबळष, हरिदास मानकर आदींसह जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने यावर लक्ष दिले नाही तर पुढील काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शेतकरी आपल्या मुलाबाळासहीत भव्य मोर्चा काढू असा इशारा जिल्हाध्यक्ष रमेश इंगळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
=============================
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त निघालेल्या बाईक रॅलीचे उत्साहात स्वागत !
अकोला - स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त छावा संघटनेच्या वतीने अकोला शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळेस शिवसेना वसाहत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना प्रभाग प्रमुख गणेश पोलाखडे व संजय शहारे, संतोष चाटी, गणेश मानकर, सुधामजी भगत, सागर पोलाखडे, गणेश ठाकूर, अनील चिंदे, सचीन अनासने यांनी जयंतीनिमित्त संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन अभिवादन केले व छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग नोंदविला होता.
=============================
वाहनाचे सायलेन्सर बिनापरवांगीने बदलवुन फटाके फोडणा-या बुलेट वाहनावर शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी RTO मार्फत केली कायदेशीर कार्यवाही
अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणा-या भागात काही खोडकर वाहन चालकांनी मुख्यतः बुलेट वाहनात विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसवुन फटाके फोडण्याचे प्रकार अकोला शहरात वाढले आहे. ज्यामुळे अशा वाहनाव्दारे रस्त्यावर चालनारे वाहन चालक तसेच महीलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक तक्रारी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी आज दि 17/05/2022 रोजी सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विषेश मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन 19 वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी RTO यांना हस्तांतरित केले. RTO मार्फत कमित कमी 9000 ते 18000/- एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकरण्यात येत असल्याचे समजले आहे. त्यामुळे बुलेट चलकांनी यापुढे सतर्क राहवे कंपनी कडून मिळालेले अधिकृत सायलेंसरचाच वापर करावा किव्वा मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड भरन्यास तयार राहवे.
सायलेन्सरव्दारे फ फोडणारे बुलेट वाहन तसेच इतर वाहने ज्यामध्ये कर्णकरकश आवाज करणारे अवैध साहीत्य लावुन शहरातील नागरिकांना त्रास देणा-या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करणेकरीता सदरची मोहीम अकोला शहरात सतत राबविण्यात येणार आहे.
करीता अकोला शहरातील सर्व वाहन चालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकश आवाज करणारे हाॅर्न लावण्यात आलेले आहे अशा वाहन चालकांना पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन आवाहन करण्यात येते की अशा वाहनांचे सायलेन्सर व हाॅर्न शासन नियमांनुसारच लावावे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल.
===============================


