लोकप्रतिनिधी गेले कुठे? पिण्याच्या पाण्यासाठी गुडधीवासी गेल्या ३ वर्षापासून तहानलेलेच ?

 लोकप्रतिनिधी गेले कुठे? पिण्याच्या पाण्यासाठी गुडधीवासी गेल्या  ३ वर्षापासून तहानलेलेच ?

अकोला - अकोला महानगरपालिकेतील महान येथील जलशुद्धीकरणावरून अकोल्या शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र हद्दवाडी क्षेत्रातील गुडधीवासई गेल्या तीन वर्षापासून तहानलेले आहेत, मागील कित्येक दिवसापासून गुडधी करांनी कित्येक मोर्चे मनपा मध्ये आणले तेव्हा हे लोकप्रतिनिधी गेले होते कुठे? असा प्रश्न गुडधी वासी करीत आहे , म्हणे लोकप्रतिनिच्या दणक्याने यंत्रणा झाली जागी असा गाजा वाजा करण्यात येत आहे ,लोकप्रतिनिधींन वर मागील पाच वर्षांपूर्वी विश्वास ठेवून एका हाती सत्ता दिली मात्र या मागील सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेची तहान सुद्धा भागू शकले नाहीत, कित्येक दिवसापासनं अकोल्या शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे, केंद्र शासनाने अमृत योजनेसाठी ११० कोटी मंजूर केले आहेत त्यातून 93 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला आहे, याच अमृत योजनेचा गाजावाजा करीत ही अमृत योजना 100% पूर्ण झाल्याचे बतावणी करून अमृत योजना दोन च्या मागे लागले आहेत, मात्र अमृत योजना १ अपुरी असून शहरांमध्ये फक्त मुख्य रस्त्यावरती अमृत योजनेचे पाईप गेले आहेत तर काही मुख्य रस्त्यावर ही पाईपलाईन पोचलीच नाही त्यामध्ये गल्ली गोड्या अमृत योजनेचा पाईप सुद्धा पहावयास मिळाला नाही काही ठिकाणी अमृत योजनेचे पाईप हे तीन मीटर आत मध्ये असायला हवी हेच  पाईप दोन ते तीन फुटावर टाकल्या गेले आहेत, मनपा आयुक्तांनी याची प्रत्यक्ष खुदाई करून पहिल्यास अमृत योजनेचे पितळ नक्कीच उघडे पडेल 

बऱ्याच ठिकाणी मोठ्या पाईपलाईन लिकेज होत आहेत याचे कारण काय? एखाद्या ठिकाणी पाईपलाईन फोडायची असल्यास एखादा वाल बंद करून ती पाईपलाईन कशा पद्धतीने फोडायची आणि ठेकेदाराला कशा पद्धतीने त्याचे बिल द्यायचे हे जलप्रदाय विभागाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, 

अद्यापही अकोल्या शहराला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे सामान्य लोकांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे, शहराला रोज पाणीपुरवठा आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आणि मागील सत्ताधारी  गेले कुठे ?

त्यात काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता मनपा आयुक्त प्रयत्न करीत आहे मात्र लोकप्रतिनिधी व सत्ताधारी सुद्धा श्रेय घेण्याच्या मागे आहेत, महानगरपालिकेने शहराला दोन दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते, मात्र ते नियोजन कोळंबलेले दिसत आहे, अकोला पूर्व मध्ये दोन दिवसात पाणीपुरवठा दिला जात होता मागील सात दिवसापासून हा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्यात आला कारण जुन्या शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता मात्र आता जुन्या शहर , अकोट फाईल, नायगाव, भागाला दोन दिवस पाणीपुरवठा तर सोडा दहा दहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याचे  दिसून येत आहे,

हद्दवाळ क्षेत्रातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, आमची अमृत योजना गेली कुठे? आम्ही नागरिक मनपा क्षेत्रा राहत नाहीत का? आम्ही नागरिक टॅक्स भरत नाहीत का? मुंबई नागपूर सारख्या शहरात एवढे टॅक्स नाहीत तेवढे टॅक्स अकोला महानगरपालिकेला आहेत ?आमचे गावे का मनपा क्षेत्रात घेतल्या गेली? मग आम्ही विकासा पासून कोसो दूर का ? असे अनेक प्रश्न हद्द वाढ क्षेत्रातील नागरिक करीतआहेत, लोकप्रतिनिधी व मागील सत्ताधारी मोठा गाजा वाजा करीत म्हणत आहेत की आता महानगरपालिके क्षेत्रात नेहमीच पाणीपुरवठा सुरळीत सुरळीत आहे कुठे तो लोकप्रतिनि दाखवावा असे हद्दवाड क्षेत्रातील नागरिक लोकप्रतिनिधींना मागील सत्याधरांना प्रश्न विचारत आहेत,

खोटे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवल्या जाईल अशी चर्चा अकोला महानगरपालिकेच्या क्षेत्रात होत आहे

========================

थकित पाणीपट्टी कर धारकांवर मनपा जलप्रदाय विभागाव्‍दारे कारवाई.      

अकोला दि. 18 मे 2022  –   मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकित पाणीपट्टी कर आणि अवैध नळ जोडणी धारकांवर मनपा जलप्रदाय विभागाव्‍दारे नळ जोडणी खंडीत करण्‍याची मोहीम सुरू असून आज दि. 18 मे रोजी भारत विद्यालय जवळील अजिंक्‍य अपार्टमेंट येथील मालमत्‍ता धारकांकडे 2017 पासून रक्‍कम रूपये 50 हजार पाणी पट्टीकर प्रलंबीत असून तेथील 5 नळ जोडणी खंडीत करण्‍याची कारवाई करण्‍यात  आली आहे.

                   अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकित पाणी पट्टी धारकांना तसेच अवैध नळ जोडणी धारकांना मनपा जलप्रदाय विभागाव्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे कि, त्‍यांनी थकित पाणी पट्टी कर भरून तसेच अवैध असलेली नळ जोडणी वैध करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच थकित पाणी पट्टी देयकाबाबत कोणत्‍याही प्रकारची तक्रार असल्‍यास अकोला महानगरपालिकेच्‍या जलप्रदाय विभागाशी संपर्क साधून देयके दुरूस्‍त करून थकित पाणी पट्टी कराचा भरणा वेळेवर करून नळ जोडणी खंडीत करणे सारख्‍या  अप्रीय कार्यवाही टाळावी.  

          या कारवाईत मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच.जी.ताठे, कनिष्‍ठ अभियंता निवृतती दातकर, संजय पाटील, सुबोध वानखडे, अंकुश राठोड आदिंचा समावेश होता.

==========================

ओबीसी आरक्षणाबाबत ठाकरे सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव-भाजपा  

ओबीसी आरक्षण देणे मध्यप्रदेश सरकारला जमले मग ठाकरे सरकारला का नाही?

अकोलाठाकरे सरकारच्या नादान आणि नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण गेले. आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार कधीच गंभीर नव्हते. जर मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षण टिकते तर महाराष्ट्रातील का नाही ? असा घणाघाती सवाल जिल्हा भाजपाने    यांनी विचारला आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार इशारा देऊनही महाराष्ट्राचा इम्पिरिकल डेटा तयार झालेला नाही. दीड वर्षापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण देणे शक्य झाले असते.१३ डिसेंबर २०१९ रोजी सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट पूर्ण करा असा पहिला आदेश दिला होता. अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतरही सरकारला त्याबाबत गांभीर्य नाही. हे संपूर्णत: महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. मध्य प्रदेश सरकारने इम्पिरिकल डेटा दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. मध्य प्रदेशने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन केले. इम्पिरिकल डेटा, ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षाच्या नेत्यांना अडकवण्याच्या नादात, ओबीसीचा इंपेरिकल डेटा तयार केलाच नाही. आता ओबीसी आरक्षणासाठी व्यापक लढा द्यावा लागेल असा गंभीर इशारा   आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात सुमन ताई गावंडे गीतांजलि ताई शेगोकार रवी गावंडे महापौर अर्चनाताई मसने , जयंत मसने किशोर पाटील जयश्री फुंडकर, हरिनारायण माकोडे मोनाली गावंडे, दिला.

=========================

भाजपा अकोला महानगर येथे भटके विमुक्ती युवती आघाडी ची बैठक

 अकोला- भाजपा अकोला महानगर येथे  भाजपा कार्यालय ,अकोला येथे भटके विमुक्त युवती आघाडीची बैठक  मा. खासदार तथा माजी केंद्रीय राज्य मंत्री श्री. संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात तथा आ. श्री. गोवर्धनजी शर्मा, आ. श्री. रणधीरभाऊ सावरकर (जिल्हा अध्यक्ष), आ. श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, मा. श्री. विजयभाऊ अग्रवाल ( महानगर अध्यक्ष) सौ. अर्चनाताई मसने अॅड. सौ भाग्यश्रीताई ढाकणे (संयोजिका युवती प्रदेश ) व सौ. अश्विनीताई नागुलवार  ( अध्यक्ष विदर्भ युवती ) यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.  

अध्यक्षीय भाषणात अॅड. सौ भाग्यश्रीताई ढाकणे यांनी भटके विमुक्त युवतींनी एकत्र येऊन काम करावे तसेच समाजाच्या प्रगतिसाठी युवतींनी लहान लहान गाव तसेच एरिया पालक म्हणून स्वीकारावे आणि त्यांच्या लहान लहान कार्यात सहभागी व्हावे. तसेच सौ. अश्विनीताई नागुलवार यांनी आपल्या भाषणात अकोल्यात होत असलेल्या भटके विमुक्त जातीच्या प्रगति बाबत प्रशंसा केली आणि समाधान व्यक्त केले आणि अकोला महानगरातील आघाडीची प्रशंसा केली.    

या बैठकीत महानगरातील श्री. माधव मानकर, संजय गोटफोडे, गिरीश जोशी, अमोल गिते, सौ. सुमनताई गावंडे, सौ. वैशालीताई शेळके, सौ. चंदाताई शर्मा, सौ. वैशालीताई देवकते, सौ. चंदाताई ठाकुर, सौ. सारिकाताई जयस्वाल, सौ. आरतीताई घोगलिया, सौ.अनुराधाताई नावकर, सौ. रंजनाताई विंचंनकर, सौ. साधनाताई येवले, डॉ.संगीताताई सुरंजे, सौ. संगीता पाली, कु. खुशी पाली, सौ. मोहिनीताई मांडलेकर, कु. प्रियंका वाडेकर, सौ. अनीताताई चौधरी, सौ. शिंदेताई, राहुल इंगळे, दिलीप कनकर, राजेश चिलवंत, सदानंद जायभये, गजानन वाडेकर,  रोहित अव्वलवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने