शिक्षण समृद्धी पत सस्थेच्या घोटाळ्यात बडतर्फ ची कार्यवाही



 अकोला महापालिका शिक्षण समृद्धी सहकारी पत संस्थेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आँडीट आक्षेप नंतर आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी चौकशी गठित करून या आधी तीन कर्मचारी बडतर्फ केले होते.जसजशी चौकशीचा अहवाल सादर होत असुन यावेळी शिक्षण विभागाचे शिक्षक शरद टाले यांना तडकाफडकी बडतर्फ केल्याने मनपा परिसरात भयाण शांतता पसरलीआहे. यामध्ये आणखीन ही कार्यवाही होणार असल्याने  भ्रष्टाचार करणा-या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने  कर्ज न भरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खाते गोठविणार असल्याचे कळाले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दखल घेत वसुली अधिकार्याची नेमणूक केली असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान मुख्य आरोपी संस्थेच्या अध्यक्षा विरोधात लवकरच कार्यवाही होऊ शकते.६३ लाख ७२हजार  कर्ज घेणाऱ्या ६४ कर्मचा-यापैकी ९ कर्मचारी मृत्यू झाले असुन १३ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे.उर्वरित ४२ सदस्य रडारवर असुन यामध्ये आयुक्तांत कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा आणि विधी विभाग यातील एका कर्मचाऱ्याचा ही समावेश असल्याने याच्यावर ही कार्यवाही होते की टळते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.आयुक्ताच्या धडाकेबाज कार्यवाहीने जंपीगवाले आयुक्ताच्या बदली करण्यासाठी राजकीय तंत्राचा वापर करीत आहे. प्राप्त माहिती नुसार आयुक्तांची बदली  करिता मुंबईला सेटिंग झाल्याची चर्चा रंगत आहे. आजपर्यंत अशी धडाकेबाज कार्यवाही  एकाही आयुक्तांनी केली नाही हे विषेश.आता पुढील लक्ष कोण ? यावर मनपा वर्तुळात खमंग चर्चा रंगत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने