*अकोल्यातील व्यापारी गत तीन वर्षापासून पोलीसी दहशतीमध्ये?नवीन पोलीस अधीक्षक तरी व्यापाऱ्यांना न्याय देतील का ?*
राजकारण्यांची दुटप्पी भूमिका घातक!
सतिष देशमुख
सत्यलढा एक्सक्लुझीव
अकोला, दि. २१:
गत तीन वर्षापासून अकोला शहरातील व्यापारी आपले प्रतिष्ठाने सायंकाळी नऊ किंवा साडेनऊच्या दरम्यान धास्तिने बंद करतात. कारण स्थानिक व्यापारी पोलीसांच्या जाचक धाकाला घाबरत तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विषेश बाब अशी की, आज ज्येष्ठ पत्रकार संजय कमल अशोक यांच्या सोशल मीडियावर सर्वांना प्रतिक्रिया बघावयास मिळाल्या. ह्या जळजळीत वास्तव प्रतिक्रिया अशा आहेत. "पोलीस मार्केट असे बंद करित आहेत जसे दहा मिनिटात कोविडची संचारबंदी लागणार आहे. दादांनो तीन वर्षानंतरही व्यापाऱ्यांना व्यापार करू द्या? तसेच ते ऑनलाइन आणि इतर समस्यांनी मेले आहेत. अजूनही सुलतानी दाखवता का?" असे मत व्यक्त करताच सामान्य नागरिकांनी त्या पोस्टला म्हटले आहे की, दिवाळी असो किंवा दसरा असो अकोला शहरातील मार्केट साडेनऊ ते दहा च्या दरम्यान बंद केली जातात. मात्र इतर उत्सव असले तर मार्केट पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत सुरू राहतात मग ठराविक सणच पोलीसांचे टार्गेट का?
स्थानिक लोकप्रतिनिधी मत मागण्यासाठी पाया पडतात पण व्यापाऱ्यांसाठी समोर येण्यास तयार नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत या लोकप्रतिनिधींना सामान्य नागरिक व व्यापारी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असे चित्र निमार्ण झाले आहे.
मागील दोन-तीन वर्षापासून अगोदरच व्यापाऱ्यांचा व्यापार ठप्प झाला आहे तसेच सामान्य नागरिकांना करोनामुळे आपले व्यवसाय आणि आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. कसेतरी आपला उदरनिर्वाह करत असताना रात्री साडेनऊ ते दहा च्या दरम्यान पूर्ण अकोला शहरातील ठराविक व्यापार बंद का केल्या जातो ? या प्रश्नाचे उत्तर देत नवीन पोलीस अधीक्षक व्यापाऱ्यांना न्याय देतील का? याकडे सत्य लढासह सामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
"व्यापारी वर्गाने आमच्याकडे खुलेआम तक्रारी कराव्या जेणे करुन आपल्या समस्या सोडविण्यात आम्ही कटीबद्ध आहोत."
सतिष देशमुख
संपादक
सत्य लढा

