प्राण घातक झालेल्या हल्ल्यात उपशहर प्रमुख ‌ यांचा मृत्यू!

 जठारपेठ  चौकात शिवसेना उपशहर प्रमुख यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून प्राण घातक झालेल्या हल्ल्यात उपशहर प्रमुख ‌ यांचा मृत्यू!


अकोला रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जठारपेठ परिसरात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोला उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून रविवारी सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला होता .त्यांच्यावर आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. त्यांची प्रकृती गंभीर होती .मात्र काही तासानंतर विशाल कपले यांचा मृत्यू झाला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून. घटनास्थळी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा पोलीस उपाधीक्षक मोनिका राऊत . अकोला शहर पोलीस अधीक्षक सुभाष दुधगावकर तसेच रामदास पेठ पोलीस तसेच किशोर शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली . घटनास्थळी श्वास पथक ठपसे तज्ञघेत दाखल झाले असून नेमका हल्ला का केला व कोणी केला याचा शोध रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर शेळके व त्यांचे कर्मचारी करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने