अकोल्यात तब्बल 18 दिवसानंतर मान्सूनचे आगमन

 


अकोल्यात तब्बल 18 दिवसानंतर मान्सूनचे  आगमन झाले आहे. काल पासूनच अकोल्यात ढगाळ वातावरण होते. आज सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती. मात्र दुपारी पावसाचा जोर वाढला होता. पावसाचे आगमन झाल्याने उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला, तर मोठया विश्रांतीनंतर पाऊस बरसल्याने शेतकरी सुखावला आहे. पाऊस नसल्याने खोळंबलेल्या पेरण्या आता सुरू होतील. आणि बियाणे, खत विकत घेण्याची लागबगही सुरू होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने