अकोला शहरातील माऊली वसतिगृहात 18 वर्षीय युतीची आत्महत्या...

 अकोला शहरातील माऊली  वसतिगृहात 18 वर्षीय युतीची आत्महत्या...



अकोला शहरातील सिविल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर येथील माऊली  खासगी वसतिगृहात एका 18 वर्षीय दिव्यांग युतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर युतीने काळ सायंकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ह्या  दिव्यांग मुलीने आपल्या वसतिगृहाच्या रूममध्ये आपल्या ओढणीने दरवाजाच्या कुंडीला आपली ओढणी बांधून आत्महत्या केली. हा प्रकार रात्री दहाच्या सुमारास लक्षात येताच. मुलीच्या आत्महत्येची माहिती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला देण्यात आली. मुलीने रूमचा दरवाजा आत मधून बंद करून आत्महत्या केल्यामुळे पोलिसांना दोन पंचासमक्ष खिडकीची ग्रील तोडून आत मध्ये प्रवेश करावा लागला. ही मुलगी पुणा येथे शिक्षण घेत होती. मुलीचे मुळगाव मुक्ताईनगर हे असून ही पुढील शिक्षणाकरिता अकोला येथे आली होती. ह्या मुलीने आत्महत्या का केली याचा तपास सिविल लाईन पोलीस करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने