अकोला महापालिकेच्या लेखा विभागाच्या जी पीएफ देयक विभागाला आज सकाळी आग 

 अकोला महापालिकेच्या लेखा विभागाच्या जी पीएफ देयक विभागाला आज सकाळी आग लागली.

 या आगीत विभागातील एक संगणकाचे मॉनिटर, विभागातील वायरिंग आणि कुलरची वायरिंग जळून खाक झाले. सुदैवाने हजर असलेल्या कर्मचाऱ्याने फायर इन्स्टिनशनने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टाळला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं बोललं जातं आहे. देयक विभागातील भिंतीला गळती लागल्याने काल पासून सुरू असलेल्या पावसाचं पाणी भिंतीमधून गळते, आणि हेच पाणी विद्युत मिटरला स्पर्श करते, त्यामुळे हे शॉर्टसर्किट झालं असावं असा अंदाज आहे. महापालिकेने उन्हाळ्यात वेळीच इमारतीची डागडुजी केली असती तर अश्या प्रकारे गळती लागली नसती, मात्र वेळेवर काम करेल ती महापालिका थोडीच... कर्मचाऱ्यांच्या सातर्कतेने आग आटोक्यात आली. नाहीतर संपूर्ण विभागात आग लागून सामान्य नागरिकांचे महत्वाचे दस्तावेज जळून खाक झाले असते. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने