पातूर घाटात लक्झरी बस चा अपघात!
बस मध्ये प्रवासी संख्या कमी असल्याने मोठीं जिवीत हानी टळली
पातूर घाटातील घटना आज दुपारी 12 वाजता घडली ही बस मालेगाव कडून पातुर कडे येत होती या बस चा mp 13 P7299 क्रमांक असलेली लक्झरी बस पातुर कडे येत असताना जोरदार रोड डिवायडर ला धडक दिली बस जागेवर पटली झाली या गाडी मंध्ये सुदैवाने प्रवासी संख्या कमी असल्याने मोठीं जिवीत हानी टळली या बस मध्ये एकाच गावातील सात ते आठ प्रवासी नागरिक माळराजूरा फाटा येथून बसले होते त्या पैकी पाच प्रवासी नागरिक गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती 108 रुग्णवाहिकेचा चालक सचिन बारोकार यांना मिळताच त्यांनी पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांना माहिती दिली व तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या वेळी या बस मधील जखमी झालेले प्रवासी अक्षय नांदेडकर, अनिल पोहूरकार, अर्जुन कांबळे, जगन्नाथ तेलगोटे, नारायण शिंदे यांना 108 रुग्णवाहिकेने अकोला जिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले तर यावेळी पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी ट्राफिक कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी रोडच्या मध्यभागी पडलेल्या बसला हटवून इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला यादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल भारस्कर यांनी पंचनामा केला व पुढील तपास पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

.jpeg)