*अवैध रित्या प्रतिबंधित गुटखा महिंद्रा बोलेरो मधून वाहतूक करणाऱ्या इसमावर छापा 4 लाख रूपयांचा राजनिवास गुटखा व 8 लाख रूपयांची गाड़ी असा 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त, विशेष पथकाची कार्यवाही**
अकोला- दि, 13 रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर याच्या विशेष पथकास खात्रिशिर खबर वरूण जुनेशहर गंगानगर बिलाल मस्जिद जवळ नाकाबन्दीकरून मालवाहू महिंद्रा बोलेरो गाड़ी क्र न MH28 BB 2782 हिची पंचासमक्ष झड़ती घेतली असता सदर गाडीमध्ये वरतून कपडयांचे गट्टे बाँधूँन त्याखाली प्रतिबंधित गुटखा राजनिवास आणि राजनिवास पानमसाला चे 15 कट्टे असा 4 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व महिन्द्र पिकअप कीमत 8 लाख रुपये असा 12,00,000 रूपयांचा प्रतिबंधित गुटखा आरोपी व चालक शेख आजिज शेख रफ़ीक़ रा सैलानी जिल्हा बुलडाणा याच्या ताब्यातुन् जप्त करण्यात आला व आरोपी विरुद्ध पो स्टे जुनेशहर येथे गुन्हा नोंदविंनेत आलेला आहे,
सदर कार्यवाही मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील, पो हवा तुरकर , अविनाश पाचपोर ,यानी केली,
______________________________________________
*स्थानिक गुन्हे शाखेकडुन अवैधरित्या देशी दारू विक्रीकरीता वाहतुक करणा-या इसमाविरुध्द कार्यवाही*
अकोला - दि१३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोट हद्दीत अवैध धंदे छापा कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, पो स्टे अकोट ग्रामीण हद्दीत अकोली जहाँगीर येथुन अकोलखेड मार्गे मोहाडा कडे गणेश काकड हा इसम दुचाकीने अवैधरित्या विनापरवाना देशी दारू विकी करीता वाहतुक करणार आहे वरुन पोनि. संतोष महल्ले, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि हटवार यांचे पथकाने नाकाबंदी करून गणेश समाधान काकड, वय २१, रा. बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला याचे ताब्यातुन ०६ पेटी देशी दारु, किं. १८,०००/- रु आणि एक दुचाकी वाहन किं. अं. ६०,०००/-रु असा एकुण ७८,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करून इसमाविरुद्ध पो. स्टे. अकोट ग्रामीण येथे दारुबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर सा., अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम, सहायक पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष महल्ले, पोउपनि. सागर हटवार, पोहवा सदाशिव सुळकर, पोकों मोहम्मद रफी यांचे पथकाने केली.
______________________________________________
*जुने शहर, अकोला येथील धोकादायक व्यक्ती एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये*
*एक वर्षाकरीता स्थानबध्द*
अकोला - मारोती नगर, बाळापुर नाका, जुने शहर, अकोला येथे राहणारा धोकादायक व्यक्ती शुभम विनायक नागलकर, वय २२ वर्षे, याचे वर यापूर्वी दुखापत करणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगा करणे, गैरकायद्याची मंडळ जमा करणे, महीलांना छेडखाणी, बाललैंगिक अत्याचार करणे, जबरी चोरी, अश्लिल शिवीगाळ करणे, जिवेमारण्याची धमकी देणे असे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता, तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन धोकादायक व्यक्ती शुभम विनायक नागलकर, याचे कुत्यास आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. १३/१२/२०२१ रोजी पारीत केला. मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून शुभम विनायक नागलकर
याचा तात्काळ शोध घेवून त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक १३/१२/२०२१ रोजी
जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ. मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. जुने शहर येथील पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे तसेच पो.स्टे. मधील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावति असुन माहे जुलै २०२० ते सन २०२१ चे आज पावेतो हयाकालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकुण ४९ गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगारांवर लवकरच एम.पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.