*अकोला बुलढाणा वाशिम विधान परिषद मतदार संघात शिवसेना महा विकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव करीत भाजपचे वसंत खंडेलवाल विक्रमी मतांनी विजयी*

अकोला- दिनांक10 डिसेंबर रोजी पार पडलेल्या विधान परिषद चा निकाल आज सकाळी जाहीर झाला विधान परिषद मतदार संघात शिवसेना महा विकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव करीत भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन

बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली

यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला

बुलडाणा - वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व

भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. अकोला

बुलडाणा - वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत

महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.

शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या 18 वर्षापासून इथं भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला आहे. शिवसेना भाजप यांची युती असल्यानं भाजपला यापूर्वी निवडणूक लढवता आली नव्हती. 18 वर्षानंतर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.

विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले होते. तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांनी विधान परिषदेत दिमाखात प्रवेश केला आहे. नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा येथील पराभवामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.





https://youtube.com/channel/UCIg3tVTNuCmWzsK_rDDP_bg

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने