*अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षा सुचीसाठी अद्यावत कागदपत्रे सोमवारपर्यंत जमा करा*
अकोला, दि.12 अनुकंपा तत्वावर आरोग्य विभागात तांत्रिक पदे भरण्यात येणार आहे. याकरीता प्रतिक्षासुचीतील उमेदवारांचे शैक्षणिक पात्रतेची माहिती अद्यावत नसल्याने अनुकंपा उमेदवारांनी अद्यावत शैक्षणीक किंवा तांत्रिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या छायाप्रतिसह सोमवारी(दि.13) जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
अनुकंपा तत्वावरील गट क वर्गातील 132 पदे तर गट ड वर्गातील 79 पदाची यादी यापुर्वी प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता ही अर्ज केली त्यावेळची असल्याने शैक्षणिक पात्रता अद्यावत करणे आवश्यक आहे. अनुकंपाधारक लाभार्थ्यांनी अद्यावत शैक्षणिक किंवा तांत्रिक पात्रतेच्या कागदपत्रे लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता उपस्थित राहून सादर करावे. उपस्थित राहणे शक्य नसल्यास अशा उमेदवारांनी rdc_akola@rediffmail.com या ई-मेलवर सकाळी 11 वाजेपर्यंत पिडीएफ करुन सादर करावी.
_____________________________________________
*भारतीय स्वातंत्र्य ७५व्या दिनाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सायकल रॅलीचे आयोजन!*
*जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची मूळसंकल्पना!*
*भारताचे तीनही सेनेचे अमुख बिबीन रावत यांच्यासह भारत मातेच्या सुपुत्रांना श्रद्धांजली!*
अकोला २ :- देशाच्या स्वातंत्र्याला २०२१मध्ये ७५वर्षे पुर्ण झाले असून,स्वातंत्र्य होऊन७५वर्षे पूर्ण झाले,असल्याने स्वातंत्र्याचा अमृत उत्साहाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दल वाहतूक शाखेच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन, अकोला वाहूतुक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी केले होते. ही मूळ संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची होती.सायकल रॅलीच्या प्रयोजनार्थ देशाचे तीनही दलाचे प्रमुख बिबीन रावत यांच्यासह हवाई अपघातात शहिद झालेल्या भारत मातेच्या पुत्रांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अकोला पोलीस दलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबविण्याचा निश्चय केला होता. तशा प्रकारचे आदेश अकोला पोलीस विभागाला दिले होते.त्या अनुषंगाने अकोला वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी,१२डिसेंम्बर२०२१रोजी अकोला शहरातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांना सायकल रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या आव्हानावावरून शहरातील पत्रकार, डॉक्टर, व्यापारी, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वयंपूर्तीने १२डिसेंबर२०२१रोजी सकाळी सात वाजता हजेरी लावली.आणि अकोला पोलीस दलाच्या वतीने आयोजित केलेल्या सायकल रॅली मध्ये अकोला एन. सी.सी.चे १५०विद्यार्थी, यांच्यासह अकोला शहरातील प्रसिद्ध डॉ. अभय दादा पाटील,डॉ.प्ररभजीत बच्छेर,डॉ.अरविंद आगरकर, डॉ.जुगलकिशोर चिरानिया, डॉ. विशाल चिरानिया,सुनील चिरानिया,मीडिया क्षेत्रातील पत्रकार श्री विठ्ठल महल्ले, श्री सुनिल अवचार, श्रीमती धनश्री देशकर, श्रीमती श्वेता मेंढे, श्रीमती वर्षा ताई, श्री दिलीप तिवडकर, श्री चांडकजी डॉ, जुगलकिशोर चिरानिया, डॉ सुनील शर्मा, विशाल चिरानीया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विठ्ठल महल्ले यांनी केले तर,या कार्यक्रमाच्या यश्ववी करण्यासाठी अकोला वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. या सायकल रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व सायकल व पर्यावरण प्रेमीचे स्वागत प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ अभय पाटील आणि वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले. शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत दि १२/१२/२०२१ रोजी सकाळी ०७:०० वा. "सायकल मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर सायकल मॅरेथॉन शहर वाहतुक शाखा येथुन सुरू होऊन नेहरू पार्क चौक अशोक वाटीका सरकारी बगीचा कोतवाली चौक मानेक टॉकीज राजकमल चौक रेल्वे ओव्हर ब्रीज रेल्वे स्टेशन चौक- अग्रसेन चौक दुर्गा चौक सिव्हील लाईन चौक या मार्गाने येवून शहर - वाहतुक शाखा कार्यालय येथे समारोप झाला.
______________________________________________
*लोक अदालतीत 1 हजार 908 प्रकरणे निकाली: 11 कोटी 97 लाखांचा केला दंड वसूल*
अकोला, दि.12 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवारी(दि. 11) राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात सिव्हील व क्रिमिनलचे 33 हजार 351 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवण्यात आले. त्यापैकी 1 हजार 908 प्रकारणे निकाली काढण्यात आले असून 11 कोटी 97 लक्ष 71 हजार 829 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव स्वरुप बोस यांनी दिली.
लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालयात 11 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालय तसेच कामगार, सहकार, कौटूंबिक व औद्योगिक न्यायालयातील सिव्हील व क्रिमिनल प्रकरणे निकाली काढण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले. निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणामध्ये निगोशिएबल इन्सट्रुमेन्टस् ॲक्ट च्या कलम -138 खाली दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, विज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, बीएसएनएल व बँकाची खटालापूर्व प्रकरणे, कोविड कालावधीत झालेले प्रकरणे व इतर (फौजदारी तडजोडपात्र, वैवाहिक व इतर दिवाणी प्रकरणे) प्रकरणाचा समावेश आहे.
______________________________________________
*श्री दत्त जयंती व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात*
अकोला - स्थानिक डाबकी रोड स्थित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे श्री दत्त जयंती व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दि. 11 ते 19 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये सोमवार, दि. 13 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, गणेश याग,/मनोबोध याग, दि. 14 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, गिताई याग, दि. 15 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, चंडी याग, दि. 16 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, स्वामी याग, दि.17 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, रुद्र याग/ मल्हारी याग, दि. 18 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, बली पूर्णाहुती, दुपारी 12.39 वा. श्री दत्त जन्मोत्सव, दि. 19 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पुजन, देवता विसर्जन व दुपारी 12 ते 5 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष अनिलभाऊ गरड यांनी केले आहे.
______________________________________________
*स्थानिक गुन्हे शाखा अकोलाची कार्यवाही अंमली पदार्थ गांजा (कॅनाबिज) वजन ४ कि.१३० ग्राम मुद्देमालासह एक आरोपी गजाआड*
*एकुण किंमत ४१,३००-/ रू. चा मुददेमाल जप्त*
अकोला - दि. ११ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पथकास गुप्त बातमी मिळाली की, ग्राम शेकापुर येथे राहणारा इसम नामे रोहीदास लोकाराम चव्हाण हा मादक अंमली पदार्थ विक्री करतो व त्याने गावचे शिवारातील शेतामध्येही गांजाचे झाडाची लागवड केलेली आहे त्याची तो देखभाल करतो व गांजा विक्री करतो. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्या वरून सदर माहीती मा. पो. नि. संतोष महल्ले स्थानिक गुन्हे शाखा, अकोला तसेच मा. पोलीस अधिक्षक सा. अकोला यांना दिली, वरून सदर खात्रीलायक माहीती बाबत मा. पोलीस अधिक्षक, अकोला यांचेकडून रेड करण्याची परवानगी घेण्यात आली. सदर अंमली पदार्थ (गांजा) छापा कार्यवाही करीता आम्ही पोलीस स्टाफ व पंचांसह कायदेशिर छापा टाकुन आरोपीचे वहिवाटीतील शेताची पाहणी केली असता सदर शेतात गांजाची वेगवेगळया उंचीचे तीन सजीव गांजाची झाडे एकुण वजन ४ किलो १३० ग्राम एवढे भरले ज्याची बाजारभाव किंमत ४१, ३००/ रूपयाचा माल मिळुन आला. वरून सदर झाडे जप्त करून ताब्यात घेतले जप्त गांजाचे झाडाचे पान, कळी, फुले यांचे प्रत्येकी २५ ग्रॅम वजनाचे तीन सँपल पंचासमक्ष वेगळे काढुन ते पॅक करून व लाखेने सिलबंद करून सी. ए. तपासणी करीता काढण्यात आले आहे. हयातील नमुद आरोपीतास सजीव गांजाचे झाडासह ताब्यात घेवुन मुद्देमाल सिल बंद करून आरोपीविरुध पो.स्टे. पातुर येथे कलम २० (ब) एन. डि.पि. एस. कायदयान्वये गुन्हा दाखल केला असुन आरोपीतास मुददेमालासह पुढील तपास करीता पो.स्टे पातुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री जी श्रीधर, अपर पोलीस अधिक्षिका श्रीमती मोनिका राउत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्री संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे नेतृत्वात पोउपनि मुकुंद देशमुख, पोहवा. दत्तात्रय ढोरे, नापोकॉ. हसन शेख, विशाल मोरे, पो. कॉ. रवि पालीवाल, श्रीकांत पातोंड, संदिप टाले, व चालक मोहम्मद नफिस यांनी केली आहे.