*भारतीय स्वातंत्राची ७५ वर्षे अर्थात "आजादी का अमृत महोत्सव"*

 *भारतीय स्वातंत्राची ७५ वर्षे अर्थात "आजादी का अमृत महोत्सव"*



अकोला -भारतीय स्वातंत्राची ७५ वर्षे अर्थात "आजादी का अमृत महोत्सव" हा उपक्रम देशभरात •साजरा होत आहे. त्या अनुषंगाने अकोला पोलीस दला मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत दि १२/१२/२०२१ रोजी सकाळी ०७:०० वा. "सायकल मॅरेथॉन" स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.


सदर सायकल मॅरेथॉन शहर वाहतुक शाखा येथुन सुरू होऊन नेहरू पार्क चौक अशोक


वाटीका सरकारी बगीचा कोतवाली चौक मानेक टॉकीज राजकमल चौक रेल्वे ओव्हर ब्रीज रेल्वे


स्टेशन चौक- अग्रसेन चौक दुर्गा चौक सिव्हील लाईन चौक या मार्गाने येवुन शहर वाहतुक शाखा कार्यालय येथे संपणार आहे. "आजादी का अमृत महोत्सव" साजरा करण्या करीता शहरातील जास्तीत जास्त नागरीक, संस्थांनी सदर सायकल मॅरेथॉन रॅली मध्ये सहभाग घ्यावा असे श्री विलास पाटील, पोलीस निरीक्षक शहर चाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी आवाहन केले आहे. तरी सदर रॅली मध्ये सहभाग घेण्यास इच्छुक नागरीक, संस्था यांनी दि. ११/१२/२०२१ रोजी १८:०० वा पर्यंत शहर वाहतुक शाखा अकोला येथे संपर्क


साधुन नोंदणी करावी. असे आव्हान शहर वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



______________________________________________

*मोटार सायकली चोरी करणारा अटटल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाचे जाळयात*

 अकोला -जिल्हयातील चोरीच्या एकूण ०७ व मो.सा. एक सायकल सह मो. सा. चोरीचे सहा गुन्हे उघडकीस एकुण किंमत ०५,६०,०००/ रु. चा मुद्देमाल जप्त अकोला शहर 1 परिसरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्याने मा. पोलीस अधिक्षक श्री. जी. श्रीधर सा. व अपर पोलीस अधिक्षिका श्रीमती मोनिका राउत मॅडम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक श्री संतोष महल्ले व स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील अधिकारी व कर्मचारी यांना मोटार सायकल धोरीचे गुन्हे उघडकीस आनणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज दिनांक ११/१२/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पथकास मिळालेल्या गुप्त बातमीवरून रूपेश रामलाल शाहु वय ३० वर्षे रा. शिवसेना वसाहत जुनेशहर अकोला जि. अकोला यास मलोपुर चौक येथुन ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथे आणुन विश्वासात घेतुन विचारपुस केली असता त्याने आतापर्यंत एकुण ०७ मोटार सायकल हया अकोला, शहरातुन चोरी केल्याची कबुली दिली. वरून आरोपीकडुन एकुण ०७ मोटार सायकली किंमत अंदाजे ०५,६०,०००/- रु. जप्त करण्यात आल्या असून पुढीलप्रमाणे गुन्हे उघडकिस आणण्यात आले आहेत. १) पो.स्टे. सिव्हील लाईन अपराध कमांक ८६७ / २०२१ कलम ३७९ भा.दं.वि. २) अपराध कमांक ९१७/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. ३)पो.स्टे. खदान अपराध क्रमांक ८२१/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. ४) अपराध क्रमांक ११३० / २०२१ कलम ३७९ भा.दं.वि. ५) पो.स्टे. रामदासपेट अपराध कमांक ९७४/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. तसेच ६) पो.स्टे. सिटी कोतवाली अपराध क्रमांक २७/२०२१ कलम ३७९. भा.दं.वि. तसेच पो.स्टे. सिव्हील लाईन हवदीतील चोरीची एक बजाज पल्सर मो.सा. व एक सनकॉस सायकल अशा एकुण सात मोटार सायकली व एक सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.


सदर कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री जी श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राउत मॅडम पोलीस निरिक्षक श्री संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. महेश गावडे, पोहवा, प्रमोद डोईफोडे, पो. हवा नितिन ठाकरे नापोकों, शंकर डाबेराव, पो. कॉ. मनोज नागमते, मो. अमिर रोशन पटले, गणेश सोनोने, सतिश गुप्ता, सुशिल खंडारे, पो.स्टे. यांनी केली आहे.



_____________________________________________

*लोक अदालत मध्ये*

*मोवाफा अंतर्गत १६०२ केसेस* *निकाली काढुन एकुण ५५८५५०/- रुपये दंड वसुल करून शासन जमा* *करण्यात आला*,



राष्ट्रीय लोकअदालत कोर्ट ७वे सह दिवाणी न्यायाधिश कस्तर तथा न्यायदंडाधिकारी प्र.श्रे.अकोला येथे दि. 11/12/2021 रोजी आयोजीत करण्यात आली होती. शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला कडुन अकोला शहरातील वातुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांना मोटार वाहन कायदया अंतर्गत देण्यात आलेल्या अनपेड ई चालान चे एकुण १०५१२ केसेस ज्यांची प्रलंबीत रक्कम एकुण ८६३८०००/- रुपये होती अशा सर्व केसेस लोकअदालत मध्ये दाखल करून सर्व वाहन चालकांना लोकअदालत मध्ये हजर राहण्याबाबत शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत समंस वाटप करण्यात आले होते. त्यापैकी लोक अदालत मध्ये

मोवाफा अंतर्गत १६०२ केसेस निकाली काढुन एकुण ५५८५५०/- रुपये दंड वसुल करून शासन जमा करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने