मनपा आयुक्तांना ही जुमानत नाही महानगरपालिकेतील मुजोर अधिकारी*
अकोला - अकोला मनपातील कर विभागाचे काम संध्या रामभरोसे सुरू असुन रोज रोज नवीन कारनामे दक्षिण झोन कार्यालयात पाहण्यास मिळत आहे.विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहिती च्या आधारे दक्षिण भागातील राधे नगर स्थित वर्धमान अपार्टमेंट मधे घडल्याचा प्रकार एका मालमत्ता धारका सोबत घडला आहे. त्यांनी हस्तांतरण करण्यासाठी झोन कार्यालयात रितसर अर्ज करुन मालमत्ता नावाने करण्यासाठी प्रकरण दिले होते.परंतु भ्रष्ट अधिकारी यांच्या पैसे खाऊ व्रुत्ती मुळे त्यांना मालमत्तेच्या खरेदी वर १% टंक्का चार्ज भरावे लागतील आणि ते न भरण्याच्या ऐवज मध्ये तोंडाला पैशाचे रक्त लागलेल्या सहा. कर अधिक्षक आणि विभाग प्रमुख यांनी पैशाची मागणी केली होती तशी तक्रार मालमत्ता धारकाने केली असुन ती तक्रार दडपल्याची चर्चा होत आहे.हस्तांतरण अर्ज दि. १३/१०/२०१६ व दुसरा तक्रार दि. २४/११/२०२१ रोजी तक्रार देऊन ही आयुक्त कार्यवाही करीत नाही याबाबत सामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे यावरून मुजोरखोर कर्मचाऱ्यांमुळे आयुक्त चा वचक राहायला नाही असल्याचे चित्र मनपा मध्ये दिसत आहे.असाच प्रकार मागील महिन्यात उत्तर झोन चे क्षेत्रिय अधिकारी यांनी मनपाचे वाहन आपल्या खाजगी कामाकरिता बाहेर गावी नेऊन ही अंद्याप पर्यत कार्यवाही तर सोडा साधी शो काँज नोटीस ही न देणारी अकोला महापालिका ठरत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मनोबळ आणखीच वाढले आहे ,सन.२०१७ मध्ये नविन कर आकारणी झाली तेव्हा संत्ताधार्यानी पैशाच्या मोहापायी अव्वा च्या सव्वा कर आकारणी करून शहरातील नागरिकांना पळो की सळो अशी परिस्थिती निर्माण केली असून प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी जंपीगवाल्ये कर्मचारी करत आहेत हे यावरून सिध्द होते याआधी १% रक्कम खरेदी च्या रकमेवर हस्तांतरण करण्यासाठी लागत होती. तत्कालीन आयुक्त अजय लहाने साहेबांनी हस्तांतरण प्रकरणात जनरल सभेचा ठराव घेऊन फक्त ५००/- रुपयात हस्तांतरण प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले होते.हे विषेश. आधीच करवाढीने त्रस्त असलेल्या गरिब जनतेला पैशाची मागणी करणाऱ्यावर मुजोर अधिकार्यावर काय कार्यवाही होते कि यांनाही क्लिन चिट मिळते ?या बाबत कर्तव्यदक्ष आयुक्त कशाप्रकारे निर्णय घेतात असा प्रश्न शहरातील सर्व नागरिक करत आहे.
______________________________________________
*अकोला महानगरपालिका लुटून धुळे महानगरपालिकेला दान करण्याचा प्रकार*
*धुळे महानगरपालिकेचा कारभार चालतो अकोला*
*महानगरपालिकेतुन...........जगातील आठवे आश्चर्य म्हणजेअकोला महानगरपालिका*
अकोला-अकोला महापालिका कुबेर का खजाना असे म्हणणे योग्य होईल. रोज रोज नवीन कारनामे करण्यासाठी अकोला महानगरपालिका कारणामे करण्यास पटाईत आहे .असाच प्रकार मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयातुन पहावयास मिळत आहे. धूळे महापालिकेचे कर आकारणी चे कार्य (ब्लँक लिस्टमध्ये )असलेल्या स्थापत्य कन्सल्टन्सी प्रा.लि.च्या माध्यमातून होत असुन अकोला महापालिकेमधेही सन.२०१७ मध्ये याच कंपणीने अकोले करांना भरमसाठ कर आकारणी करुन शहरातील जनतेला भिकेला लावणारी कंपनीचे काम संध्या अकोला महापालिकेतुन चालत असल्याची माहिती मिळाली असुन याबाबत कर्तव्यदक्ष आयुक्तांना माहिती नसावी म्हणज आश्चर्यच? अकोल्यातील जनतेचे चार चार वर्षे काम न करणारी महापालिका शहरातील नागरिकांचे हस्तांतरण प्रकरणे, करण्यासाठी नागरिकांना चपला घासल्यावरही होत नाहीत आणि धूळे मनपाचे काम झोन कार्यालयात होत त्यामध्ये उपकरणासाठी वापरल्या जाणारी विद्युत मनपाची असल्याचे चित्र दिसत आहे. जगातील आठवे आचार्य म्हणण्यास काही हरकत नाही?अशा काळ्या यादितल्या स्थापत्य कंपणीवर कार्यवाही होणे गरजेचे आहे. प्रत्येक झोनवर धूळे मनपाचे काम कश्याप्रकारे चालत आहे तसा पुरावा आमच्या प्रतिनिधी च्या हाती लागला असुन या बातमी वरुन (ब्लॅक लिस्ट) कंपणीवर आयुक्त महोदयां काय निर्णय घेतात या कडे जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच मुजर खोर क्षेत्रीय अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार की त्यांना सुद्धा सोडून देणार का असा प्रश्नन सामान्य नागरिकांना पडला आहे.