*मतदानास शांततेत प्रारंभ;निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांनी मतदान केंद्राची केली पाहणी*
अकोला, दि.10 महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2021 ची मतदानास सकाळी आठ वाजेपासून शांततेत प्रारंभ झाला. निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज मतदान केंद्रावर भेट देवून पाहणी केली.
आज सकाळी डॉ. पांढरपट्टे यांनी अकोला तहसिलअंतर्गत असलेल्या बी. आर. हायस्कूल येथील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रावरील सोईसुविधा, सुरक्षा व मतदान प्रक्रियेची माहिती मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडून जाणून घेतल्या.
*आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन;*
*हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवा*
अकोला,दि.10 प्रत्येकाने आपल्या हक्का सोबत कर्तव्याची जाणीव ठेवावी. कर्तव्याच्या जाणीवा शिवाय हक्काचे पालन होवू शकत नाही, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवी हक्कदिन आज शुक्रवार (दि. 10) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजीत करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, मानवधिकार वृत्त मासिकाचे मुख्य संपादक विजय कुमार गडलिंगे, बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष ॲड. अनूप देशमुख, ॲड. प्रविण तायडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, नितीन निंबुळकर, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकांना मानवी हक्काची जाणीव असणे गरजेचे आहे. आपल्यावर झालेल्या अन्याय विरुद्ध मानवी हक्क आयोगाकडे दाद मागावी. याकरीता शासनस्तरावर यत्रंणा कार्यरत आहे. मानवी हक्काचे माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याकरीता असे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
यावेळी विजय कुमार गडलिंगे व ॲड. राजेश जाधव यांनी मानवी हक्काचे महत्व व अधिकाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी अधिकारी संदिप ककांळे तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार गुणवत्ता विकास कक्षाचे समन्वयक गजानन महल्ले यांनी केले.
____________________________________________
*आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन;*
*हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवा*
अकोला,दि.10 प्रत्येकाने आपल्या हक्का सोबत कर्तव्याची जाणीव ठेवावी. कर्तव्याच्या जाणीवा शिवाय हक्काचे पालन होवू शकत नाही, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवी हक्कदिन आज शुक्रवार (दि. 10) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजीत करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, मानवधिकार वृत्त मासिकाचे मुख्य संपादक विजय कुमार गडलिंगे, बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष ॲड. अनूप देशमुख, ॲड. प्रविण तायडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, नितीन निंबुळकर, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकांना मानवी हक्काची जाणीव असणे गरजेचे आहे. आपल्यावर झालेल्या अन्याय विरुद्ध मानवी हक्क आयोगाकडे दाद मागावी. याकरीता शासनस्तरावर यत्रंणा कार्यरत आहे. मानवी हक्काचे माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याकरीता असे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
यावेळी विजय कुमार गडलिंगे व ॲड. राजेश जाधव यांनी मानवी हक्काचे महत्व व अधिकाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी अधिकारी संदिप ककांळे तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार गुणवत्ता विकास कक्षाचे समन्वयक गजानन महल्ले यांनी केले.
______________________________________________
*उपायुक्त डॉ.पंकज जावळे यांनी संध्याकाळी त्यांच्या दालनात कोरोना लसीकर तसेच मनपा द्वारे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधेबाबत पत्रकार परिषद*
अकोला अकोला महानगरपालिकेतील आज याबैठकीमध्ये मनपा उपायुक्त डॉ.जावळे यांनी कोरोना लसीकरण आणि अकोला मनपाव्दारा देण्यात येणा-या सोई-सुविधांबाबत माहिती दिली. ज्यामध्ये अकोला शहराची एकुण 452257 लोकसंख्या असून यामधून 18 वर्ष वयोगट वरील 332409 लाभार्थी असून आज पर्यंत एकुण 293909 लाभार्थ्यांनी म्हणजे 88.42 टक्के लाभार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोज घेतला असून आहे आणि एकुण 165674 लाभार्थ्यांनी म्हणजे 52.25 टक्के लाभार्थ्यांनी आपला दुसरा डोज घेतला आहे. तसेच हर घर दस्तक उपक्रमांतर्गत एकुण 40 पथके कार्यान्वीत करण्यात आले होते ज्यामध्ये 160 आशा वर्कर, 230 आरोग्य विभागातील कर्मचारी, 70 शिक्षक आणि 130 आंगणवाडी सेविका यांचा समावेश होता. या चमुव्दारे शहरातील प्रत्येक घरी कोरोना लसीकरणाची दस्तक देत घराजवळ असलेल्या कोरोना लसीकरण केंद्रांवर घेउन जाउन लसीकरण करवून घेतल्या. तसेच विदेशातून आलेल्या एकुण 27 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यामधून सर्वांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. तसेच दि. 1/12/2021 ते दि. 7/12/2021 पर्यंत कोरोना संक्रण झालेले एकुण 7 नागरिक आहे. आणि आपल्या शहरात पॉझिटीव्हीटी दर 0.2 टक्के आहे. तसेच अकोला मनपात एकुण 2532 दिव्यांग लाभार्थ्यांची नोंद असून यामधून पहिला डोस घेतल्याचे 140 दिव्यांग लाभार्थी आणि दुसरा डोज घेतलेले 280 लाभार्थ्यांनी आपले लसीकरणाचे प्रमाणपत्र मनपाच्या दिव्यांग कक्ष येथे सादर केले आहे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना आजपर्यंतच्या उदर निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. तसेच जे लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत जाउ शकत नाही अशा लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाउन लस देण्याचे कामाला सुरूवात करण्यात आली आहे. तसेच अकोला महानगरपालिका अंतर्गत येणा-या सर्व सोई-सुविधांचा लाभ देण्यात येत असून कोणत्याही व्यक्तीला किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना मनपा व्दारा देण्यात येणा-या सर्व सोई-सुविधा आणि मनपात नोंद असलेल्या दिव्यांग लाभार्थी यांचा उदर निर्वाह भत्ता व ईतर सेवा लसीकरणासाठी थांबविण्यात आलेल्या नाही आणि सेवा थांबविण्याबाबतचे कोणत्याही प्रकारचे आदेश आयुक्त कार्यालयाकडून निर्गमीत करण्यात आलेले नाही कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी असे मनपा उपायुक्त डॉ.पंकज जावळे यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच अकोला शहरातील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिंबंधात्मक उपाययोजनांचा काटेकोरपणे पालन करून कोरोना लसीचे दोन्ही डोज घेउन आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करावे असे आवाहन मनपा उपायुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केले आहे.
_______________________________________________
*फटाके फोडणाऱ्या व फॅन्सी नंबर बुलेट पोलिसांच्या रडारवर*
अकोला- अकोला शहरातीलबुलेटच्या मूळ वाहनांमध्ये बदल करून फटाके फोडणारे सायलेन्सर लावणाऱ्या व फॅन्सी नंबर वापरणाऱ्या बुलेट पोलिसांच्या रडारवर असून अशा वाहनांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.
शहरातील मध्यवर्ती गांधी चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, खुले नाट्यगृह टावर चौक, मध्यवर्ती बस स्थानक या परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून फटाके फोडणारे बुलेटवर व फॅन्सी नंबर असणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली तसेच मूळ वाहनात बदल करणार्यांना सक्त ताकीद देऊन मूळ वाहन जसेच्या तसे करण्याचे सांगितले.
-- शहर वाहतूक शाखेच्या वतीने फटाके फोडणार या वाहनांवर यापूर्वीसुद्धा कारवा
ई करण्यात आलेली आहे. या वेळी अनेक बुलेट धारकांनी वाहन मूळ स्वरूपात केल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना सांगितले यावेळी अशा वाहनधारकांचे कौतुक सुद्धा करण्यात आले व त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे सांगितले.
_____________________________________________
*बार्शिटाकळी, जि. अकोला येथील धोकादायक व्यक्ती एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये*
*एक वर्षाकरीता स्थानबध्द*
अकोला एक वर्षाकरिता स्थानबद्ध अनिल वानखडे, कान्हेरी सरप, जि. अकोला येथे राहणारा धोकादायक व्यक्ती अनिल शेषराव ३५ वर्षे, याचे वर यापुर्वी दंगा करणे, विनयभंग करणे, दुस-याचे जिवीतास धोका निर्माण करणे, विनयभंग करणे, घराविषय आगळीक करणे, दुखापत करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अवैद्यरित्या शस्त्र बाळगणे असे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुद्ध गंभीर दखल घेण्यात येवुन धोकादायक व्यक्ती अनिल शेषराव वानखडे, याचे कुत्यास आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. १०/१२/२०२१ रोजी पारीत केला.
मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून अनिल शेषराव वानखडे याचा तात्काळ शोध घेवून त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक १०/१२/२०२१ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, सा. यांचे
मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापुर उपविभाग,
मुर्तिजापुर स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ. मंगेश महल्ले,
यांनी तसेच पो.स्टे. बार्शिटाकळी येथील सहा. पोलीस निरीक्षक मनोज लांडगे तसेच पो.स्टे. मधील
कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
●अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहून शांतता रहावी याकरीता एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावति असुन माहे-जुलै २०२० ते सन २०२१ चे आज पावेतो हयाकालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकुण ४८ गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगारांवर लवकरच एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.
_____________________________________________
*विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१; मतदान पेट्या सुरक्षा कक्षात सिल*