स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन बोरगाव मंजु येथे नागरी वस्तीत अवैध स्फोटक पदार्थ जिलेटिनचा कांडया व डिटोनेटर बाळगल्याप्रकरणी कार्यवाही*

 स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन बोरगाव मंजु येथे नागरी वस्तीत अवैध स्फोटक पदार्थ जिलेटिनचा कांडया व डिटोनेटर बाळगल्याप्रकरणी कार्यवाही*


अकोला अकोला जवळील बोरगाव मंजूर येथे दि. ०९/रोजी श्री. संतोष महाल्ले पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना गोपणीय माहीती मिळाली की, ग्राम बोरगाव येथे इसम नामे नसीमोददीन जमीरोददीन वय ६४ वर्ष रा. हाजीनगर बोरगाव मंजु ता. जि. अकोला हा त्याचे घरी अवैधरित्या परवान्याशिवाय स्फोटक पदार्थ •जिलेटीन कांडया व डिटोनेटर बाळगुन आहे अशा माहीतीवरून स्था. गु.शा.पथकान सदर ठिकाणी छापा मारून कार्यवाही केली असता सदर ठिकाणी इसम नसीमोददीन जमीरोददीन वय ६४ वर्षे रा हाजीनगर बोरगाव मंजु ता. जि. अकोला याचे घरझडती घेतली असता त्यांचे घरात पुढील वर्णनाच स्फोटक साहीत्य मिळुन आले. १) Superpower 90 emulsion explosive या नावाचा एकुण ८५ स्फोटक जिलेटीन कांडया २ ) Electric Detonetor असे एकुण ५२ नग असे मिळुन आले. तरी इसम नामे नसीमोददीन जमीरोददीन वय ६४ वर्षे रा. हाजीनगर बोरगाव मंजु ता. जि. अकोला यांनी नागरी वस्ती मध्ये स्फोटक पदार्थ मानवी जिवीतास धोका होईल याची शक्यता असताना हयगयीचे कृत्य करून कोणत्याही परवान्याशिवाय स्फोटक पदार्थ बाळगले त्यामुळे त्याचे विरुद्ध भारतीय स्फोटक अधिनियम १८८४ कलम ५५, ९ (B) (i) (b) सह स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ५ सह कलम २८६भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी पुढील तपास कामी पो.स्टे बोरगांव मंजु यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. जी श्रीधर सा मा. अपर पोलीस ●अधिक्षक, श्रीमती मोनिका राउत मॅडम यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोउपनि. गोपाल जाधव, ए. एस. आय. दशरत बोरकर, नापोकॉ गोकुळ चव्हाण, पो. का लिलाधर खंडारे, पो.कॉ शेख अन्सार, चालक, पो.कॉ. विजय कबले, दिपील पवार यांनी केली.






भारतीय स्वातंत्राची ७५ वर्षे अर्थात "आजादी का अमृत महोत्सव" हा उपक्रम देशभरात साजरा होत आहे. त्या अनुषंगाने अकोला पोलीस दला मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत दि १२/१२/२०२१ रोजी सकाळी ०७:०० वा. "सायकल मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.*


अकोला आजादी का अमृत महोत्सव अकोला पोलीस दलातर्फे सदर सायकल मेरेथॉन शहर वाहतुक शाखा येथुन सुरू होऊन नेहरू पार्क चौक अशोक वाटीका सरकारी बगीचा कोतवाली चौक मानेक टॉकीन राजकमल चौक रेल्वे ओव्हर ब्रीज रेल्वे स्टेशन चौक- अग्रसेन चौक दुर्गा चौक सिव्हील लाईन चौक या मार्गाने येवून शहर वाहतुक शाखा कार्यालय येथे संपणार आहे. आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्या करीता शहरातील जास्तीत जास्त नागरीक, संस्थांनी सदर सायकल मॅरेथॉन रॅली मध्ये सहभाग घ्यावा असे श्री विलास पाटील, पोलीस निरीक्षक शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी आवाहन केले आहे. तरी सदर रैली मध्ये सहभाग घेण्यास इच्छुक नागरीक संस्था यांनी दि. ११/१२/२०२१ रोजी १८:०० वा पर्यंत शहर वाहतुक शाखा अकोला येथे संपर्क साधुन नोंदणी करावी

भारतीय स्वातंत्राची ७५ वर्षे अर्थात "आजादी का अमृत महोत्सव" हा उपक्रम देशभरात साजरा होत आहे. त्या अनुषंगाने अकोला पोलीस दला मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत दि १२/१२/२०२१ रोजी सकाळी ०७:०० वा. "सायकल मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.*

अकोला आजादी का अमृत महोत्सव अकोला पोलीस दलातर्फे सदर सायकल मेरेथॉन शहर वाहतुक शाखा येथुन सुरू होऊन नेहरू पार्क चौक अशोक वाटीका सरकारी बगीचा कोतवाली चौक मानेक टॉकीन राजकमल चौक रेल्वे ओव्हर ब्रीज रेल्वे स्टेशन चौक- अग्रसेन चौक दुर्गा चौक सिव्हील लाईन चौक या मार्गाने येवून शहर वाहतुक शाखा कार्यालय येथे संपणार आहे. आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्या करीता शहरातील जास्तीत जास्त नागरीक, संस्थांनी सदर सायकल मॅरेथॉन रॅली मध्ये सहभाग घ्यावा असे श्री विलास पाटील, पोलीस निरीक्षक शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी आवाहन केले आहे. तरी सदर रैली मध्ये सहभाग घेण्यास इच्छुक नागरीक संस्था यांनी दि. ११/१२/२०२१ रोजी १८:०० वा पर्यंत शहर वाहतुक शाखा अकोला येथे संपर्क साधुन नोंदणी करावी.



.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने