अकोला,दि.8 विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2021 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार दि.14 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आज मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्यांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आजचे हे प्रशिक्षणाचे पहिले सत्र होते.
आजच्या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मतदार संघातील सर्व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, गजानन सुरंजे, प्रांताधिकारी बाळापूर रामेश्वर पुरी, मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते पाटील, अकोला डॉ. निलेश अपार तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रिया, मतमोजणी केंद्रावरील रचना, नियुक्त केलेल्या प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये, सुक्ष्म निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या, मतमोजणीचे नियोजन व कार्यपद्धती तसेच वैध, अवैध मतपत्रिकाबाबतची माहिती देण्यात आली. मतमोजणी पारदर्शक पार पडावी याकरीता सर्वानी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
_____________________________________________
*लूसी च्या मदतीने शास्त्रीनगर खदान अमली पदार्थ आणला उघड शीत*
अकोला शास्त्री नगर खदान येथीलअंगली पदार्थ विरोधी मोहीमे अंतर्गत अकोला पोलिस दलातील अंमली पदार्थ शोधक श्वान लुसी चा मदतीने अंमली पदार्थ गांजा विक्रेत्यावर छापा घालुन कार्यवाही
मा. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर साहेब यांचे मार्गदशनाखाली जिल्हयातील अंमली बाळगणे विक्री करणे तस्करी करणे इ. बाबत मोहीम सुरू असून सदर मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यत यावी याकरीता अकोला पोलिस दलातील श्वान पथकात कार्यरत अंमली पदार्थ शोधण्यात प्राविण्य असलेले श्वान लुसी याचे मदतीने काल दि.०७/१२/२०२१ रोजी स्थानीक गुन्हे शाखा येथे मिळालेल्या माहीती प्रमाणे तसेच संशयीत अंमली पदार्थ विक्री करणारे यांची घरझडती घेण्याचे मोहीमेदरम्यान इसम नामे शेख मुस्तफा शेख मकबुल वय ४० वर्ष रा. शास्त्रीनगर खदान, अकोला याचे घरची अंमली पदार्थ शोधक श्वान लुसी हिचे मदतीने झडती घेतली असता त्याचे घरून २०० ग्राम प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा किंमत अंदाजे ३००० / चा मिळुन असल्याने इसम नामे शेख मुस्तफा शेख मकबुल वय ४० वर्षे रा. शास्त्रीनगर खदान, अकोला याचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट चे कलम २० (ब) । (अ) प्रमाणे पोलिस स्टेशन खदान जि. अकोला येथे गुन्हा नोंद करून नमुद आरोपी पुढील तपास कामी पो.स्टे. खदान यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. जी श्रीधर सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मोनिका राउत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोउपनि. गोपाल जाधव ए. एस. आय. दशरत बोरकर, नापोकॉ गोकुल चव्हाण, पो. कॉ लिलाधर खंडारे, पो. कॉ शेख अन्सार, मपोकॉ, जोत्स्ना लव्हाळे, चालक. पो. कॉ. नफिस शेख तसेच श्वान पथकाचे पोउपनि मडावी, डॉग हॅन्डलर पो.कॉ. गणेश महाले यांनी केली.
_____________________________________________
*शनिवारी(दि.11) राष्ट्रीय लोक अदालत*
अकोला दि.8 ज्या पक्षकारांचे प्रलंबित प्रकरणे किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत अशा प्रकरणाची निपटारा होण्याकरीता ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये आयोजन शनिवार दिनांक 11 डिसेंबर रोजी होणार आहे. अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच दरम्यान होणार आहे. या लोक अदालतचे लाभ सर्व पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष य.गौ. खोब्रागडे व सचिव स्वरुप बोस यांनी केले.
लोक अदालतचे फायदे :
लोक न्यायालयाच्या निवाड्याविरूध्द अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जावून निकाला झटपट लागतो. लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजूतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार. लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा यांची बचत होते व लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते.
ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खटलापूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधीत न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 0724-2410145 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
_____________________________________________
*कोविडः एक पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज व एक मृत्यू;*
*रॅपिड ॲटीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह*
अकोला दि.8 आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 333 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. होम आयसोलेशन येथून तीन जणांना डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57904(43293+14434+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 337056 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 333403 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3251 नमुने होते. आजपर्यंत एकूण 337056 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 293763 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शुन्य पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात एका महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही महिला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
एक मयत
दरम्यान काल एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ, अकोला येथील 60 वर्षीय महिला असून ती दि. 29 नोव्हेंबर रोजी दाखल झाली होती. त्यांचा उपचारा घेतांना मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
तीन जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर होम आयसोलेशन येथून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
नऊ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57904(43293+14434+177) आहे. त्यात 1140 मृत झाले आहेत. तर 56755 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत नऊ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 205 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.7) दिवसभरात झालेल्या 205 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे तीन, अकोट येथे 16, बार्शीटाकळी येथे दोन, मुर्तिजापूर येथे चार, अकोला महानगरपालिका येथे 117, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांची 16, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 42 तर हेगडेवार लॅब येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 205 चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.
*स्थानिक गुन्हे शाखेकडुन अवैधरित्या Industrial Oil / Bio-Diesel साठवणुक करून विक्री करणा-या विरूध्द कार्यवाही करुन १,४६,४००/-रु चा माल जप्त.*
अकोला - दिनांक ०८ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, पो. स्टे. हिवरखेड, जि. अकोला हद्दीतील अडगांव (बु) येथील रव्यमी पेट्रोल पंप जवळ असलेले श्री. विठ्ठल शेती उपकरण इंधन केंद्र या दुकानात अवैधरित्या विनापरवाना बायोडीजल च साठवणुक करून त्याची विक्री करून काळाबाजार करण्यात येत आहे वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री. रविंद्र चंद्रकांत येन्नावार, अकोट आणि पंचांसह अडगांव बु येथील स्वामी पेट्रोलपंप लगत असलेल्या श्री. विठ्ठल शेती उपकरण इंधन केंद्र येथे छापा कारवाई करून १६०० लिटर Industrial Oil / बायोडीजल सदृश पेट्रोलीयम पदार्थ, किं.अं. १,२८,०००/- तसेच साठवणुकीसाठीचे साहित्य एक हिरव्या रंगाची मनोलक्ष कंपनीची अं. ३००० लिटर क्षमता असलेली प्लास्टीकची टाकी, किं.
अं. १५,०००/-रु,०२x२.५ फुट पत्राचे टब अं. किं. ६००/-रु, सदर टब मध्ये ५ लिटर २ लिटर १ लिटर क्षमता असलेले शंखु आकाराचे लोखंडी माप किं. अं. १५००/-रु, ०३ प्लास्टीक नरसाळे व एक प्लास्टीक चाळणी किं. अं. ३००/-रु, २० लिटर क्षमता असलेले ०४ आणि ३५ लिटर क्षमता असलेली ०१ प्लास्टीकचे खाली कॅन किं. अं. १०००/-रु असा एकुण १,४६,४००/- रु चे बायोडीजल सदृश पेट्रोलीयम पदार्थ व साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पो स्टे हिवरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात •आला असुन पुढील तपास पो स्टे हिवरखेड प्रभारी अधिकारी करीत आहेत.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर सा., अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि सहायक पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष महल्ले, पोउपनि, सागर हटवार, पोहवा सदाशिव सुळकर, नापोकॉ. अब्दुल माजीद, संदीप तवाडे, पोकॉ मोहम्मद रफी, नफीस शेख यांचे पथकाने केल