अकोला- अकोला शहर व जिल्हा परिसरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्याने मा. पोलीस अधिक्षक श्री. जी. श्रीधर सा व अपर पोलीस अधिक्षिका श्रीमती मोनिका राउत मॅडम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक श्री संतोष महल्ले व स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील अधिकारी व कर्मचारी यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आनणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज दिनांक ०४/१२/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पथकास मिळालेल्या गुप्त बातमीवरून गजानन भास्करराव अवचार वय ३१ वर्षे रा. गुरुवार पेठ, ता. पातुर जि. अकोला ह.मु.महान ता. बार्शिटाकळी जि. अकोला यास ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथे आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने आतापर्यंत एकुण ०७ मोटार सायकल हया अकोला, यवतमाळ व वाशिम जिल्हयातुन चोरी केल्याची कबुली दिली. वरून आरोपीकडुन एकुण ०७ मोटार सायकली किंमत अंदाजे ०१,५५,०००/- रु. जप्त करण्यात आल्या असून पुढीगुन्हे आणण्यात आले आहेत. १) पो.स्टे. बार्शिटाकळी अपराध क्रमांक ८४ / २०२१ कलम ३७९ भा.दं. [वि. २) अपराध क्रमांक ६०५/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. ३) पो.स्टे. पातुर अपराध क्रमांक ५९७ / २०२१ कलम ३७९ भा. दं.वि. ४) पो.स्टे. दिवस जिल्हा यवतमाळ अपराध क्रमांक १०४९/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. ५) पो.स्टे. मानोरा जिल्हा वाशिम अपराध कमांक ६५८/२०२१ कलम ३७९ मा.दं.वि. तसेच पो.स्टे. पातुर हददीतील चोरीची एक मो.सा. व पो.स्टे. दिग्रस जिल्हा यवतमाळ हददीतील एक मोटार सायकल अशा एकूण सात मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री जी श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्री संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोउपनि, मुकुंद देशमुख, पोहवा. दत्तात्रय ढोरे, नापोकों, हसन शेख, विशाल मोरे, पो.कॉ. रवि पालीवाल, श्रीकांत पाड, संदिप टाले, मपोकॉ. स्वप्ना काशिद, चालक पो. कॉ. दिलीप पवार, विजय कबले, पो. कॉ. रोशन पटले, सतिश गुप्ता, सुशिल खंडारे, पो.स्टे. सायबर येथील पो. कॉ. गोपाल ठोंबरे व गणेश सोनोने यांनी केली यांनी आहे.
*अकोला -स्थानिक गुन्हे शाखेकडुन चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा उघड येथील गुन्हयातील चोरी गेलेली चारचाकी वाहन किं. २,००,०००/-रु जप्त.*
अकोला- अकोला जिल्हयामधील पो. स्टे. खदान येथे चारचाकी वाहन चोरी बाबत सन २०१९ मध्ये अप. क. ४४२/२०१९ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी गेलेली लाल रंगाची हयुंदाई एक्सेंट, क. एमएच ०२ ईएच ५७२९ हे वाहन अमरावती येथे एक इसम घेवून फिरत आहे. वरून अमरावती येथे जावुन नमुद वाहनाचा शोध घेतला असता, एक इसम हा सदर चारचाकी वाहनात दिसला. सदर वाहनास घेराव घालुन वाहनातील चालकास बाहेर बोलावुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव शेख नुर उर्फ रशीद शेख ईस्माईल, वय ४७ वर्ष, रा. तकिया दिवान शाह, मोमीनपुरा, नागपुर असे सांगितले. सदर इसमास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर वाहन हे सन २०१९ मध्ये अकोला येथुन चोरी केल्याची कबुली दिली. वरुन दोन पंचांसमक्ष एक हयुंदाई एक्सेंट, जुनी वापरती, लाल रंगाची, क. एमएच ०२ ईएच ५७२९ असेलेले चारचाकी वाहन, किं. अं. २,००,०००/- जप्त करण्यात आले.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर सा., अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष महल्ले, पोउपनि. सागर हटवार, पोहवा सदाशिव सुळकर, नितीन ठाकरे, नापोकॉ. अब्दुल माजीद, संदीप तवाडे, पोकॉ मोहम्मद रफी, नफीस शेख, अक्षय बोबडे, सुशिल खंडारे, रोशन पटले, सतिश गुप्ता यांचे पथकाने केली.
_____________________________________________
*विशेष पथकाची कारवाई....जुगार खेळणाऱ्यावर धाड.....2060रुपयाचा मुद्देमाल जप्त.......*
अकोला- पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार कडुन खात्रीलायक बातमी मिळाली नूर नगर मदरसा जवळ काही इसम 52 तास पैश्याच्या हारजीत वर जुगार खेळत आहे अश्या खात्री लायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहाणी करून रेड केली असता तेथे (1)विनोद अनिल लाहोरे 47 विजय नगर तार फाईल अकोला (2)गौतम भाऊराव लोणारे 35 रं. दुर्गा चौक देशमुख पेठ (3)सोहिल शेख शेख जमील 21रा. राजू नगर अकोला हे मिळून आले.. त्याच्या कडे नगदी 2060रु. आणि 52 तास पत्ता मिळून आले...त्यांचे हे कृत्य महा. जु. का.अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो.स्टेशन अकोट फाईल अकोला येथे व गुन्हा नोंदविण्यात .आला आहे......
_____________________________________________
* *जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचा अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्या वर रेड ....**
अकोला- दि.5 पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहित मिळाली कि अकोट स्टॅन्ड कडून गांधी ग्राम कडे दुचाकी वर एक इसम ऍक्टिव्हा लाल रंगाची गाडी क्र. Mh 30 ak 6877दारू ची विक्री करीता नेणार आहे अश्या खात्रीलायक बातमी वर शिव मंदिर समोर अकोट फाईल येथे नाकाबंदी करून आमचे कडे येणाऱ्या सदर इसमास रोड च्या बाजूला घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव नितेश दशरथ गोरले वय 42 रा.गुलजार पुरा अकोला असे सांगितले. त्याच्या जवळील पोतडीची पाहणी केली असता त्यात देशी दारू 111 टॅगो प्रीमियम संत्रा कंपनीचे 2000नग 6000रु मिळून आले... तसेच होंडा कंपनी ची लाल रंगाची ऍक्टिव्हमो. सा.कीं. अं.40,000 रु.असा एकूण 46000रु चा मुद्देमाल मिळून आला..त्याचे हे कृत्य महा. दा. अधी.प्रमाणे होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन अकोट फाईल अकोला येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे...
*सदरची कारवाई मा. पो अधीक्षक सा. जी. श्रीधर सा.,अपर पो. अधीक्षक एम.राऊत मॅडम,यांच्या मार्गदर्शन खाली पो. नि. विलास पाटील सा.आणि विशेष पथकने केली..
_____________________________________________
*शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत करण्यात आलेल्या कारवाई मध्ये वाहन धारकांवर प्रलंबीत ई-चालान असलेल्या वाहनधारकांवर खटले दाखल करण्यात येणार असल्या बाबत.*
शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत ०१ जानेवारी २०२१ ते आज पावेतो एकुण १०५८५४ वाहन चालक/चारकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे कडुन ८६३८००० /- रूदंड वसुल करून शासन जमा करण्यात आलेला आहे. परंतु वर्ष २०२१ मध्ये एकुण ई-चालान करण्यात आलेल्या पैकी ९३.८०१ वाहन धारकांवर एकुण २,३४,९३,४०० रूपये ई-चालान तडजोड रक्कम थकबाकी आहे. अश्या सर्व ई-चालान प्रलंबीत असलेल्या वाहनधारकांवर न्यायालयात खटले दाखल करण्याबाबत वरीष्ठांचे आदेश पोलीस प्रशासनास प्राप्त झालेले आहेत.
महीना प्रलंबीत ई-चालान केसेस
जानेवारी ४२०९ फेब्रुवारी४९६४ मार्च ८६४६ एप्रिल १०११० मे ७४२३ जून १०५१२ जुलै१०७१३ ऑगस्ट ९१५४ सप्टेंबर ९९५६ ऑक्टोंबर११३१६ नोव्हेंबर ९७९८ तरी अश्या प्रकारचे ई-चालान दंड प्रलंबीत असणा-या वाहनधारकांनी दि ११/१२/२०२१ रोजी जिल्हया सत्र न्यायालय येथे आयोजीत लोक अदालत मध्ये हजर येतुन आपले प्रलंबीत ई-चालान दंडाचा भरणा करावा अथवा दि १०/१२/२०२१ पूर्वी कोणत्याही ट्रॅफीक अमलदाराकडे सदर दंडाचा भरणा करण्या बाबत वाहनधारकांच्या मोबाईल क्रमांकावर एस. एम. एस पाठवुन सुचना देण्यात आलेली आहे. सदर दंडाचा भरणा हा वाहनधारकांना आलेल्या एस. एम. एस वरील लिंकद्वारे अथया महाट्रफीक अॅप द्वारे सुद्धा भरता येतो.
तसेच आपले वाहनावर दंड आहे का, हे जाणून घेण्यासाठी नागरीकांकरीता सुलभ ऑन लाईन प्रकीयेची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी https://parivahan.gov.in/privahan या वेबसाईटवर जावून आपल्या वाहनाचा क्रमांक टाकल्यास वाहनावर प्रलंबीत असलेला ई-चालाब बाबत सविस्तर माहीती मिळवुन घेता येते.
तरी शहरातील सर्व नागरीकांनी आपले वाहनावरील प्रलंबीत ई-चालान तडजोड रक्कम शासन जमा करावी अन्यथा दंडाच्या तडजोड रक्कम न भरणा-या वाहनचालकां विरुद्ध विद्यमान न्यायालयात खटले भरण्यात येणार असल्याबाबत श्री विलास पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.
Tags
Akola city news