धामणा बु येथे माकडांचा हैदोस; नागरिक त्रस्त

 धामणा बु येथे माकडांचा हैदोस; नागरिक त्रस्त 


अकोट तालुक्यातील धामणा बु येथे गत काही दिवसांपासून माकडांनी हैदोस घातला असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.उन्हाळ्याच्या दिवसांत शेतातील नदी,नाले व पाण्याचे स्त्रोत पूर्णतः कोरडे झालेले असतात त्यामुळे माकडे, पशू पक्षी यांना पिण्यास पाणी मिळत नाही, पिण्याच्या पाण्याच्या शोधात जंगलातून मोठ्या प्रमाणात माकडे दरवर्षी गावाकडे येतात. यावर्षी गावात माकडांचे एक मोठे टोळके दाखल झाले आहे. या माकडांनी छतावरील कौलारू घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गावातील बहुतांश घरांवर कवेलू व टीनपत्रे आहेत, यावर माकडे उड्या मारून पूर्णपणे नासधूस करीत आहेत.. केवेलू घरांचे संपूर्ण पण नुसकान केलें आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत महिला कुरवडया, शेवय्या, पापड, तसेच डाळ, गहू,ज्वारी बाजरी यांना उन्हात वाळू घालतात. याचा फायदा घेवून माकडे घराच्या गच्चीवर पायऱ्या चा मार्गे उपयोग करून चक्क घरात शिरून घरातील सामानाची नासधूस करीत आहेत. घरातील सदस्यावर हल्ले सुद्धा करू शकतात, तरी संबंधित वन विभागाने याकडे लक्ष द्यावे. वनविभागाने या माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी धामणा बु  येथील ग्रामस्थांनी केली आहे.अकोट प्रतिनिधी गणेश वाकोडे -अकोट प्रतिनिधी गणेश वाकोडे

===================================

सुवर्णा पब्लिकेशन बहुउद्देशिय संस्थेचा समाजसेवी उपक्रम मेळघाटामध्ये आदीवासी मुला-मुलींना जीववश्यक वस्तूंचे वाटप 

अकोला :  मेळघाटातील आदीवासी लहान मुलांना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना क्रीकेटच्या टोप्या देण्यात आल्या,  तसेच अनवाणी फिरत असलेल्या लहान मुलींना चप्पल तसेच वृद्धांसाठी उन्हापासून बचाव व्हावा म्हणून दुप्पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच स्मॉल अ‍ॅण्ड मेडीयम न्यूज पेपर संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संतोष धरमकर हे दरवर्षी आदीवासी बांधवांना जिवनोपयोगी वस्तूंचे वाटप करत असतात. याही वर्षी त्यांनी मेळघाटामधील आदीवासी बहूल गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व गावात फिरून त्यांनी मुलींना, लहान मुलांना तसेच वृद्धांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले. 

तेथील मुला-मुलींनी लगेच टोप्या घालून व चप्पल घालून आनंद व्यक्त केला, तसेच वृद्धांना दुप्पटे व कपडे दिले असता त्यांनी लगेच घालून आनंद व्यक्त केला व आभार देखिल व्यक्त केले. यावेळी त्यांचे सोबत शिवसेनेचे नेते प्रदीपभाऊ गुुरुखुद्दे, दत्ता ठाकरे,  आबाराव आमले,  संदीप मोरे, आरिफ खान, सचिन अहीर हे मान्यवर होते. त्यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. संतोष धरमकर यांच्या समाजसेवी कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. 

===================================

मलकापूर शहरातील चाळीस बिघा परिसराला जे चाळीस बिघा हे नाव कायम रहावे याकरिता स्थानिक रहिवास्यांचे नगर परिषद व तहसील यांना निवेदन 

बुलढाणा मलकापूर शहरातील चाळीस बिघा हे नाव कित्येक वर्षांपासून शहरात प्रचलित आहे या परिसरात अनेक महत्वाची ठिकाणे असुन हॉस्पिटल सारखी ठिकाणे या परिसरात आहे तसेच शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची येथे हॉस्पिटल च्या कामाने येथे वर्दळ असते तसेच शहर व ग्रामीण भागच नव्हे जिल्ह्यात सुद्धा चाळीस बिघा या परिसराला ओळळले जाते त्यामुळे या परिसराचे नाव बद्दलविले असता गोंधळ निर्माण होऊ शकतो व नागरिकांना मोठा मनस्ताप होणार हे मात्र निश्चित त्यामुळे कुठलेही नामांतर न करता जे चाळीस बिघा नाव आहे ते कायम ठेवण्यात यावे अशी मागणी चाळीस बिघा परीसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली या संदर्भात  नगर परिषद व तहसील कार्यालया मध्ये निवेदन सादर करण्यात आले आहे  तसेच बळजबरीने किंवा दडपशाहीने नामांतर केले असल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला निवेदन सादर करते वेळी चाळीस बिघा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

==========================================

निवडणूक आयोगाच्या नियमांना डावलून स्थानिक नगर परिषद ने नियमांची केली पायमल्ली 

बुलढाणा - निवडणूक आयोगाच्या नियमांना डावलून स्थानिक नगर परिषद निवडणूक अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना करतांना राजकीय दबावामुळे चुकीच्या पध्दतीने व काहींना फायदा व्हावा यादृष्टीने करण्यात आली असल्याबाबत हरकती दाखल केल्या असून या हरकतींची दखल घेण्यात येवून दुरूस्ती करण्यात यावी. अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी दिला.

चुकीच्या व नियमांना डावून बनविण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या हरकतींबाबत माहिती देण्यासाठी २६ मे रोजी स्थानिक विश्राम गृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरकती दाखल केलेले समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे, राष्ट्रवादी जिल्हा महासचिव अनिल दादा झोपे, भाजपाचे बबलू देशमुख, एमआय एमचे जिल्हाध्यक्ष दानिश शेख, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर पाटील उपस्थित होते. 

यावेळी माहिती देतांना भाई अशांत वानखेडे म्हणाले की, आगामी काळातील होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात शहरातील तयार करण्यात आलेली प्रभाग रचना ही शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांची पायमल्ली करून राजकीय दबावापोटी करण्यात आली आहे. यामध्ये मार्गदर्शक आदेशित तत्त्वामध्ये उत्तर दिशेकडून प्रभाग रचनेत सुरुवात करण्यात यावी, असे असताना उलट केल्याचे दिसून येते. कुठल्याही वस्तीचे विभाजन शक्यतोवर होणार नाही याची दक्षता असताना माळीपुरा वार्डाचे विभजन करण्यात आले. माजी नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांचा प्रभाग तिन्ही दिशांनी फोडला. उत्तर, पूर्व व पश्चिम असा लोकसंख्या बाबत आवश्यक असणारी आयोगाची मान्यता आवश्यक असताना घेण्यात आली नाही, प्रगनन गटांच्या सीमारेषा आवश्यक त्या रंगाने दर्शविलेली नाही,  प्रभाग रचनेमध्ये प्रभागाची वाढ होत असताना तो शेवटी न वाढवता मध्येच टाकण्यात आला. प्रभागांना अनुक्रमांक अनुक्रमे देणे आवश्यक असताना देण्यात आलेले नाही, कोणत्याही परिस्थितीत महामार्ग ओलांडून प्रभाग रचना करता येत नसताना सुध्दा मलकापूर-सोलापूर महामार्ग ओलांडून नियमबाह्य प्रभाग रचना करण्यात आली, एका प्रभागाची लांबी जवळपास तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची असल्याचे दिसून येते, अशा विविध हरकती असल्याने या चुकीच्या प्रभाग रचना क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या चुकांमुळे अथवा राजकीय दबावाला बळी पडून करण्यात आलेले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

============================================


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने