अकोला महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण मंगळवारला होणार जाहीर.

 अकोला महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण मंगळवारला होणार जाहीर.      

अकोला दि. 27 मे 2022  –   मा.उच्‍च न्‍यायालयानी ईतर मागास वर्गीय प्रवर्गाचे (OBC) आरक्षण नाकारल्‍याने एकुण 74 जागांवर सर्व साधारण प्रवर्गातील खुल्‍या प्रवर्गासाठी आहे. एकुण 91 जागांमधील 46 जागा त्‍या महिला प्रवर्गाकरिता आरक्षित करतांना 8 जागा अनुसुचित जाती महिला, एक जागा अनुसूचित जमाती महिला करिता तर उर्वरित 37 जागा सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी निश्चित करण्‍याकरिता दि. 31 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे सोडतीव्‍दारे ठरविण्‍यात येणार आहे, याकरिता मा.आयोगाच्‍या निर्देशानुसार याबाबतची जाहीर सुचना स्‍थानिक वृत्‍तपत्रामध्‍ये तसेच अकोला महानगरपालिकेच्‍या वेब साईटवर प्रसिध्‍द करण्‍यात आली आली आहेत अशी माहिती निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे यांनी दिली आहे.

अकोला महानगरपालिकेच्‍या एकुण 30 प्रभागामधून 91 सदस्‍य निवड करण्‍याकरिता होऊ घतलेल्‍या सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण लोकसंख्‍ये निहाय मा.राज्‍य निवडणूक आयोगाने अंतीम केले असून अनुसुचित जातीच्‍या लोकसंख्‍येनुसार उतरत्‍या क्रमाने एकुण 15 प्रभागातील अनुसुचित जातीच्‍या  उमेव्‍दाराकरिता राखीव करण्‍यात आले असून  अनुसूचित   जमातीचे दोन प्रभाग सुध्‍दा  त्‍यानुसार राखीव करण्‍यात आलेले आहेत.

========================================

अकोला ग्रामपंचायत प्रभाग रचना कार्यक्रम प्रसिद्ध


 अकोला दि.27(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्‍या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्‍या, तसेच नव्‍याने स्‍थापित ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने दि.27 जानेवारी 2022 रोजीच्‍या प्रभागांच्‍या सीमा निश्चित करण्‍याच्‍या कार्यक्रमातील सुनावणीच्‍या टप्‍प्यापासून प्रभागाच्‍या सीमा निश्चित करण्‍यासाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार प्रभाग रचना कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी व पातुर या तालुक्यातील एकूण 274 ग्रामपंचायतीच्या अंतिम प्रभाग रचनेला संबधित ठिकाणच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध देण्यात आली आहे, असे निवासी उप‍जिल्‍हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं./ जि.प./ पं.स. निवडणुक विभाग संजय खडसे यांनी कळविले आहे.

========================================

नवीन उड्डाण पुलावर जाहीरात लावण्‍या-या कोचींग क्‍लासच्‍या संचालकावर पोलीस तक्रार दाखल.      



अकोला दि. 27 मे 2022  –   अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये शहरातील नागरिकांना अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे कि, त्‍यांनी उड्डाण पुलाच्‍या खांब्‍यावर जाहीरात, फलके किंवा पोस्‍टर लावू नये तसेच अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये मनपाच्‍या पुर्व परवानगी शिवाय जाहीराती फलके किंवा पोस्‍टर लावून नये.

अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये नव्‍याने तयार झालेल्‍या उड्डाण पुलाच्‍या  खांब्‍यावर जाहीरात, फलके किंवा पोस्‍टर न लावणे संदर्भात अकोला महानगरपालिका व्‍दारा स्‍थानिक वृत्‍तपत्रामध्‍ये पुर्वीच जाहीरात प्रसिध्‍द करण्‍यात आली होती.

          प्रशांत पातोंड यांच्‍या व्‍दारे उड्डाण पुलाच्‍या खांब्‍यावर बस स्‍थानक ते टॉवर चौक ज्ञानज्‍योत अॅकाडमीचे पोस्‍टर लावण्‍यात आलेले आढळून आल्‍यावर अकोला महानगरपालिका पुर्व झोन कार्यालया मार्फत स्‍थानिक सिटी कोतवाली पोलीस स्‍टेशन येथे आज दि. 27 मे 2022 रोजी त्‍यांचे विरूध्‍द महाराष्‍ट्र  मालमत्‍ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 नुसार कलम 3 अन्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

===================================

थकित पाणीपट्टी कर आणि अवैध नळ जोडणी धारकांवर मनपा जलप्रदाय विभागाव्‍दारे कारवाई.      



अकोला दि. 27 मे 2022  –    अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकित पाणी पट्टी धारकांना तसेच अवैध नळ जोडणी धारकांना मनपा जलप्रदाय विभागाव्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे कि, त्‍यांनी थकित पाणी पट्टी कर भरून तसेच अवैध असलेली नळ जोडणी वैध करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच थकित पाणी पट्टी देयकाबाबत कोणत्‍याही प्रकारची तक्रार असल्‍यास अकोला महानगरपालिकेच्‍या जलप्रदाय विभागाशी संपर्क साधून देयके दुरूस्‍त करून थकित पाणी पट्टी कराचा भरणा वेळेवर करून नळ जोडणी खंडीत करणे सारख्‍या  अप्रीय कार्यवाही टाळावी.

 मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकित पाणीपट्टी कर आणि अवैध नळ जोडणी धारकांवर मनपा जलप्रदाय विभागाव्‍दारे नळ जोडणी खंडीत करण्‍याची मोहीम सुरू असून आज दि. 27 मे रोजी मनपा पश्चिम झोन हरिहर पेठ जलकुंभ अंतर्गत हरिहर पेठ मेन रोड येथील मुख्य पाईप लाईन वरील 6 अवैध नळ कनेक्शन खंडीत करण्‍यात आले आहे. 

सदर कारवाई जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच.जी.ताठे यांच्‍या मार्गदर्शनात करण्‍यात आली असून या कारवाईत जलप्रदाय विभागातील कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे, तुषार टिकाईत, विभागीय फिटर पद्माकर गवई, हरिहर पेठ जलकुंभ चे फिटर संतोष बडवे व व्हॉल्वमन दिनेश काटे, गजानन घोलप,  गोपाल विसपुते,  धनराज सदांशिव, धनराज पातोंड,  गणेश घोडके तसेच कंत्राटदार  मनोज अग्रवाल यांची उपस्थिती होती.

        ========================================

केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा


  अकोला,दि.27(जिमाका)-  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार दि.28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शनिवार दि.28 रोजी सकाळी साडेदहा वा. वणीरंभापूर येथे हेलिकॉप्टरने आगमन व वणी रंभापूर येथील तलाव पाहणी, सकाळी 11 वा. 15 मि. नी. बाबुळगाव तलावाची पाहणी, सकाळी 11 वा. 40 मि. नी. अमृत सरोवर  पुस्तक प्रकाशन सोहळा, स्थळ- डॉ. ठाकरे सभागृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, दुपारी साडेबारा वाजता कमिटी हॉल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे पत्रकारांशी संवाद. दुपारी एक वा. खा. संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ- रणपिसेनगर, जागृती विद्यालयाच्या मागे, अकोला, दुपारी 1 वा.20 मि.नी. रावणकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ-रामनगर, रतनलाल प्लॉट,अकोला, दुपारी पावणेदोन वा. विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी भेट व राखीव.स्थळ- पुष्पलता, आळशी प्लॉट, अकोला. दुपारी साडेतीन वा. अकोला शहरातील दोन उड्डाण पूल व अमृत सरोवर या दोघा प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती,स्थळ- क्रिकेट क्लब मैदान, अकोला, पावणे पाच वा. अकोला विमानतळावरुन नागपूरकडे हेलिकॉप्टरने रवाना

======================================

डाकविभागात कॅशलेस व्यवहार   


अकोला,दि.27 (जिमाका) - डाक विभागातील जिल्हा व तालुका पातळीवरील 46 कार्यालयामध्ये क्यु. आर. कोड उपलब्ध करण्यात आले आहे. या सुविधेमुळे डाक विभागातील सर्व व्यवहार कॅशलेस होणार होणार असून या सुविधेचा लाभ ग्राहाकांनी घ्यावा, असे आवाहन डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी केले आहे.  डाक कार्यालयातील उपलब्ध असलेल्या विविध सेवा जसे रजिस्टर पत्र, स्पीडपोस्ट, पार्सल बुकिंग व आर.डी. भरणा इत्यादी सेवा क्यु. आर. कोडचा वापर करुन कॅशलेस पद्धतीने  करता येणार आहे. याशिवाय डाकविभागातर्फे ग्राहकांकरिता इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याव्दारे ग्राहकांना एन.ई.एफ.टी., ऑनलाईन बील पेमेंट सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तसेच पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावरुन एन.ई.एफ.टी व्दारे कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे पाठविता किंवा जमा करता येणार आहे.  सद्या देशातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमधील एसबी, आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, एसएसए, एनएससी, केव्हीपी व एससीएसएस योजनांमध्ये जास्त व्याजदर दिला जातो. तरी या सेवेचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.

==================================

मो.हबीब शेख यांना मातृशोक  


अकोला,दि.27  - येथील जिल्हा माहिती कार्यालयाचे कॅमेरा सहायक श्री. मोहम्मद हबीब शेख  यांच्या मातोश्री  श्रीमती हमीदा बेगम यांचे गुरुवारी रात्री (दि.27) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थीवावर लकडगंज येथील दफनभुमित अंत्यसंस्कार करण्यात आला.  त्याच्या पश्चात पाच मुले व दोन बहिणी, सुना व नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्याही त्या मातोश्री होत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने