वंचित ने उड्डाणपूल ला काळे झेंडे लावुन केला निषेध

वंचित ने उड्डाणपूल ला काळे झेंडे लावुन केला निषेध



अकोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमना पहिलेच उड्डाण पुलावर काळे झेंडे  लावून केला  निषेध कारागृह समोरुन सुरूवात होणार्या उड्डाणपूलाला भाजपाने स्वर्गवासी विनयकुमार पाराशर यांचे नाव न देऊन उद्घाटन करण्यात येणार आहे ह्या अवमानाचा निषेध वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उड्डाणपूलाला काळे झेंडे लावुन करण्यात आला.

आज सकाळी  ०८.०० वाजता वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, अकोला पुर्व चे अध्यक्ष शंकरराव इंगळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,मनोहर बनसोड, मनोहर पंजवानी,एड आकाश भगत, संगीताताई खंडारे, सचिन गोरले (पाटील) प्रामुख्याने उपस्थित होते.

=========================================

 वंचित च्या प्रभाग क्रमांक ४ च्या वतीने सातव चौकस्थित अर्धवट उड्डाणपूल बांधकामाच्या विरोधात काळे झेंडे लावत  नोंदवला निषेध


अकोला स्थानिक सातव चौक येथील उड्डाणपूलाचे काम हे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ह्या अर्धवट उड्डाणपूलाच्या बांधकामाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक ४ च्या वतीने उड्डाणपूलाला काळे झेंडे लावुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, मनोहर बनसोड, बुद्धरत्न इंगोले, शैलेश देव,राजेश मोरे, अबगड,सचिन गोरले पाटील, माणिक शेळके, सोनू शिरसाट आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने