आपातापा रोड येथे काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन काम सुरू न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा - रवि शिंदे

आपातापा रोड येथे काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन 

काम सुरू न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा - रवि शिंदे

अकोला: आपातापा रोडचे बांधकाम सुरू आहे. परंतु सदर रस्त्यालगत असलेल्या दोन्ही नाल्यांचे बांधकाम गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे. येत्या काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मागील२१ जुलै २०२१ पुनरावृत्तीची प्रशासन वाटपाहत आहे का? असा सवाल नागरिक करीत आहेत, यावर्षी सुद्धा  पहिल्याच पावसात लोकांच्या घरात पावसाचे आणि नाल्याचे पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे.  या भागातील नगर सेविका सौ.चांदणी शिंदे आणि काँग्रेसचे शहर महासचिव रवि शिंदे यांनी याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला व स्थानिक प्रशासनाला अवगत करून दिले. अनेकदा निवेदन देऊन शेवटचे अल्टिमेटम सुद्धा दिले होते. तरी सुध्दा निगरगट्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. म्हणून येथील नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी रवि शिंदे आणि सौ.चांदणी शिंदे यांच्या नेतृत्वात आपातापा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलन मुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन येत्या दोन तीन दिवसात रस्त्याचे आणि नालीचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको   आंदोलन संपविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव माजी आमदार बबनराव चौधरी , अकोला शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील वानखडे , माजी नगरसेवक पराग कांबळे, महेश गणगणे , शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल रावदेव, पंकज देशमुख, डॉ. शफीक अहमद यांच्या सह या भागातील लाडीस फाईल, संत कबीर नगर, शंकर नगर, महमूद नगर, बांबुवाडी, बाप्पू नगर शेकडो नागरिक आंदोलना मसध्ये सहभागी झाले होते...

महेंद्र सत्याल  रामप्रसाद कोरी सुखराम बुंदले  ओहेकर काका तानाजी नरवडे   नागेश भाऊ टेलर राकेश अण्णा अमोल वाकोडे समाधान इंगळे सखाराम पंडित प्रल्हाद पंडित संजय बलखंडे सुशील कांबळे उमेश गवई चेतन पवार रवी धुंदवे   समीर भाई सुरेश मारब्दे  दिलीप  पोळ बबन गाकवाड कुसुम इंगळे   पाल मावशी सोनल शेगावकर सुमित्रा इंगोले रत्ना शेगावकर वैशू जोंधळे तायडे काकू  रंजना तिवारी चंदा बी कांबळे काकू नरवाडे काकू पहुरकर ताई खंडारे ताई छाया पंडित शोभा खरात गिरी मावशी पहुरकर काकू

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेले आश्वासन न पाळल्यास व येत्या दोन, तीन दिवसात नालीचे बांधकाम सुरू न झाल्यास आणखी आंदोलन तीव्र करून प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा रवि शिंदे यांनी दिला आहे...

=========================

अकोला येथील मोठ्या उमरी प्राणघातक युवकाचा मृत्यू



अकोला येथील मोठ्या उमरी मध्ये  रविवार रोजी सायंकाळी ३८ वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाय. उमेश अटाळकर हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन हद्दीतील मोठी उमरी भागातील रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या उमेश अंबादास अटाळकर या युवकावर तीन युवकांनी प्राणघातक हल्ला केला. या तिघांनी उमेश'च्या छातीवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. जखमी झालेल्या उमेशला तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ऑटो रिक्षात नेवून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नंदू राजेश बगाळे असं मारेकरी आरोपीचं नाव असून त्याच वय १९ वर्ष आहे. त्याला सिव्हिल लाइन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उमेश अटाळकर हा सतत मारेकरी नंदू आणि त्याच्या मित्रांना मारहाण करीत असायचा, यातून हे हत्याकांड घडल असल्याचे सूत्रांची माहिती आहे. पण तरीही हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मारकऱ्यांमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग होताय, हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही. सध्या नंदू बागडे  त्याने हत्या केल्याचे स्पष्ट केले आहे,पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याच्या साथीदारांचा पोलीस सध्या शोध घेताहेत. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सिविल लाईन चे पोलीस निरीक्षक भानुप्रसाद मडावी यांनी सांगितले पुढील तपास सिविल लाईन पोलीस स्टेशन करीत आहे,

=========================================

तेल्हारातालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत युवकाची थेट २७० कि.मी सायकल यात्रा.



तेल्हारा चार वर्षापासून तेल्हारा तालुक्यातील रखडलेल्या रस्त्यांच्या पूर्णत्वाकडे दुर्लक्ष करीत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी रस्ते पूर्ण होऊ दिले नाही. परिणामी हे रस्ते पूर्णत्वाकडे नेण्यात यावे यासाठी तालुक्यातील युवकाने थेट तेल्हारा ते नागपूर अशी सायकल यात्रा काढून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे या रस्त्यासाठी साकडे घालणार असल्याचा निर्धार केला असून दि. २७ मे २०२२ च्या सकाळपासून विशाल नांदोकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तेल्हारा ते नागपूर सायकल यात्रेला प्रारंभ केला. 

आज रोजी  ते सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान अमरावती येथून नागपूर कडे रवाना झाले. त्यांची ही यात्रा स्थानिक लोकप्रतिनिधी च्या विरोधात सोबतच तालुक्याच्या विकासासाठी ही आहे, हे विशेष.

तेल्हारा तालुक्यातील रखडलेल्या रस्त्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेल्या चार ते पाच वर्षात कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका न घेतल्यामुळे या तालुक्यातील रस्ते नागरिकांच्या जीवावर उठल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागावा याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी वर विश्वास न ठेवता आता थेट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न सोडवावा या करिता विशाल नांदोकार यांनी तेल्हारा ते नागपूर सायकल द्वारे जाण्याचा ठोस निर्णय घेतला.

यावेळी विशाल चे वडील, पत्नी, भाऊ सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. तालुक्यातील रस्त्यांबाबत २३ मार्च २०२१ पासून विशाल नंदोकार यांनी सरकार सोबत पत्रव्यवहार करून २०२१ पासून स्थानिक सार्वजनिक बांधकाम कार्यालय यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण केले, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्त्याला व स्थानिक जनतेला तीन दिवसात काम सुरू करू असे आश्वासन दिले. परंतु अद्यापपर्यंत रस्त्याच्या कामाला कोणत्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही. त्यानंतर ०१ जानेवारी ते ०७ जानेवारीला नंदोकार परत बेमुदत उपोषणाला बसले या उपोषणाची सांगता बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आश्वासन देऊन केले. परंतु आत्तापर्यंत दिलेले सगळे आश्वासन खोटेच.काझी मेहंदि हसन हातरूण

==========================================

बाळापूर बसस्थानकात cctv कॅमेरे बसविण्याची शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने मागणी

  बाळापूर - आज शिवसेनेच्या वतीने बाळापूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक न प बाळापूर यांना निवेदन देण्यात आले मागील काळात एस . टी . कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे , बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी नव्हती . त्याकाळात काही लोकांनी बस स्थानक परिसर हे दारु पिण्याचा अड्डा बनवुन टाकला आहे . बसस्थानकावर पिण्याच्या झोपण्याचे सुध्दा प्रकार दारुड्यांकडून सुरु झाले आहेत . यामुळे आता प्रवास करणाऱ्या महिला , मुली तसेच वृध्दांना याचा त्रास सहन करावा लागत आहे . बसस्थानकातील बसण्याच्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी हि दारुडे मंडळी सर्रास दिवसा झोपा काढतात याचे फोटो सह पुरावे देण्यात आले . यामुळे महिला व मुली बस स्थानकात बसण्याची हिंम्मत करत नाहीत पर्यायाने त्यांना उन्हा तान्हात उभे राहून ताटकळत बसची प्रतिक्षा करावी लागते . दारुड्यांकडे दारू पिण्यासाठी पैसे नसले की , बाहेरगांवच्या थांबलेल्या प्रवाशांकडून जबरदस्तीने धाकदपट करुन पैसे उकळण्याचा प्रकार मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला आहेचं , शिवाय महिलांच्या दागिन्यांवर हात टाकण्याचे दोन - तिन प्रकार सुध्दा घडलेले आहेत . घडलेला प्रकार हा बाहेरगांवच्या महिला वा प्रवाशांसोबत झाल्यामुळे ते वेळेच्या अभावी पोलीस तक्रार देऊ शकत नाहीत . त्यामुळे या दारुड्यांवर कोणतीच पोलीस कारवाई न झाल्यामुळे यांचे दिवसेंदिवस त्यांचे मनोबल वाढत चालले आहे . या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी बस स्थानकात सि.सी.टी.व्ही कॅमेरे व खाजगी सुरुक्षा रक्षकाची नितांत गरज आहे . करीता उपरोक्त प्रकरणाची आपण गंभिरतेने दखल घेऊन , संबंधीत विभागामार्फत या ठिकाणी तात्काळ सि.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात यावे ची मागणी चे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले

यावेळी करणसिंह ठाकूर माजी न प उपध्यक्ष,शहरप्रमुख आनंद बनचरे,युवासेना शहरप्रमुख श्याम बहुरूपे, राजुसिंह चव्हाण,भूषण गुजराथी,धरमसिंह ठाकूर,दिल्लू ठाकूर अनिल धानोकर,गणेश मुळे, ऋषिकेश लांडे,सत्यम जोध,अजयसिंह ठाकूर,शुभम सोनोने,प्रकाश मालोकर,उत्तमराव इंगळे,आदी शिवसैनिक उपस्थित होते - श्याम बहुरूपे(तालुका प्रतिनिधी)

===================================

महानगरात आर्ट ऑफ लिविंगच्या भव्य संगीत संध्येचा भक्तिमय जल्लोष  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सचिन लिमये यांची संगीतमय कॉन्सर्ट

अकोला- प.पु.श्री श्री रविशंकरजी प्रणित आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने गुरुदेवांच्या जन्म उत्सव पर्वावर रविवारी स्थानीय डॉ आंबेडकर खुले नाट्य गृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक सचिन लिमये यांची भव्य संगीत संध्या अर्थात सुमेरू  संध्या मोठया भक्तीभावात संपन्न झाली.या संगीत संध्येत सचिन लिमये यांनी श्रीमन नारायण नारायण हरी हरी सारखे  भक्तीगीत सादर करीत उपस्थितांना डुलाव्ययास लावले.या आगळ्यावेगळ्या भक्तिमय संगीत संध्येस नागरिकांनी एकच गर्दी केली होती.कार्यक्रमाचा प्रारंभ गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या स्मरणाने करण्यात आला.यावेळी आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे हरीश लाखानी व चमूने गायक लिमये व उपस्थित संगीत चमुचे स्वागत केले.या संगीतमय संध्येत लिमये यांनी एकाहुन एक सरस असे आधुनिक साजसज्जेचे भक्तीगीते व भजने सादर करीत वातावरण जल्लोषमय केले.उपस्थितांनी भजनावर उभे राहून दाद दिली.सोहळ्याचे संचालन एड कांचन शिंदे यांनी तर आभार कपिल ठक्कर यांनी मानलेत.सफलतेसाठी

 डिस्ट्रिक्ट डेवलोपमेण्ट कमिटी सदस्य जगन्नाथ कराळे,अरुण देशमुख,पुरुषोत्तम पसारी, हरीश लाखानी,श्रीकांत पडगीलवार, महेंद्र खेतान, दीपक मायी,डॉ सुनील थावराणी,सुरेश माहेश्वरी, जसवंत कावना,कपिल ठक्कर व शिक्षकगण कैलाश अग्रवाल, रामकृष्ण दालमिया,संजय शेळके,प्रशांत साबळे, सुधीर इंगळे,प्रवीण शिंदे,दिनेश मुरझानी, ज्ञानेश्वर कपले,संतोष मारशेट्टीवार,अंबादास सिंघनिया,अर्चना मारशेट्टीवार,निलेश चौधरी,श्रीकांत पाटील दिने, आशिष डोडिया,दीपक वोरा,डॉ संकेत अग्रवाल,एड कांचन शिंदे,अक्षय जोशी,डॉ निराली अग्रवाल,श्वेता मुरझानी,सुनीता तिवारी,आरती देशपांडे,दर्शन खंडेलवाल,राम घायाळकर समवेत आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

===================================

अक्षरभूमी शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप      

   

अकोला नवीन शैक्षणिक सत्र 1 जुलैपासून  सुरु होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून... गायत्री परिवार , निर्भय बनो जनआंदोलन, सेवाश्री बहुद्देशीय संस्था, खडकी, मलकापूर अकोला  यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा या गावाच्या बाजूला पारधी बेडावर चालत असलेल्या पारधी समाजाच्या मुलांसाठी, झेप संस्थेच्यावतीने अक्षरभूमी शाळा दोन युवकांनी निस्वार्थपणे मोफत शिक्षण देने चालू केली आहे .त्यामध्ये साहेबराव राठोड, मंगेश पवार हे दोन्ही युवक मेहनत घेऊन या लहान मुलांना शिकवण्याचे काम सातत्याने तीन वर्षापासून करीत आहेत. ज्या ठिकाणी शासकीय शिक्षण पोहोचले नाही ,अशा या दुर्गम भागात या युवकांनी त्या लहान मुलांना शिक्षण देण्याचे काम सातत्याने चालू ठेवले आहे. त्यांना सहकार्य व्हावे व लाहान मुले शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी यावे ,त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून अकोला मलकापूर येथील गायत्री परिवार, सेवाश्री बहुउद्देशीय संस्था खडकी, निर्भयबनो जन आंदोलनाच्या वतीने या मुलांसाठी या शाळेला नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले यावेळी संस्थेचे गजानन हरणे, मधुकर वाकोडकर, प्रमोद धर्माळे, , मंगल ठाकरे यांनी त्यांना हे शैक्षणिक साहित्य  मोफत देऊन मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षणा विषयी आवड निर्माण करण्यासाठी या दोन्ही शिक्षकांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांनी संस्थेचे आभार व्यक्त केले. 

====================================

माहेश्वरी समाजाची महेश नवमी उत्सव बुधवार पासून होणार प्रारम्भ ८ दिवस अनेक रंगारंग उपक्रमांची राहणार रेलचेल, श्री राज राजेश्वर मंदिर पासून निघणार भव्य शोभायात्रा

अकोला माहेश्वरी समाजाचा उत्पत्ति दिवस पावन महेश नवमी दिनांक ८ जून रोजी सकल माहेश्वरी समाज साजरी करीत असतो या अनुषंगाने माहेश्वरी समाज ट्रस्ट व संलग्न संस्थांच्या वतीने महेश नवमी उत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये अनेक रंगारंग उपक्रमांची रेलचेल राहणार असल्याची माहिती माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली स्थानीय माहेश्वरी भवनात संप्पन झालेल्या या पत्रकार परिषदेत माहेश्वरी समाज ट्रस्ट चे अध्यक्ष विजय पनपातिया, प्रधानमंत्री विजयकुमार राठी, महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमा खटोड, सचिव वंदना हेडा, उत्सव प्रमुख मारद चाडक आदी पदाधिकारी उपस्थित होत

बुधवार दि १ जून पासून उत्सवाचा प्रारंभ होणार असून यदिनी सकाळी ९ वाजता माहेश्वरी भवनात भगवान महेश याच्या झाकी ची विधिवत स्थापना करण्यात येणार असून सकाळ व संध्याकाळी संगीतमय आरती होणार आहे याच दिनी सकाळी ९.३० वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात फळ व मिष्ठान्न वितरित करण्यात येणार आहे. संध्याकाळी ५.०० वाजता माहेश्वरी प्रगती मंडळ च्या वतीने जुन्या आर टी ओ रस्त्यावरील महेश भवन येथे युवक युवतींचा रंगारंग उड़ान हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. से जन शुक्रवार दिनांक ३ जून रोजी सकाळी ९.३० वाजता सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना फळ व मिष्ठान्न वितरित करण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता माहेश्वरी भवन येथे वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठ च्या वतीने चर्चा सत्र होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शनिवार ४ जून रोजी सकाळी ९.३० वाजता माहेश्वरी भवन येथे वर्ग ८ ते १२ वी च्या विद्यार्थ्यां साठी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे सायंकाळी ५.०० वाजता मित्र समाज क्लब येथे दोन दिवसीय भव्य बॅडमिंटन स्पर्धा घेतल्या जाणार आहे. सायंकाळी १६.३० वाजाता जुन्या शहरातील शंकरलाल खंडेलवाल कॉलेज येथे प्रसिद्ध जीवन प्रेरक अहमदाबाद येथील विक्की डी पारेख यांचा रोश्तो की डोर हा जीवन मार्गदर्शन कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रविवारी सकाळी ६.०० वाजता समाजाची भव्य मॅरेथॉन स्पर्धा स्थानीय माहेश्वरी भवन येथून सुरु होणार आहे. पाच दिवशी सकाळी ७.०० वाजता महाआरोग्य शिबीर होणार असून या शिबिरात विविध आजारांचे तज्ञ समाज बांधवांची आरोग्य तपासणी करणार आहेत. तसेच या उपक्रमात माहेश्वरी प्रगती मंडळ च्या वतीने रक्तदान शिबीर होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता माहेश्वरी महिला मंडळ च्या वतीने कण कण मे है भगवान ही सांस्कृतिक झांकी साकार करण्यात येणार आहे. सोमवार ६ जून रोजी सकाळी ८.०० वाजता माहेश्वरी प्रगती मंडळ च्या वतीने चैस, करम, स्लो सायकल आदी विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. याच दिनी सकाळी ११.३० वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रमोद सोहनलाल चांडक यांच्या वतीने भोजन वितरित करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता नवयुवती मंडळ च्या वतीने मुंबई येथील प्रसिद्ध प्रशीक्षक निशा चांडक यांचा डिजाईन युअर डेथ हा जीवनाला कलाटणी देणारा चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठच्या वतीने समाजातील कमी होत असलेल्या लोकसंखेला जबाबदार कोण या विषयावर वाद विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंगलवार ७ जून रोजी दुपारी ४.०० वाजता ब्रजलाल बियाणी शिक्षण समिती अमरावती चे  अध्यक्ष अशोक राठी यांच्या हस्ते तसेच समाजसेवी विनोद तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत नर्सरी ते पदवीत्तर पर्यंत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.

मुख्य महेश नवमी सोहळा बुधवार ८ जून रोजी होणार असून या दिनी सकाळी ९.३० वाजता प्रमुख पाहुणे अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभे चे कोषाध्यक्ष मुंबई येथील सीए आर एल काबरा यांच्या हस्ते माहेश्वरी समाज ट्रस्ट च्या वेबसाईट चे लोकार्पण करण्यात येणार असून व्यापार काल, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४.०० वाजता राज राजेश्वर मंदिर येथून भगवान महेश यांची विविध देखावे व झांकी समवेत शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा जय हिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, ब्रजलाल बियाणी चौक, जुना कापड बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, महानगरपालिका चौक, तहसील मार्गे श्रीमती ल. रा. तो. माहेश्वरी भवन येथे पोहचून या शोभायात्रेचे नवमी उत्सवात रूपांतर होणार आहे. समाज ट्रस्ट चे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेत होणान्या या नवमी सोहळ्यात प्रमुख पाहुणे रामेश्वरलाल काबरा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत. नवमी उत्सवाचे समापन माहेश्वरी प्रगती मंडळ च्या वतीने आयोजित दोन दिवसीय बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या संपूर्ण महेश नवमी उपक्रमांचे यजमान श्रीकांत श्रीविष्णू तोष्णीवाल, सुनील इन्नाणी, डॉ. नरेंद्रकुमार संतोष हेडा, नरेंद्र शैलेश भाला, जगदीश मुकुंद राठी, प्रकाश आदित्य भैय्या, राहुल नकुल राठी, विजय संजय हेडा, गोविंद शंकरलाल बजाज, आनंद मोहमलाल चांडक, प्रमोद माणिकचंद मालपाणी, संतोष शंकरलाल राठी, एड. सतीश मनीष भुतडा, प्रमोद अंकित काचोलीया आदी मान्यवर राहणार असून या आठ दिवसाच्या महोत्सवाच्या उपक्रमांचा समाजातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव प्रमुख शरद चांडक यांनी यावेळी केले. महोत्सवाच्या सफलतेसाठी माहेश्वरी समाज ट्रस्ट चे उपाध्यक्ष शांतीलाल भाला, सुधीर रांदड, सहसचिव विनीत बियाणी, कोषाध्यक्ष आशिष पनपालीया, अंकेक्षक अनिल लटूरीया, विजयकुमार तोष्णीवाल, राजेश लोहिया, अनिल राठी, नरेश बियाणी, द्वारकादास चांडक, पुरुषोत्तम खटोड, मनीष लड्ढा, नंदकिशोर बाहेती, प्रा-डॉ. रमण हेडा, प्रवीण हेडा, मनोज चांडक, राजेश सोमाणी, शैलेश तोष्णीवाल, राजेश भन्साळी, एड. विशाल लढा, प्रमोद लटूरीया, महेश मुंदडा, दीपक राठी, प्रदीप राठी तसेच माहेश्वरी प्रगती मंडळचे अध्यक्ष सागर लोहिया, नवयुवती मंडळ च्या अध्यक्ष श्रध्दा धूत, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ चे अध्यक्ष भगवानदास तोष्णीवाल, महिला प्रकोष्ठ च्या अध्यक्ष शारदा मंत्री आदी परिश्रम घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

====================================

उद्योजकता विकास प्रशिक्षण;अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता एक महिण्याचे प्रशिक्षण

अकोला,दि.30(जिमाका)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतीकरिता निशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण दि. 6 जून ते 5 जुलै 2022 या कालावधीत होणार असून प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रवेश अर्ज बुधवार दि. 1 जून पर्यंत करावा. प्रत्यक्ष मुलाखत सोमवार दि. 4 जून  रोजी होईल, अशी माहिती एमसीईडीचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी दिली.

 अनुसूचित जातीच्या युवक-युवती नवउद्योजकांना उद्योजकता विकास  संबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:चा उद्योग व्यवसाय-स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा उद्देश आहे. निवासी स्वरूपाच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंबधी माहिती, उद्योगाची निवड, उद्योग उभारणी, व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन निगडीत कायदे व अंमलबजावणी कार्यपद्धती, उद्योग आधार नोंदणी, शासकीय विविध कर्ज योजना, सोयी सवलती आणि कार्यप्रणाली, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनाच्या किंमती, हिशोब पद्धती, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योजकांचे अनुभव कथन, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, डिजिटल मार्केटिंग तसेच उद्योगाचे वित्तीय व्यवस्थापण इत्यादी विषयी तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत  माग्दर्शन केले जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी प्राप्‍त झालेले अर्जानुसार प्रशिक्षणार्थ्यांना शुक्रवार दि. 3 जून रोजी प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात येईल. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील आठवी पास असलेले व बार्टी स्थापित युवा गटातील लाभार्थ्यांस प्राधान्य दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीतून शनिवार दि. 4 जून रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, भुविकास बँक एस.पी ऑफीसच्या बाजूला, अकोला येथे निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासंबधी अधिक माहितीकरीता कार्यक्रम आयोजिता कविता शिरसाट(मो.न.8600807001), प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे

=========================================.

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांना मुर्तिजापूर येथून प्रारंभ ;माय-माऊलीच्या वेदना दूर करण्यासाठीच आरोग्य सेवा-पालकमंत्री बच्चू कडू

अकोला,दि.30(जिमाका)- शासनाच्या विविध योजना आणि शासकीय आरोग्य यंत्रणेचा प्रभावी वापर करुन अकोला जिल्ह्यात महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा आजपासून प्रारंभ होत आहे. गरिबीतही स्वाभिमानाने आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या या माय-माऊलीच्या वेदना दूर करण्यासाठीच ही आरोग्य सेवा आहे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनाचे (दि.31 मे) औचित्य साधुन महिलांची निःशुल्क आरोग्य तपासणी व उपचार हा  उपक्रम जिल्ह्यात आजपासून सुरु करण्यात आला. मुर्तिजापूर येथून या उपक्रमाची जिल्ह्यात सुरुवात झाली. या आरोग्य तपासणी शिबिरास महिलांना गावांतून आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक तपासणी करुन तालुकास्तरावरील उपजिल्हा रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. येथे त्यांची सर्व तज्ज्ञांमार्फत तपासणी, निदान व अनुषंगिक उपचार करण्यात येत आहेत. या शिबिरात स्त्रियांचे विविध आजार, कर्करोग, रक्ताचे विकार, त्वचा विकार, किडनीचे आजार, हाडांचे विकार, दातांचे विकार या सह विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास जिल्हास्तर वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयस्तवरही आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील. येथेही उपचार शक्य नसल्यास मुंबई वा अन्य मोठ्या शहरात नेऊन मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचे उद्घाटन मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या कार्यक्रमास पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासह आ. हरिष पिंपळे,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमती तरंगतुषार वारे, सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

शिबिराच्या उद्घाटनास पालकमंत्री कडू यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री कडू यांनी विभागनिहाय जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यांच्या तपासणी व उपचार सुविधांची माहिती घेतली. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या सर्व महिलांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिली.

आपल्या संबोधनात पालकमंत्री म्हणाले की, या आरोग्य तपासणीत काही आजार असल्याचे निदान झाल्यास त्यावर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येईल. सर्व महिलांचे आरोग्य उत्तम असावे या हेतूने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येईल. त्यातून महिलांच्या आरोग्याची तपासणी होत राहिल. निव्वळ पैशांअभावी दुखणं अंगावर काढत महिला वेदना सहन करत आपलं आयुष्य जगत राहतात.  याच वेदना दूर करण्यासाठी हा आरोग्य सेवेचा उपक्रम आहे.

या आयोजनासाठी झटणाऱ्या आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी, आशा सेविका या साऱ्यांचे पालकमंत्री कडू यांनी कौतूक केले.

===================================

 कृषी विद्यापीठामध्ये खरीप पूर्व कृषी मेळावा संपन्न बियाणे खरेदीसाठी शेतकरी बांधवांचा उदंड प्रतिसाद



अकोला  पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत होती, आज  व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबतांना पूर्वीचीच एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून शाश्वत शेतीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांची निवड, पिकांची फेरपालट,  शेण, गोमूत्र, दुधासह शेतकामासाठी पशुधन आणि परिवारातील सदस्यांचे योगदान काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. विस्तार शिक्षण संचालनालय द्वारे आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळाव्याचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 
विदर्भात बहुतांश भागात सिंचनाची अल्प क्षमता असून कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेतील घट, पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतून पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची  जेमतेम उपलब्धता आदींचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असून मागील पन्नास वर्षांचा सरासरी पर्जन्यमानाचा आढावा घेता पाऊसमान कमी झाले नसल्याचे सांगतानाच  पाऊस पडण्याच्या तीव्रतेमध्ये आणि दिवसमानांमध्ये फरक झाला आहे  अशा परिस्थितीमध्ये कपाशी व सोयाबीन पिकासोबत योग्य आंतरपीकाची लागवड करून पावसाच्या लहरीपण मुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य असल्याचे डॉ. भाले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सोयाबीन पिकाची लागवड पट्टा पद्धतीने करणे तसेच कापूस पिकामध्ये तूर सोयाबीन उडीद मूग यासारख्या आंतरपीकांची लागवड करणे कालसुसंगत ठरते असे देखील डॉ. भाले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात सांगितले.
याप्रसंगी डॉ. डी.  बी.  उंदीरवाडे संचालक विस्तार शिक्षण,  डॉ. व्हि के खर्चे संचालक संशोधन,  डॉ. वाय. बी. तायडे अधिष्ठाता (कृषी),  डॉ. एस बी वडतकर अधिष्ठाता (कृषी अभियांत्रिकी) अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, प्रगतिशील शेतकरी श्री श्रीकृष्ण ठोंबरे (जि. अकोला ) तसेच श्री विजयजी दीपके  (खामगाव जिल्हा बुलढाणा) हे  व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी बी उंदिरवाडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या  पिकांसंबंधीच्या समस्यांवर सांगोपांग चर्चा होऊन निराकरण होत असल्याचे म्हटले. कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी शेतकऱ्यांकरिता ग्रामगीता असल्याचे सांगून विद्यापीठाच्या या प्रकाशनामध्ये  सर्व पिकांच्या लागवड तंत्राविषयीची अद्यायावत माहिती प्रकाशित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या विविध पिकांवरील किडी व रोगांचे आक्रमण लक्षात घेता शेतकऱ्यांनी सावध राहायला हवे. त्याचप्रमाणे वेळीच शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. उंदीरवाडे यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी तसेच सोयाबीन मूग उडीद तूर व मका पिकावरील किडी-रोगांच्या सम्बन्धी विस्तृत मार्गदर्शन करून येणाऱ्या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांनी एकत्रितपणे व्यवस्थापनत्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.प्रगतिशील शेतकरी श्री श्रीकृष्ण ठोंबरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महाबीज चे बियाणे उत्कृष्ट प्रतीचे असल्याचे नमूद करून आपण स्वतः विद्यापीठ निर्मित बीज वाणांचा नियमित वापर करत असल्याचे सांगितले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आमच्या करिता गुरुकिल्ली चे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुग्ध व्यवसायच्या विकासासाठी  शासकीय दुग्ध खरेदी केंद्रांचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. श्री विजय दटके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या ज्ञानाची भूक शमवीण्याकरिता विद्यापीठाकडे आधुनिक कृषी तंत्राची  भक्कम शिदोरी उपलब्ध असल्याचे नमूद करून रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवर पिकांना सेंद्रिय खत देणे हा एक उत्तम तोडगा असल्याचे म्हटले. यावेळी शेतीमध्ये ते प्रयोग करीत असलेल्या काही स्वनिर्मिती कृषी तंत्रांचा त्यांनी ऊहापोह केला.
तांत्रिक सत्रामध्ये कृषी विद्यापीठातील डॉ करुणाकर यांनी 'हवामानाचा आढावा व या वर्षीच्या मान्सून चा अंदाज' याविषयी डॉ डी बी उंदिरवाडे यांनी 'कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व रसशोषक किडींचे व्यवस्थापन' या विषयावर तर डॉ. सतीश निचळ यांनी 'सोयाबीनचे लागवड तंत्र' या विषयांवर तांत्रिक सादरीकरण केले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन शंकानिरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार कृषी विद्यावेत्ता श्री प्रकाश घाटोळ यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील सर्वाचं विभागांचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ विभागप्रमुख अधिकारी आणि संपूर्ण विदर्भातून आलेले शेतकरी बांधव सभागृहामध्ये उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आणि अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी शेतकरी बांधवांनी विद्यापीठ संशोधित नवीन पीक वाण बियाणे खरेदीसाठी  अभूतपूर्व प्रतिसाद देत विद्यापीठा वरील आपला विश्वास अधोरेखित केला.

=====================================
विशेष पथकाची जुगार खेळणाऱ्यावर  धाड. 



  अकोला  30 रोजी  पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार कडुन खात्रीलायक बातमी मिळाली कि  अय्याज याच्या घरा समोर  पैश्याच्या हारजीत वर वरली मटका जुगार  खेळत आहे अश्या खात्री लायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहाणी करून रेड केली असता तेथे अय्याज खान छोटे खान वय 26 रा. खोकेवाली चाल सिंधी कॅम्प अकोला हा मिळून आले. त्याच्याकडे वरली मटका साहित्य,एक मो. फोन 10,000रु ,नगदी 830 रु.असा  मुद्देमाल मिळून आला ..त्यांचे हे कृत्य महा. जु. का.अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन खदान येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
           *सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक .. जी श्रीधर साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास पाटील साहेब यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.
================================
वाहनाचे सायलेन्सर बिनापरवांगीने बदलवुन फटाके फोडणा-या बुलेट वाहनावर शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे केली कायदेशीर कार्यवाही

अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणा-या भागात काही खोडकर वाहन चालकांनी मुख्यतः बुलेट वाहनात विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसवुन फटाके फोडण्याचे प्रकार अकोला शहरात वाढले आहे. ज्यामुळे अशा वाहनाव्दारे रस्त्यावर चालनारे वाहन चालक तसेच महीलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक तक्रारी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी आज दि 30/05/2022 रोजी सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विषेश मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन 06 वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
सायलेन्सरव्दारे फटाके फोडणारे बुलेट वाहन तसेच इतर वाहने ज्यामध्ये कर्णकरकश आवाज करणारे अवैध साहीत्य लावुन शहरातील नागरिकांना त्रास देणा-या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करणेकरीता सदरची  मोहीम अकोला शहरात सतत राबविण्यात येणार आहे. 
करीता अकोला शहरातील सर्व वाहन चालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकश आवाज करणारे हाॅर्न लावण्यात आलेले आहे अशा वाहन चालकांना पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन आवाहन करण्यात येते की अशा वाहनांचे सायलेन्सर व हाॅर्न शासन नियमांनुसारच लावावे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने