संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे पातुर शहरातील मार्ग बदलनार

 संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे पातुर शहरातील मार्ग बदलनार

 पातु - नवीन मार्ग हा हायवे बाळापुर रोड संभाजी चौक, मिलिंद चौक, ते जुने बस स्थानक पोलीस स्टेशन चौक या मार्गाने राहिलं पातूर शहरातील व तालुक्यातील भाविकांना दर्शनाकरिता परंपरा गत पंचायत समिती प्रांगणात संत गजानन महाराजांचा विसावा हा दिनांक 11/06/2022 रोजी नेहमी प्रमाणे राहील  परंतु गेल्या 50 ते 55 वर्षाचे स्वागत पातुर शहरवासीयांना आता जुन्या मार्गाने न करता बाळापुर हायवे बाळापूर नाका ते संभाजी चौक पोलीस स्टेशन चौक या नवीन मार्गाने राहील व विसावा हा पंचायत समिती येथे पूर्वीप्रमाणे राहील  शेगाव संस्थान संत गजानन महाराज पालखी प्रमुखांचे पातूर शहरातील सर्व तरीय संघटनांची चर्चा करण्याकरिता यावेळी पातुर पंचक्रोशीतील संत सिदाजी महाराज पंचमंडळ, तसेच संभाजी ग्रुप प्रस्थान चे पदाधिकारी, संत सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे पदाधिकारी, महात्मा फुले भाजी मार्केटचे पदाधिकारी,  तपे हनुमान व्यायाम शाळा, खडकेश्वर संस्थान, जय बजरंग फ्रेंड्स क्लब, हिंदू सेना व्यायाम शाळा, गुरुवार पेठ जय भवानी मित्र मंडळ , पातुर तालुका विकास मंच, माळी युवक संघटना पातुर, शिवसेना गटनेते व कार्यकर्त्यांन सह सामाजिक संघटना, पिंपळेश्वर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या नवीन मार्गाचा निर्णय घेण्यात आला

किरण कुमार निमकंडे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा न्यूज पातुर

===================================

डाबकी, भौरद ते निमकर्दा, निमकर्दा ते शेगांव रोडचे काम त्वरीत पूर्ण करा स्लग - गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

अकोला - डाबकी, भौरद ते निमकर्दा, निमकर्दा ते शेगांव रोडचे काम त्वरीत पूर्ण करा अशी मागणी निवेदनाद्वारे गावकऱ्यांच्या वतीने अमित तुकाराम मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.  डाबकी भौरद ते निमकर्दा, निमकर्दा ते शेगांव राडचे काम निर्माणाधीन आहे. जवळपास चार ते पाच वर्षांपासून काम निर्माणाधीन आहे. परंतु आजपावेतो या रोडचे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते. या रोडचे काम एवढ्या संथगतीने सुरु असून जागोजागी रोड खोदून ठेवलेला आहे. रोवर गिट्टी मुरुम टाकून पडलेली आहे व याच कारणामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. यामुळे गावऱ्यांना श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आजपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात घडून गंभीर दुखापती सुद्धा झालेल्या आहेत. याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदनाद्वारे रस्ता त्वरीत पूर्ण करण्याची मागणी केलेली आहे. परंतु प्रशासनाने ग्रामीण जनतेच्या मागणीची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. या मार्गावर संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला प्रस्थान करण्याकरिता जाणार आहे. तसेच दर गुरुवारी व एकादशीला मोठ्या प्रमाणावर भावीक भक्त संत नगरी शेगांवीला जाण्याकरिता याच रस्त्याचा उपयोग करित असल्यामुळे श्री भक्तांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत आहे. या श्री भक्तांची व ग्रामीण भागातील जनतेच्या मागणीची त्वरीत दखल घेवून कामाला गती देवून श्रींची पालखी येण्या अगोदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती माहिती व उचित कार्यवाहीकरिता अकोल्याचे पालकमंत्री ना. बच्चुभाऊ कडू, आयुक्त अकोला मनपा व अधीक्षक अभियंता सा. बां. विभाग, अकोला यांना अग्रेषित करण्यात आल्या आहेत.

===================================

खऱ्या गरजवंत रुग्णालाच  अगदी अल्पशा मोबदल्यात रक्त मिळावे हाच मुख्य उद्देश ---सुनील दुर्गे  


 101 रक्तथैली जमा करून स्टेट बँक ऑफ इंडिया च्या   स्टाफ फेडरेशन युनियनने साजरा केला अमृत महोत्सव

 अकोला --  रक्तदान हे सर्वश्रेष्ठ  दान असून  अनेक प्राण हे रक्त उपलब्ध न झाल्याने   गमवावे लागले आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत केवळ रक्त उपलब्ध झाले नाही म्हणून कुणाचाही प्राण जाऊ नये त्यातही सर्वसामान्य लोकांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठीच  युनियन च्या अमृत महोत्सव निमित्ताने  रक्तदान शिबीर आयोजित केले असून  याचा मुख्य उद्देश आहे की, खऱ्या गरजवंत रुग्णालाच  अगदी अल्पशा मोबदल्यात रक्त  मिळावे हाच असून जिल्हा  सर्वोपचार रुग्णालयात सर्वसामान्य लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युनियन चे अमरावती  विभागाचे जनरल सेक्रेटरी सुनील दुर्गे यांनी व्यक्त केले   स्टेट बँक ऑफ इंडिया च्या   स्टाफ फेडरेशन युनियनला यावर्षी 75  वर्षे पूर्ण झाली आहेत याची कायम आठवण राहावी म्हणून  लोक कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यातील एक भाग म्हणून आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या   टॉवर चौकात असलेल्या मुख्य शाखेत  स्टाफ फेडरेशन युनियनने  101 रक्तदाते जमा करून 101 रक्तथैली जिल्हा सर्वोपचार  रुग्णालयात  जमा करून आपल्या युनियन चा अमृत महोत्सव साजरा केला सकाळी 9 वाजता पासून रक्तदान शिबीर प्रारंभ करून दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण 101 रक्तदात्यांकडून रक्तथैली गोळा केल्या आहेत  अकोला  जिल्ह्यातील रक्त संकलनाला यंदाच्या तीव्र उन्हाळ्याचा फटका बसला असून, रक्त संकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी रक्ताच्या शोधात रुग्ण आणि नातेवाइकांची भटकंती वाढली आहे. सवीपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीकडे दैनंदिन सरासरी ४० ते ५० युनिट रक्ताची मागणी असते. मात्र मागणीच्या तुलनेत संकलन कमी असल्याने अनेक गरजू रुग्णांना रक्ताची प्रतीक्षा करावी लागत आहे. हीच बाब हेरून आणि खाजगी रक्तपेढी मध्ये सर्वसामान्य रुग्णांना हेलपाटे घ्यावे लागते तरीही वेळेवर रक्तथैली  देणे शक्य होत नाही त्यावर उपाय म्हणून आणि आपले ही सामाजिक देणं लागते म्हणून  स्टेट बँक ऑफ इंडीया स्टाफ फेडरेशन चा अमृत महोत्सव अकोला रिजन तर्फे रक्तदान करून साजरा करण्यात आला कॉब्रेड  सुनिल दुर्गे (DGS),कॉब्रेड  राजेंद्र गावंडे,कॉब्रेड.भावेश यादव ,,कॉब्रेड अनिल वानखेडे , तसेच  कॉब्रेड अमोल काटे, कॉब्रेड नितीन दंडले  कॉब्रेड मोहन कुरवाले,कॉब्रेड. अक्षय इंगळे*( ARS, वाशिम)सह  स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेत  रिजनल मॅनेजर मंजूषा जोशी व अधिकारी सर्वश्री गौरव जामदार , मुकेश कदम,  हर्षद दामोदर, प्रशांत गवई,स्टाफ यूनियन के अंडर सेक्रेटरी राजेंद्र गावंडे ,अन्य पदाधिकारी सर्वश्री भावेश यादव  रूपेश पत्ती,अमोल काटे, नितीन दादंळे, अक्षय इंगळे, अभिजीत टाले, अनिल वानखडे,राहुल रायबोले,  संजय शिरसाट, रूपेश चोपडे, , अमित गोसावी,  सचिन सपकाळ,  अनूप टापरे, सुरेश बढ़े,उमेश कळणे,नंदकिशोर हेडाऊ, संतोष सोनोने,  निलेश राऊत, पंकज बहादुरे, अमोल झांबरे, उमाकांत शिरसाट,  चंद्रप्रकाश शिरसाट, संदीप वाघ,  आदि कर्मचारी उपस्थितीत आणि प्रयत्नांनी ।डॉ शीतल  थोरात,डॉ  स्नेहल टाले ,डॉ  प्रणय वाकोडे ,मंगेश तुळे,डॉ मानसी भोसले,शुभांगी शेंगोकार,रूपेश तायडे,संतोष सिरसाट यांच्या सहकार्याने 101 रक्त  थैली गोळा करणे शक्य झाले असून यामुळे सर्वसामान्य गरजवंत रुग्णाला  वेळी च रक्त पुरवठा करणे सोपे होईल याचे समाधान  स्टेट बँक ऑफ इंडिया च्या   स्टाफ फेडरेशन युनियनचे पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केले आहे जमा करून स्टेट बँक ऑफ इंडिया च्या   स्टाफ फेडरेशन युनियनने साजरा केला अमृत महोत्सव स्टेट  बँक ऑफ इंडिया च्या   स्टाफ फेडरेशन  यामुळे सर्वसामान्य गरजवंत रुग्णाला  वेळी च रक्त पुरवठा करणे सोपे होईल याचे समाधान  स्टेट बँक ऑफ इंडिया च्या   स्टाफ फेडरेशन युनियनचे पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केले आहे

===================================

प.स पातूरच्या दोन  ग्रामसेवकांन वर निलंबिनाची टांगती तलवार काम चुकार पना आला अंगलट

ग्रामपंचायत मधील घरकुल व 15 वित्त आयोगाच्या संदर्भात अकोला जिल्हा परिषद येथे आढावा बैठकीत अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांचे सचिवांवर कारवाईचे आदेश

पातूर  पंचायत समिती अंतर्गत येनाऱ्या दोन ग्रामसेवक यांच्या वर कारवाई करण्यात आली असून सविस्तर माहिती असी आहे की  ग्रामसेवक  पातूर तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत सचिव उंडाळ व आघिखेड, चांन्नी,चतारी येतिल ग्रामपंचायत चा पदभार ग्रामपंचायत सचिव  पिपळकर हे पाहत होते परंतु शासनाच्या नियमानुसार 15 वित्त आयोगातील,व घरकुल संबंधित निधीचे नियोजन करणे आवश्यक होते त्या अनुषंगाने अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी अकोला जिल्ह्यातील  तालुकास्तरीय ग्रामपंचायत आढावा सभा सप्ताह सुरू असताना 27/05 /2022 रोजी बाळापुर पातुर तालुक्यातील ग्रामपंचायत सचिव यांचा ग्रामपंचायत मधील पूर्ण विषयांचा आढावा घेतला असता या दोन सचिवांच्या त्रुटी लक्षात घेता यांच्यावर कारवाईचे आदेश दिले या दोघां  सजीवांवर निलंबनाची टांगती तलवार लटकली असुन, निलंबन होईल की? काय कारवाई होईल याकडे सर्व ग्रामपंचायत सचिव ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे त्याचप्रमाणे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर तालुक्यातील सुद्धा काही सचिवांवर कार्यवाही करण्यात आली आहे

किरण कुमार निमकंडे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

=======================================

 "शाश्वत फायद्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब काळाची गरज"- डॉ. विलास भाले

अकोला कृषी विद्यापीठामध्ये खरीप पूर्व कृषी मेळावा संपन्न बियाणे खरेदीसाठी शेतकरी बांधवांचा उदंड प्रतिसाद पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत होती, आज  व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबतांना पूर्वीचीच एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून शाश्वत शेतीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांची निवड, पिकांची फेरपालट,  शेण, गोमूत्र, दुधासह शेतकामासाठी पशुधन आणि परिवारातील सदस्यांचे योगदान काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. विस्तार शिक्षण संचालनालय द्वारे आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळाव्याचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

विदर्भात बहुतांश भागात सिंचनाची अल्प क्षमता असून कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेतील घट, पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतून पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची  जेमतेम उपलब्धता आदींचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असून मागील पन्नास वर्षांचा सरासरी पर्जन्यमानाचा आढावा घेता पाऊसमान कमी झाले नसल्याचे सांगतानाच  पाऊस पडण्याच्या तीव्रतेमध्ये आणि दिवसमानांमध्ये फरक झाला आहे  अशा परिस्थितीमध्ये कपाशी व सोयाबीन पिकासोबत योग्य आंतरपीकाची लागवड करून पावसाच्या लहरीपण मुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य असल्याचे डॉ. भाले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सोयाबीन पिकाची लागवड पट्टा पद्धतीने करणे तसेच कापूस पिकामध्ये तूर सोयाबीन उडीद मूग यासारख्या आंतरपीकांची लागवड करणे कालसुसंगत ठरते असे देखील डॉ. भाले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात सांगितले.

याप्रसंगी डॉ. डी.  बी.  उंदीरवाडे संचालक विस्तार शिक्षण,  डॉ. व्हि के खर्चे संचालक संशोधन,  डॉ. वाय. बी. तायडे अधिष्ठाता (कृषी),  डॉ. एस बी वडतकर अधिष्ठाता (कृषी अभियांत्रिकी) अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, प्रगतिशील शेतकरी श्री श्रीकृष्ण ठोंबरे (जि. अकोला ) तसेच श्री विजयजी दीपके  (खामगाव जिल्हा बुलढाणा) हे  व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी बी उंदिरवाडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या  पिकांसंबंधीच्या समस्यांवर सांगोपांग चर्चा होऊन निराकरण होत असल्याचे म्हटले. कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी शेतकऱ्यांकरिता ग्रामगीता असल्याचे सांगून विद्यापीठाच्या या प्रकाशनामध्ये  सर्व पिकांच्या लागवड तंत्राविषयीची अद्यायावत माहिती प्रकाशित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या विविध पिकांवरील किडी व रोगांचे आक्रमण लक्षात घेता शेतकऱ्यांनी सावध राहायला हवे. त्याचप्रमाणे वेळीच शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. उंदीरवाडे यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी तसेच सोयाबीन मूग उडीद तूर व मका पिकावरील किडी-रोगांच्या सम्बन्धी विस्तृत मार्गदर्शन करून येणाऱ्या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांनी एकत्रितपणे व्यवस्थापनत्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.प्रगतिशील शेतकरी श्री श्रीकृष्ण ठोंबरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महाबीज चे बियाणे उत्कृष्ट प्रतीचे असल्याचे नमूद करून आपण स्वतः विद्यापीठ निर्मित बीज वाणांचा नियमित वापर करत असल्याचे सांगितले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आमच्या करिता गुरुकिल्ली चे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुग्ध व्यवसायच्या विकासासाठी  शासकीय दुग्ध खरेदी केंद्रांचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. श्री विजय दटके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या ज्ञानाची भूक शमवीण्याकरिता विद्यापीठाकडे आधुनिक कृषी तंत्राची  भक्कम शिदोरी उपलब्ध असल्याचे नमूद करून रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवर पिकांना सेंद्रिय खत देणे हा एक उत्तम तोडगा असल्याचे म्हटले. यावेळी शेतीमध्ये ते प्रयोग करीत असलेल्या काही स्वनिर्मिती कृषी तंत्रांचा त्यांनी ऊहापोह केला.

तांत्रिक सत्रामध्ये कृषी विद्यापीठातील डॉ करुणाकर यांनी 'हवामानाचा आढावा व या वर्षीच्या मान्सून चा अंदाज' याविषयी डॉ डी बी उंदिरवाडे यांनी 'कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व रसशोषक किडींचे व्यवस्थापन' या विषयावर तर डॉ. सतीश निचळ यांनी 'सोयाबीनचे लागवड तंत्र' या विषयांवर तांत्रिक सादरीकरण केले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन शंकानिरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार कृषी विद्यावेत्ता श्री प्रकाश घाटोळ यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील सर्वाचं विभागांचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ विभागप्रमुख अधिकारी आणि संपूर्ण विदर्भातून आलेले शेतकरी बांधव सभागृहामध्ये उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आणि अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी शेतकरी बांधवांनी विद्यापीठ संशोधित नवीन पीक वाण बियाणे खरेदीसाठी  अभूतपूर्व प्रतिसाद देत विद्यापीठा वरील आपला विश्वास अधोरेखित केला.

=========================================

अवैध रित्या विनापरवाना रेती वाहतुक करणारे 407 वाहन जप्त, अवैद्य प्रतिबंदित गुटखा विक्री करणारे दुकाणदाराविरुद्ध कार्यवाही,  अवैध घरघुती गैस सिलेंडर विक्री करणारे इसमावर कार्यवाही

अकोला आज रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या विशेष पथकास मिळालेल्या खात्रिशिर ख़बरेवरुन सय्यद अलाउद्दीन सैयद मोबीन रा गवलीवेस  बाड़ापुर याच्या 407 वहानाची आवैध रेती चोरी बद्दल झड़ती घेतली असता त्यांच्या चारचाकी गाडित mh04CA 8273 मध्ये 1 ब्रास रेती कीमत 6000 रुपये आणि गाडीची कीमत 5 लाख रुपये असा 5,06,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त क़रन्यात आला आसुंन वरील आरोपी विरुद्ध पो स्टे चानणी येथे रेती चोरिचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे,

सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक मोनिका राउत मैडम यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या पथकाने विवरा येथे केली

=========================================

विवरा येथील किराना दुकानातून अवैध  प्रतिबंदित गुटखा  जप्त

अकोला आज दि, 29,रोजी मा, पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेश पथकास खात्रिशिर खबर मिळाली की विवरा गावात एका किराना दुकानात अवैध रित्या प्रतिबंदित गुटखा विक्री केलि जात आहे त्या ख़बरेवरुन  छापा मारला असता  आरोपी रामेश्वर  विजय मेसरे वय 30 वर्ष  रा विवरा याच्या किराना दुकांनमध्ये 70,000 रूपयांचा गुटखा ज्यात, विमल ,सितार, बहार, नजर, राजनिवास, पांनबहार, बाबा, अवध, असा  प्रतिबंदित गुटखा विक्री करताना मिळून आल्याने आरोपी, रामेश्वर विजय मेसरे रा विवरा याच्या विरुद्ध पो सटे, चानणी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, 

सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक मोनीक। राउत मैडम यांच्या मार्गदर्शना खालि पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या पथकाने विवरा येथे केलि,

==============================================

फक्त 7 गैस सिलेंडर चीपरवानगी असताना 17 गेस सिलेंडर विनापरवाना बालगुन विक्री करतना मिळून आले


अकोला आज रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास मिळालेल्या खात्रिशिर ख़बरेवरुन  विवरा गावातील सार्थक किराना मद्घये त्यास फक्त 7 गैस सिलेंडर चीपरवानगी असताना 17 गेस सिलेंडर विनापरवाना बालगुन विक्री करतना मिळून आल्याने अवैध 10 सिलेंडर कीमत 50,000 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी संतोष राजाराम पजई वय 42 रा विवरा यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तु अधिनियंम कलम 3,7 अनवाये पो स्टे चानणी  येथे गुन्हा नोंदविन्यात अलेला आहे, 

सदर कार्यवाहि मा, पोलिस अधीक्षक मोनिका  राउत मैडम याच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल यानी विवरा या गावात केली,

======================================

"अकोला शहरात चैन स्नॅचिंग गुन्हे रोखणेकरीता शहर वाहतुक पोलीस राबविणार विशेष मोहिम"


अकोला शहरातील सर्व पोलीस स्टेशन अतंर्गत चैन स्नॅचिंग चे गुन्हे वाढत असल्याने अकोला शहरातील नागरिकांमध्ये चैन स्नॅचिंग बाबत भीती निर्माण झाली आहे. चैन स्नॅचिंग करणारे गुन्हेगार भर दिवसा रस्त्यावरील महिलांना आपला निशाना बनवित आहेत. चैन स्नॅशर गुन्हेगार दुचाकी मोटर सायकल वर स्वार होवुन भर रस्त्यावर गुन्हे करीत आहेत. अशा गुन्हेगारीला आळा घालणे करीता शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे चैन स्नॅचिंग रोखण्याकरीता विशेष मोहिम राबवुन रस्त्यावर संशयास्पद वाहने चालविणारे टवाळखोर व्यक्ती यांची वाहन चालक परवाना व वाहनाची इतर कागदपत्रांची तपासणी करणे करीता अकोला शहरातील सर्व रस्त्यांवर विशेष मोहिम राबवुन व वेगवेगळे पथक तयार करून वाहने डिटेन करण्यात येत आहे. आज दि. 29/05/2022 रोजी सदर विशेष मोहिम दरम्यान एकुण  08 संशयस्पद वाहनांना तपासणी करून वाहने डिटेन करण्यात आली आहे.

अकोला शहरातील सर्व नागरिकांनी सदरच्या विशेष मोहिम दरम्यान आपले वाहन परवाना, वाहनांची कागदपत्र सोबत ठेवून व तपासणी दरम्यान पोलीसांना सहकार्य करावे तसेच आपल्या परिसरात वारंवार फिरणारे अनोळखी, टवाळखोर वाहन चालक यांची माहिती त्वरीत वाहतुक पोलीसांना दयावी. ज्यामुळे भविष्यात होणा-या चैन स्नॅचिंग सारख्या गुन्हयांवर आळा घालणे शक्य होणार असल्याबाबत श्री विलास पाटील पोलीस निरिक्षक शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन अकोला शहरातील सर्व नागरिकांना आव्हाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने